Sunday, December 1, 2024
Home ताज्या भर पावसात पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी मराठ्यांची वज्रमुठ

भर पावसात पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी मराठ्यांची वज्रमुठ

भर पावसात पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी मराठ्यांची वज्रमुठ

कोल्हापूर/प्रतिनिधी : सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावे यांसह अन्य मागण्यांसाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीस्थळी दसरा चौक जवळ भर पावसात पुन्हा एकदा मराठयांनी एकजूट केली. मूक आंदोलनाने लढ्याची पुन्हा सुरुवात कोल्हापूर येथून’ करण्यात आली. काळ्या रंगाची वेशभूषा आणि दंडावर काळ्या फिती लावून मराठा आंदोलनकर्ते यात सहभागी झाले होते. खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्याप्रमुख उपस्थितीत हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात छत्रपती शाहू महाराज, कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, शिवसेना खासदार संजय मंडलिक, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांसह अन्य लोकप्रतिनिधी, मराठा समाजातील नेते, कार्यकर्ते, समन्वयक सहभागी झाले होते. अत्यंत शांततामय मार्गाने व नियोजित वेळेत हे आंदोलन पार पडले. दरम्यान, पालकमंत्री सतेज पाटील, कामगार मंत्री हसन मुश्रीफ सह आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकर यांनी केलेल्या विनंती नुसार आपण आंदोलकासह मुख्यमंत्री ठाकरेची भेट घेऊ पण पुर्व घोषित रायगड , नाशिक, अमरावतीतील आंदोलने होतीलच ‘ असा निर्धौर व्यक्त करत संयमाने सहभागी झाल्याबद्दल सुत्रधार खा.संभाजीराजे छत्रपती यांनी आभार मानले.
शिवसेना खासदार धैर्यशील माने हे सलाईन लावून आंदोलनस्थळी उपस्थित होते. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांनी व खासदार प्रा.संजय मंडलिक यांनी आरक्षण विषयावर विशेष अधिवेशन घेण्याची मागणी केली.
या आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर शहरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आंदोलनास येणार्‍या प्रत्येक समन्वयकाची नोंद पोलीस ठेवत होते. १३५ अधिकारी, १ सहस्र २०० पोलीस, ३०० गृहरक्षक दलाचे जवान शहरातील प्रमुक चौक आणि अंतर्गत रस्त्यांवर कार्यरत होते. जिल्ह्यात ३५, तर शहरात १२ ठिकाणी नाकाबंदी केंद्र करण्यात आले होते.
आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर शहरात अवजड वाहनांसाठी प्रवेश बंद करण्यात आला होता.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आंदोलनस्थळी येऊन संभाजीराजे यांना पाठिंब्याचे निवेदन महेश जाधव, अशोक देसाई, विजय जाधवासमावेत दिले. छत्रपती शाहू महाराज म्हणाले, मराठा आरक्षणासाठी सर्वांनी एकत्र येऊन दिल्लीपर्यंत पाठपुरावा करायला हवा. केंद्र सरकारने हा विषय मनावर घेतला, तरच तो सुटू शकतो. दोन तृतीयांश खासदारांनी पाठिंबा देऊन नवीन कायदा आणला पाहिजे. गेल्या ७० वर्षांत घटनेत अनेक दुरुस्त्या करण्यात आल्या, तर मराठा आरक्षण कायद्यासाठी दुरुस्ती का नाही ? हा विषय पंतप्रधानांपर्यंत गेला पाहिजे. मराठा आरक्षणाविषयी पंतप्रधानांचे काय विचार आहेत, हे स्पष्ट झालेले नाही.
पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले ,मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, ही सर्वांचीच भूमिका आहे. त्याआधी समाजाला ज्या सुविधा मिळायला हव्यात त्याविषयी चर्चा करण्यासाठी संभाजीराजे यांनी मुंबईला यावे. मी संभाजीराजे यांची मुख्यमंत्र्यांशी भेट घालून देतो. चर्चेने आपण प्रश्‍न सोडवू.
खासदार धैर्यशील माने म्हणाले, या आंदोलनाच्या निमित्ताने महाराष्ट्राला दिशा देण्यासाठी कोल्हापूरने एक पाऊल पुढे घेतले आहे. आरक्षण कोणामुळे थांबले ? आरक्षणाला कोणाचाच विरोध करत नसताना हा पेच सुटत का नाही ? हा समाजाला पडलेला प्रश्‍न आहे. मराठा आरक्षणासाठी मी लोकसभेत आवाज उठवेन, पंतप्रधान, राष्ट्रपती यांना भेटेन.
हिंदू एकताचे चंद्रकांत बराले म्हणाले, मराठ्यांची परीक्षा कोणी घेऊ नये. हे राज्यकर्ते आणि न्यायालय यांनी समजून घ्यायला हवे; अन्यथा झालेला उद्रेक थांबवणे अवघड होईल. ग्रामविकास व कामगार मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले,मराठा आरक्षणासाठी नारायण राणे समिती नेमणे ,ही चुकच होती. त्या ऐवजी आयोग नेमणे गरजेचे होते. पण मुख्यमंत्री ठाकरे व खा.संभाजीराजे भेटीतून सुवर्णमध्य निघेलेच. आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर म्हणाले आरक्षणा संदर्भात मी खा.संभाजीराजे छत्रपती मुख्यमंत्री ठाकरे यांना भेटीचे आंमत्रण प्रतिनिधी म्हणून देत आहे. अँड.प्रकाश आंबेडकर म्हणाले, मराठा आरक्षणासाठी आता खा.संभाजीराजेनी अंतिम यशस्वी लढाईच करावी. त्यांची सुरुवातही दमदार झाली आहे. एकदंरित कोरोना पार्श्वभुमीवर शिस्तबद्धपणे झालेले हे आंदोलन आणि तिथेच मुख्यमंत्री भेटीचे खा.संभाजीराजेना मिळालेले आंमत्रण हे या आंदोलनाचे मोठे यश मानले जात आहे.
खासदार संजय मंडलिक म्हणाले,जेव्हा मराठा आरक्षण हा मुद्दा येईल तेव्हा ताराराणींची,छ.शाहूंची करवीर नगरी एक होईल.
आंदोलन प्रसंगी छ.मालोजीराजे,
आम.चंद्रकांत जाधव,आमदार डॉ.विनय कोरे,आम.ऋतुराज पाटील,आम.प्रकाश अबिटकर, आम.राजेश पाटील, आमदार मान.पी.एन.पाटील, आम.राजुबाबा आवळे, आम.प्रकाश आवडे, समरजितसिंह घाटगे,ए.वाय.पाटील, के.पी.पाटील, श्रीम.संध्यादेवी कुपेकर,विश्वास पाटील, अरुण डोंगळे,महापौर निलोफर आजरेकर, वसंत मुळीक,आर.के.पोवार, फत्तेसिंह सावंत, सचिन चव्हाण, विनायक फाळके, भैया माने, बाबासाहेब पाटील-हासुरलेकर, बजरंगतात्या पाटील व असंख्य मराठा भगिनी व बांधव सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

