स्वातंत्र्याच्या ७४ वर्षातील मोदी सरकारची ७ वर्षे जनतेसाठी काळी वर्षे – ही ७ वर्षे इव्हेंट व इमेज मॅनेजमेंटची – पालकमंत्री सतेज पाटील
कोल्हापूर/प्रतिनिधी : सात वर्षे भारत देशामध्ये मोदी सरकारचे सरकार देश चालवीत आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून ७४ वर्षे झाली या ७४ वर्षांमध्ये जनतेने कधीच भोगल्या नसतील इतक्या अडचणी मोदी सरकार निवडून आलेल्या या सात वर्षात जनतेने भोगल्या आहेत या ७ वर्षात जनतेचे तीन-तेरा वाजले असून जनतेसाठी ही ७ वर्षे काळी आहेत मोदी सरकारची ही सात वर्षे केवळ इव्हेंट आणि इमेज मॅनेजमेंट अशीच ठरली असल्याचा आरोप कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत केला.मोदी सरकारच्या या सात वर्षाच्या कालावधीतील कार्याचा उल्लेख करत आज कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये काळ्या फिती लावून निदर्शने करण्यात आली.व मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.
या आंदोलनात आमदार पी एन पाटील, आमदार चंद्रकांत जाधव,आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयंत आसगावकर, शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, गुलाबराव घोरपडे, संजय पोवार-वाईकर, तौफिक मुल्लानी , सचिन चव्हाण, किशोर खानविलकर,संपतराव पाटील, दिपक थोरात,पार्थ मुंडे,बाळासाहेब खाडे,अक्षय शेळके,उदय पोवार, सरफराज रिकीबदार, प्रवीण पाटील,संध्या घोटणे, सुलोचना नायकवडी,मंगल खुडे,पूजा आरडे, उज्वला चौगले,वैशाली पाडेकर यांच्यासह काँग्रेसच्या विविध सेलचे पदाधिकारी सहभागी झाले होते.
लोकांना केवळ आच्छे दिन चे स्वप्न दाखविणाऱ्या मोदींनी देशाला खूप मागे नेले आहे. त्यामुळे मोदी है तो मुमकिन है नाही तर ‘मोदी है तो सब नामुमकिन है’. अशी आता परिस्थिती आहे असे पाटील यावेळी म्हणाले.२०१४ पासून देश अधोगतिकडे गेला आहे नोटबंदी, शेतकरी विरोधी काळा कायदाशैक्षणिक धोरण करता आले नाही कोणतेही नियोजन त्यांनी केले नाही कोरोनाचा काळ आहे जनतेला या सरकारने वाऱ्यावर सोडले आहे.कोरोनामध्ये या मोदी सरकारने लोकांना थाळी वाजवायला सांगितली,घरात दिवे लावण्यास सांगितले.यात त्यांना जनतेने साथ दिली आणि आता मात्र जनतेला त्यांनी वाऱ्यावर सोडले आहे शिवाय त्यांनी पेट्रोल डिझेलचे दर वाढविले आहेत घरगुती तेल व धान्य याचेही दरही वाढविले आहेत अशा परिस्थितीत जनतेने जगायचे कसे काही प्रश्न आहे त्यामुळे या सात वर्षांमध्ये मोदी सरकारने जनतेसाठी ठोस योजना काही केलेली नाही लोकांना कोरोना कालावधीमध्ये लस मिळणे आवश्यक होते मात्र त्यांनी बाहेरील देशांना लसी पुरविल्या आणि भारत देशातील जनतेला मात्र लस मिळाली नाही शिवाय ज्येष्ठ नागरिकांना लसीकरण करण्याचे आदेश दिले ते सुरू असतानाच लगेच १८ ते ४४ वयोगटातील साठी लसीकरण करण्याचे आदेश दिले आणि हे लसीकरण त्या सरकारने राज्यातील सरकारने करावे असेही सांगितले मात्र पुरवठा केंद्र सरकारकडून होत नसल्याने सर्वांच्याच लसीकरण सध्या थांबले आहे याला केंद्र सरकार मोदी सरकार जबाबदार आहे असा आरोप त्यांनी केला या सात वर्षात त्यांनी देशाची उन्नती केली आहे असे सांगितले दरम्यान या मोदी सरकारला आज सात वर्ष पूर्ण झाले या सरकारने जनतेला कोणत्याही सुविधा पुरविल्या नाही लोकांची रोजगार गेलेले आहेत व्हेंटिलेटर काळाबाजार केला आहे. सर्वांना जबाबदारी मोदी सरकार आहे असा आरोप करत जिल्हा काँग्रेस कमिटी मध्ये आज मोदी सरकारच्या विरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली.