Friday, September 13, 2024
Home ताज्या सेंट झेवियर्सच्या माजी विद्यार्थ्यांनी जपली सामाजिक जबाबदारी 

सेंट झेवियर्सच्या माजी विद्यार्थ्यांनी जपली सामाजिक जबाबदारी 

सेंट झेवियर्सच्या माजी विद्यार्थ्यांनी जपली सामाजिक जबाबदारी 

पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडे सुपूर्द केले १८ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोरोना प्रादुर्भावाचा पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात रुग्णांना ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटर मशीनची गरज लक्षात घेऊन सेंट झेवियर्स हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी १८ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडे सुपूर्द केले. आमदार ऋतुराज पाटील यांच्यासह त्यांच्या मित्रपरिवाराने एकत्रित येत सुमारे साडे आठ लाख रुपयांची मशीन्स प्रशासनाला उपलब्ध करून दिली.
जिल्ह्यात  कोरोनामुळे अनेक रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासत आहे. रुग्ण संख्या आणि ऑक्सिजनची  मागणी लक्षात घेता, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीनची मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर रुग्णांवर  वेळेत उपचार करून त्यांचे प्राण वाचावेत यासाठी सामाजिक बांधिलकी च्या माध्यमातून सेंट झेवियर्सचे माजी विद्यार्थी आमदार ऋतुराज पाटील आणि त्यांच्या मित्र परिवाराने एकत्रित येत ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला.या निर्णयानंतर सन २००५, २००६ आणि २००९  या बॅचच्या विद्यार्थ्यांनी सुमारे साडे आठ लाख रुपये गोळा करत जमलेल्या रकमेतून नवीन अठरा ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर विकत घेतले. विद्यार्थ्यांनी हे कॉन्सन्ट्रेटर पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडे सेंट झेवियर्स हायस्कूलचे फादर प्रिन्सिपल जेम्स थोरात, सुपेरिअर फादर डेनिस बोर्जेस यांच्या प्रमुख उपस्थितीत सुपूर्द केले.
यावेळी बोलताना फादर थोरात म्हणाले,  नैसर्गिक अडचणीच्या प्रसंगी सेंट झेवियर्स च्या आजी माजी विद्यार्थ्यांकडून नेहमीच  मदतीचा हातभार लावला जातो. त्यांच्या या सामाजिक बांधिलकीचा अभिमान वाटतो .
शाळेचे माजी विद्यार्थी आमदार ऋतुराज पाटील यांनी कठीण प्रसंगी लोकांना मदत करण्याचे सामाजिक भान राखून आम्ही सर्व मित्रांनी एकत्रित येत, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. यापुढेही ज्या गोष्टींची गरज भासेल त्याची उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही दिली. याप्रसंगी रुझारीयो गोन्साल्विस, विल्सन डिसूझा, राजेंद्र कांडगावकर, राजेश चव्हाण,  हर्षवर्धन पाटील, रोहित शिंदे, सत्यव्रत जामसांडेकर, आसिफ मुल्ला, रोहित शिकलगार, आदित्य नाईक, निलेश सातवेकर, प्रणव वाणी, शिवा जाधव, रोहित नलवडे, वैभव सातवेकर, गौरव पाटील, आकाश परदेशी यांच्यासह माजी विद्यार्थी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

श्रीमती कल्पना घाटगे या पर्यावरणचा संदेश देत आपल्या घरी ३५ वर्षापासून करत आहेत सुपारीची गणेश पूजा

श्रीमती कल्पना घाटगे या पर्यावरणचा संदेश देत आपल्या घरी ३५ वर्षापासून करत आहेत सुपारीची गणेश पूजा कोल्हापूर/प्रतिनिधी : आज महिला विविध क्षेत्रात आपला नावलौकिक दाखवून...

श्रीमती कल्पना घाटगे या पर्यावरणचा संदेश देत आपल्या घरी ३५ वर्षापासून करत आहेत सुपारीची गणेश पूजा

श्रीमती कल्पना घाटगे या पर्यावरणचा संदेश देत आपल्या घरी ३५ वर्षापासून करत आहेत सुपारीची गणेश पूजा कोल्हापूर/प्रतिनिधी : आज महिला विविध क्षेत्रात आपला नावलौकिक दाखवून...

वकिलीसाठी आत्मविश्वास महत्त्वाचा – ॲड.उज्वल निकम

वकिलीसाठी आत्मविश्वास महत्त्वाचा - ॲड.उज्वल निकम घोडावत विद्यापीठात 'लाॅ' विभागाचे उदघाटन अतिग्रे/प्रतिनिधी : कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वकिली करताना आत्मविश्वास महत्त्वाचा असतो. वाचन आणि कष्टाने कायद्याची...

Recent Comments