Sunday, July 14, 2024
Home पुणे जनतेचे मत विचारात न घेता ,जनतेवर जबरदस्तीने जनता कर्फ्यु लादनाऱ्या प्रवृत्तीला समस्त...

जनतेचे मत विचारात न घेता ,जनतेवर जबरदस्तीने जनता कर्फ्यु लादनाऱ्या प्रवृत्तीला समस्त हिंदुत्ववादी संघटनेचा तीव्र विरोध

जनतेचे मत विचारात न घेता ,जनतेवर जबरदस्तीने जनता कर्फ्यु लादनाऱ्या प्रवृत्तीला समस्त हिंदुत्ववादी संघटनेचा
तीव्र विरोध

 

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोविड 19 च्या धर्तीवर प्रशासनाने मार्च पासून कोल्हापूर जिल्हा आणि शहरात घेतलेल्या अनेल निर्णयावर कोल्हापूरच्या जनतेने स्वीकार करत प्रशासनाला पाठिंबा देत प्रशासनाला मदत करायचे धोरण स्वीकारले.मात्र गेले काही दिवसापासून प्रशासन हे कोविड रुग्णांना तसेच इतर नॉन कोविड रुग्णांना योग्य त्या सुविधा जिवंतपनी आणि मेल्यानंतरही देण्यास कमी पडत असताना त्याकडे गांभीर्याने लक्ष घालायचे सोडून आर्थिक अडचणी ,सोय सुविधा मिळत नसलेल्या त्रस्त जनतेला जनता कर्फ्युच्या गोंडस नावाखाली त्रास देऊन पुन्हा निष्पाप जनतेलाच जनतेमुळेच कोरोना प्रसार वाढतोय असे सांगून स्वतःच्या चुकांवर पांघरूण घालायाचा प्रयत्न करत असेल तर हिंदुत्ववादी संघटना हे खपवून घेणार नाही.
काल महापालिकेमध्ये जी जनता कर्फ्यु साठी बैठक आयोजित करण्यात आली होती ,त्या मिटिंगला जे निर्णय घेण्यात आले ते निर्णय कोल्हापूरचे जिल्हाधिकारी ,पोलीस अधीक्षक ,आयुक्त यांची
मान्य आहे काय ? अशी विचारणा समस्त हिंदुत्ववादी संघटनेने केली आहे.
काल व्यापारी संघटनाच्या मीटिंग मध्येच व्यापारी संघटना मध्ये दुकाने बंद करण्यावरून मतभेद झाले आहेत. एका गटाने दिनांक 11 सप्टेंबर ते 16 सप्टेंबर पर्यंत दुकाने बंद करायचा निर्णय घेतला आहे तर दुसऱ्या गटाने चालू ठेवायचा निर्णय घेतला आहे.तर यापुढे जाऊन महापालिका प्रशासनाने 11 ते 21 सप्टेंबर पर्यंत जनता कर्फ्यु पाळावा असे आव्हान केले आहे.मग यासर्वामुळे जनतेमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
तसेच काही दुकाने चालू आहेत म्हणून ते बंद करण्यासाठी काही गट एकमेकांची दुकाने बंद करण्यासाठी आक्रमक झाली आणि त्यातून काही अनपेक्षित प्रसंग घडला तर त्याची जबाबदारी प्रशासन घेणार काय ? तसेच महापालिका 10 दिवस कर्फ्यु पाळा म्हणत आहे तर 6 दिवस दुकान बंद ठेवल्यावर सातव्या दिवशी ते दुकान उघडणार मग नक्की जनता कर्फ्युत नक्की काय साध्य होणार ?
महापालिका प्रशासनाने मास्क नाही घातला म्हणून 5 हजार दंड करायचा निर्णय घेतला आहे हा हास्यास्पद आहे. 3 महिन्यापासून अधिक काळ नोकरदारांना पगार नाही ,व्यावसायिकांचे
उत्पन्न नाही ,घरभाडे , लाईटबिल तटलेल आहे त्यातून चुकून इतर आजार अथवा कोरोना झालाच तर हॉस्पिटलला द्यायला पैसे नाहीत.त्यातून अनेक हॉस्पिटलला शासकीय योजना लागू केलेल्या नाहीत.यासर्व अडचणी असताना असा जिझिया कर लावणे महापालिकेला शोभनिय नाही कारण महापालिकेच्या चौकात आणि कार्यक्रमात मास्क न वापरणे आणि सोशल
डीस्टन्स वारंवार मोडला जात आहे मात्र नाममात्र कारवाई सोडली तर ठोस कारवाई दिसत नाही मग सामान्य जनतेवर अन्याय का ?
यासर्व विषयांकडे गांभीर्याने बघायचं सोडून हिंदुत्ववादी संघटना, तालीम मंडळ यांचे प्रमुख ,रिक्षावाले ,फेरीवाले ,भाजीवाले संघटना यांचे प्रतिनिधी मीटिंगला न बोलवता मोजक्याच लोकांच्या मताचा विचार करून संपूर्ण कोल्हापूरच्या जनतेला वेठिला धरणार असाल तर तीव्र विरोध आम्ही नक्कीच करणार. प्रशासनाने सुरुवातीला चांगले कार्य केले आहे त्यामुळे आम्ही अनेक आंदोलने प्रशासनाला डोकेदुखी ठरू नयेत म्हणून शांत आणि संयमी पने रद्द केले आहेत. याचा प्रशासनाने गैर अर्थ काढू नये .त्यामुळे प्रशासनाने मनमानी निर्णय घेण्यापूर्वी सर्वांची भूमिका लक्षात घ्यावी अन्यथा हिंदुत्ववादी संघटना या जनता कर्फ्युच्या विरोधात रस्त्यावर जनआंदोलन उभे करू हे गांभीर्याने विचारात घ्यावे असा इशारा हिंदुत्ववादी संघटनेने दिला आहे.
हे पत्रक प्र. द.गणपुले ,
संभाजी साळुंखे , महेश उरसाल , किशोर घाटगे , अशोक देसाई , संजय
साडविलकर , प्रमोद सावंत , सुनील पाटील , अवधूत भाट्ये , राजेंद्र सूर्यवंशी , प्रकाश सरनाईक , प्रसाद जाधव ,विशाल पाटील ,रणजित आयरेकर , मनोहर सोरप,अनिल कोडोलीकर, विराज पाटील , नितेश कोकितकर आदींच्या वतीने प्रसिद्धीस देण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

