राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनानिमित्त शहर कार्यालय येथे ध्वजवंदन कार्यक्रम
कोल्हापूर /प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या २२ व्या वर्धापनदिनानिमित्त कोल्हापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने छत्रपती शिवाजी स्टेडियम येथील शहर कार्यालय येथे ध्वजवंदन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सकाळी १०:१० वाजता शहराध्यक्ष व माजी महापौर आर. के. पोवार यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल.
माजी कृषीमंत्री शरद पवार यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची स्थापना केली. त्यास १० जून २०२१ रोजी २२ वर्षे पूर्ण होत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा हा २२ वा वर्धापनदिन साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्ताने गुरूवारी (दि.१०) सकाळी १०:१० वाजता कोल्हापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने शहर कार्यालय येथे शहराध्यक्ष आर. के. पोवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.