Sunday, December 8, 2024
Home माय मराठी सायबर कोविड केअर सेंटरमध्ये साजरा झाला 80 वर्षीय आजोबांचा हॅपी वाला बर्थडे...

सायबर कोविड केअर सेंटरमध्ये साजरा झाला 80 वर्षीय आजोबांचा हॅपी वाला बर्थडे…

सायबर कोविड केअर सेंटरमध्ये साजरा झाला 80 वर्षीय आजोबांचा हॅपी वाला बर्थडे…

 

कोल्हापूर /प्रतिनिधी : वाढदिवस म्हंटले की प्रत्येकाच्या आयुष्यातील एक आनंदाचा दिवस असतो. सर्वजण आपल्या प्रियजनांचा वाढदिवस अविस्मरणीय बनविण्यासाठी प्रयत्न करत असतात. याचीच प्रचिती कोल्हापूरातील सायबर कोव्हीड सेंटर मध्ये आली. येथील डॉक्टर ,नर्सिंग स्टाफ आणि इतर कोरोनाबाधित रुग्णांनी एका 80 वर्षांच्या आजोबांचा वाढदिवस साजरा करून त्यांचा दिवस अविस्मरणीय बनवलाय.
कोल्हापूर येथील व्हिजन चारीटेबल ट्रस्टच्या वतीने सायबर कॉलेज इथं उभारल्या गेलेल्या मोफत कोविड केअर सेंटरमध्ये आजचा दिवस प्रकाश टोपले या आजोबांच्यासाठी खास होता. कारण उजळाईवाडी इथल्या 80 वर्षीय प्रकाश टोपले यांचा आज वाढदिवस होता. दरवर्षी कुटुंबीयांसोबत हे आजोबा वाढदिवस साजरा करत असतात मात्र त्यांना गेल्या 10 दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली. त्यांच्यावर संताजी घोरपडे व्हिजन चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून सायबर कॉलेज येथे उभारलेल्या कोविड केअर सेंटर येथे उपचार सुरू आहेत. त्यामुळे ते यावर्षी आपल्या कुटुंबियांसोबत वाढदिवस साजरा करू शकत नव्हते. मात्र हे समजल्यावर क्षणाचाही विलंब न करता संताजी घोरपडे आणि डॉक्टर संगीता निंबाळकर यांनी कोविड सेंटरमध्ये या आजोबांच्या वाढदिवसाचं केक कापून सेलिब्रेशन करण्यात आलं. आजोबांसाठी सुद्धा हा वाढदिवस अविस्मरणीय होता. यावेळी व्हिडिओ कॉल करून त्यांच्या कुटुंबीयांना देखील वाढदिवसात सहभागी करून घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

साखरेच्या किमान आधारभूत किंमतीमध्ये ४२०० रुपये प्रतिक्विंटल इतकी वाढ करावी, खासदार महाडिक यांची राज्यसभेत मागणी

साखरेच्या किमान आधारभूत किंमतीमध्ये ४२०० रुपये प्रतिक्विंटल इतकी वाढ करावी, खासदार महाडिक यांची राज्यसभेत मागणी   दिल्ली/प्रतिनिधी : राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी संसदेच्या अधिवेशनात साखरेच्या...

निसर्ग आणि पक्षी अभ्यासक किरण पुरंदरे यांचा रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्यावतीनं मानपत्र देवून सत्कार पुरंदरे दांपत्याचा विलक्षण जीवन प्रवास ऐकून श्रोते...

निसर्ग आणि पक्षी अभ्यासक किरण पुरंदरे यांचा रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्यावतीनं मानपत्र देवून सत्कार पुरंदरे दांपत्याचा विलक्षण जीवन प्रवास ऐकून श्रोते भारावले कोल्हापूर/प्रतिनिधी : चिमणीचं...

आराध्य दैवत आणि शिवसेनाप्रमुखांना स्मरण करून राजेश क्षीरसागरांनी घेतली “आमदारकीची” शपथ

आराध्य दैवत आणि शिवसेनाप्रमुखांना स्मरण करून राजेश क्षीरसागरांनी घेतली "आमदारकीची" शपथ मुंबई/प्रतिनिधी : नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत उत्तर मधून राजेश क्षीरसागर यांनी तब्बल २९...

वालावलकर ट्रस्ट हॉस्पिटलच्या वतीने आरोग्य पंधरवडा शिबीराचे आयोजन

वालावलकर ट्रस्ट हॉस्पिटलच्या वतीने आरोग्य पंधरवडा शिबीराचे आयोजन   कोल्हापूर /प्रतिनिधी : वैद्यकीय क्षेत्रात सेवाभावी पणे सन १९८६ पासून कार्यरत असलेल्या शिवाजी उद्यमनगर येथील वालावलकर ट्रस्ट...

Recent Comments