रविवारी गडहिंग्लज येथे मोफत ह्रदयरोग व वंध्यत्वनिवारण तपसणी शिबीर

रविवारी गडहिंग्लज येथे मोफत ह्रदयरोग व वंध्यत्वनिवारण तपसणी शिबीर कणेरी/प्रतिनिधी : सिद्धगिरी हॉस्पीटल अँड रिसर्च सेंटर कणेरी मठ, यांच्या मार्फत रविवार दिनांक १ डिसेंबर २०२४...

डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या रणजीतला सर्वोत्कृष्ट पोस्टर सादरीकरण

डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या रणजीतला सर्वोत्कृष्ट पोस्टर सादरीकरण पुरस्कार कोल्हापूर/प्रतिनिधी : डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा विद्यार्थी रणजीत सी. पी यांना सर्वोत्कृष्ट पोस्टर सादरीकरणासाठी असोसिएशन...

कोल्हापूर  जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात सायंकाळी 5 पर्यंत सरासरी 67.97 टक्के मतदान

कोल्हापूर  जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात सायंकाळी 5 पर्यंत सरासरी 67.97 टक्के मतदान 273 कागल मतदारसंघात सर्वाधिक सरासरी 74.33 टक्के मतदान कोल्हापूर/प्रतिनिधी  : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024...

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात दुपारी ३ पर्यंत सरासरी ५४.०६ टक्के मतदान

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात दुपारी १ पर्यंत सरासरी ३८.५६ टक्के मतदान करवीर मतदार संघात सर्वाधिक सरासरी ४५.२९ टक्के मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात दुपारी...

Recent Comments