राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा २२ वा वर्धापनदिन राष्ट्रवादी कार्यालयात साधेपणाने पण उत्साहाने संपन्न
कोल्हापूर/प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा २२ वा वर्धापनदिन कोल्हापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शहर कार्यालय शिवाजी स्टेडियम येथे साधेपणाने पण उत्साहाने साजरा करण्यात आला.कोविडच्या महामारीमुळे विविध कार्यक्रम रद्द करून फक्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम करण्याचा निर्णय घेण्यात आला.त्यानुसार शहराध्यक्ष आर.के.पोवार यांच्या हस्ते सकाळी १०.१० वाजता ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी आर. के. पोवार म्हणाले “माननीय शरद पवारजी यांच्याबरोबर मी या पक्षाचे काम करीत आहे. गेली सतरा वर्षे मी कोल्हापूर शहरात पक्षाचे प्रतिनिधित्व केले आहे. मी याबाबत समाधानी आहे .या शहरात राष्ट्रवादी रुजवण्याचे काम प्रामाणिकपणे केले आहे. जनतेत या पक्षाची स्वच्छ प्रतिमा व विश्वास यांच्या जिवावर गेली बावीस वर्षात सतरा वर्षे पक्ष मित्र पक्षांसह सत्तेत आहे. अशा पक्षाचे मी काम करतो आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे .आज मराठा आरक्षण प्रश्न निर्माण झाला आहे. बरेच लोक पत्रकार मला पक्षाची भूमिका विचारतात त्यांना माझे एकच उत्तर आहे इतर आरक्षण आहे तसेच ठेवून मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे. तो कायम राहील याची ग्वाही देतो”. यावेळी वर्धापन दिनानिमित्त शहराध्यक्ष आर. के. पोवार यांच्या हस्ते केक कापण्याचा कार्यक्रम करण्यात आला.या कार्यक्रमाचे स्वागत सरचिटणीस सुनील देसाई यांनी केले तर आभार सुभाष साळोखे यांनी मानले. या कार्यक्रमास सुनील पाटील, महेंद्र चव्हाण ,जहिदा मुजावर ,रमेश पोवार,प्रसाद उगवे,लालासो जगताप, निरंजन कदम , रामराजे बदाले,रियाज कागदी, निशिकांत सरनाईक, महादेव पाटील, बागडी सर, सुनील जाधव, नितीनभाऊ पाटील ,सलीम मुल्ला, जयकुमार शिंदे, किसन कल्याणकर, शितल तिवडे आदी उपस्थित होते.