कोल्हापूरमधील प्रसिद्ध व्यावसायिक हेमंत शहा,मदन भंडारी आणि प्रताप कोंडेकर यांनी चक्क ७० दिवसात कोल्हापूर ते लंडन केला २० देशांचा थरारक प्रवास

सेव्ह वॉटर सेव्ह नेचर.... या 'कोल्हापूर ते लंडन' या जनजागृती संदेश यात्रेच्या माध्यमातून कोल्हापूरच्या चार मित्रांनी कोल्हापूरचे नाव कोरले लंडनच्या हृदयावर कोल्हापूरमधील प्रसिद्ध व्यावसायिक हेमंत...

कोल्हापूरच्या उघोग विश्वाची होणार नवी रोजगार उपलब्धीसह विधायक ओळख – व्यवस्थापकीय संचालक तुषार शेळके

जगप्रसिद्ध ब्रीक्स्टन मोटरसायकल्स आणि व्ही एल एफ इलेक्ट्रिक टू-व्हीलर्स भारतात संयुक्त निर्मिती सह वितरीत करण्यासाठी केएस डब्ल्यू वेलोसे मोटर्स सज्ज कोल्हापूरच्या उघोग विश्वाची होणार नवी...

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊनच्या अध्यक्षपदी सौ. अरूंधती महाडिक तर उपाध्यक्षपदी मिरा कुलकर्णी यांची निवड

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊनच्या अध्यक्षपदी सौ. अरूंधती महाडिक तर उपाध्यक्षपदी मिरा कुलकर्णी यांची निवड कोल्हापूर/प्रतिनिधी : रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्या अध्यक्षपदी सौ....

नेहरूनगर येथील दत्त भक्त मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत केली मिरजकर तिकटी येथील अंधशाळेस आर्थिक मदत

नेहरूनगर येथील दत्त भक्त मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत केली मिरजकर तिकटी येथील अंधशाळेस आर्थिक मदत कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर येथील आयसोलेशन हॉस्पिटल परिसरातील श्री दत्त मंदीर...

Recent Comments