Tuesday, October 15, 2024
Home ताज्या सहापदरी महामार्गामुळे रस्ते सुरक्षा वाढेल - ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा विश्वास...

सहापदरी महामार्गामुळे रस्ते सुरक्षा वाढेल – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा विश्वास नेते अधिकारी यांनी केला महामार्ग सर्व्हे

सहापदरी महामार्गामुळे रस्ते सुरक्षा वाढेल – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा विश्वास नेते अधिकारी यांनी केला महामार्ग सर्व्हे

चारपदरी महामार्गावरील उणीवा काढून निर्माण होणार सहापदरी महामार्ग – मंत्री मुश्रीफ यांच्यासह पालकमंत्री सतेज पाटील, खासदार संजय मंडलिक, आमदार चंद्रकांत जाधव, ऋतुराज पाटील व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत महामार्गाचा सर्वे

कागल/प्रतिनिधी : कागल – सातारा राष्ट्रीय महामार्ग सहापदरी झाल्यानंतर रस्ते सुरक्षा वाढेल असा विश्वास ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला. मंत्री मुश्रीफ यांच्यासह पालकमंत्री सतेज पाटील, खासदार संजय मंडलिक, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार ऋतुराज पाटील या लोकप्रतिनिधींसह अधिकाऱ्यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरीकरणाच्या कामाचा सर्वे केला. कोगनोळी टोल नाक्याजवळच्या कागल हद्दीपासून घुणकी पर्यंतच्या राष्ट्रीय महामार्गाचा हा सर्वे झाला.याबाबत माहिती देताना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, या आधी झालेल्या चारपदरी राष्ट्रीय महामार्गामुळे काही तांत्रिक त्रुटी राहून गेल्या होत्या. त्यामुळे रस्ते वाहतुकी सहप्रवासी वाहतुकीलाही अडचणी व धोके निर्माण झाले होते. या महामार्गाच्या सहापदरी कारणामुळे हे सर्व धोके व अडचणी निघून जाऊन वाहतूक सुरळीत होईल. या सर्वेमध्ये महामार्गावरील बोगदे, जोड-रस्ते उड्डानपुले, तसेच भुयारी मार्ग आदी समस्यांचा अभ्यासपूर्ण सर्वे झाला.
या सर्वेक्षणाच्या पाहणीवेळी नागरिक, प्रवासी आणि पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील कर्मचारी व उद्योजकांनी सुरक्षेबाबत काही निवेदनेही दिली.कागल बसस्थानकाजवळचा राष्ट्रीय महामार्गाचा भुयारी पूल काॅलम टाकून पार्किंगची सुविधेसह दुहेरी पूल उभारावा कागल मुर्गुड राज्य मार्गाच्या सुरुवातीला उड्डाणपूल उभारावा. जुन्या आरटीओ चेकपोस्टजवळ उड्डाणपूल अथवा भुयारी पूल बांधणे.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य युवराज पाटील, राष्ट्रीय महामार्ग सेवा कृती समितीचे अध्यक्ष प्रताप उर्फ भैय्या माने, उपाध्यक्ष संजय ठाणेकर, नगरसेवक प्रवीण काळबर, माजी उपनगराध्यक्ष आनंदराव पसारे, जिल्हा परिषद सदस्य शशिकांत खोत यांच्यासह राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प संचालक वसंत पंढरकर, सर्वेअर व्ही. एन. पाटील आदी प्रमुख उपस्थित होते.

चौकट
सर्वेक्षणावेळी लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी कागल -हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील उद्योजक व कर्मचाऱ्यांचे शिष्टमंडळ लक्ष्मी टेकडी जवळ भेटले. सध्या असलेली महामार्गाची धोकादायक स्थिती त्यांनी प्रत्यक्षात दाखवून दिली व लक्ष्मी मंदिरासमोर उड्डाणपुलासह सेवा रस्त्यांचीही मागणी आवश्यकता पटवून दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

जयश्री चंद्रकात (आण्णा) जाधव फाऊंडेशन आयोजित रास दांडियाला उत्स्फूर्त प्रतिसाद

जयश्री चंद्रकात (आण्णा) जाधव फाऊंडेशन आयोजित रास दांडियाला उत्स्फूर्त प्रतिसाद डेलिया ग्रुप प्रथम : जैना ओसवाल गरबा क्वीनची मानकरी : महिलांनी लुटला नृत्याचा आनंद कोल्हापूर/प्रतिनिधी :...

संजय घोडावत यांना एज्युकेशन आयकॉन पुरस्कार

संजय घोडावत यांना एज्युकेशन आयकॉन पुरस्कार अतिग्रे/प्रतिनिधी : शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल संजय घोडावत यांना एज्युकेशन टुडे संस्थेच्या वतीने यावर्षीचा एज्युकेशन आयकॉन पुरस्कार मुंबई...

धडाकेबाज रोमँटिक अ‍ॅक्शनपट ‘नाद – द हार्ड लव्ह’ २५ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार

धडाकेबाज रोमँटिक अ‍ॅक्शनपट 'नाद - द हार्ड लव्ह' २५ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार कोल्हापूर/प्रतिनिधी : २५ ऑक्टोबरला एक धडाकेबाज रोमँटिक अ‍ॅक्शनपट मराठी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.तो...

११ ऑक्टोबर रोजी कोल्हापुरात १२ जिल्ह्यातील शेतकऱ्यांची राज्यव्यापी निर्धार परिषद

शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समिती, महाराष्ट्र ११ ऑक्टोबर रोजी कोल्हापुरात १२ जिल्ह्यातील शेतकऱ्यांची राज्यव्यापी निर्धार परिषद कोल्हापूर/प्रतिनिधी : शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समिती, महाराष्ट्र वतीने जिल्ह्यातील...

Recent Comments