Tuesday, July 23, 2024
Home ताज्या केवळ अत्यावश्यक सेवांवरील वाहनांकरिता इंधन पुरवण्याचे अपर जिल्हादंडाधिकारी भाऊ गलंडे यांचे निर्देश

केवळ अत्यावश्यक सेवांवरील वाहनांकरिता इंधन पुरवण्याचे अपर जिल्हादंडाधिकारी भाऊ गलंडे यांचे निर्देश

केवळ अत्यावश्यक सेवांवरील वाहनांकरिता इंधन पुरवण्याचे अपर जिल्हादंडाधिकारी भाऊ गलंडे यांचे निर्देश

कोल्हापूर/ (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्ह्यामध्ये  दि. १५ मे रात्री १२ ते २३ मे २०२१ रोजी रात्री १२ वा. पर्यंत आणखी कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. या कालावधीमध्ये पेट्रोल/डिझेल इंधनाचा पुरवठा उपरोक्त आदेशामध्ये सुट दिलेल्या अत्यावश्यक सेवांवरील वाहनांकरिता सुरळीतपणे होणे आवश्यक असल्याने जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपचालकांसाठी अपर जिल्हादंडाधिकारी भाऊ गलंडे यांनी निर्देश जारी केले आहेत.
सर्व पेट्रोल पंपचालकांनी जिल्हाधिकारी यांच्या संदर्भीय नमूद आदेशामध्ये नमूद सुट दिलेल्या केवळ आरोग्य सेवा व इतर अत्यावश्यक सेवांच्या वाहनांना पेट्रोल व डिझेल विक्री करावी.
सर्व पेट्रोल पंपचालकांनी ज्या वाहनांना पेट्रोल/डिझेल दिले जाणार आहे त्या अत्यावश्यक सेवेचा प्रकार मालकाचा किंवा वाहनचालकाचा तपशिल, दिलेल्या इंधनाचे परिमाण इत्यादी नोंदी ठेवल्या पाहिजेत.
सर्व पेट्रोल पंपचालकांनी आपला इंधन क्षमतेच्या ५० टक्के कोटा राखीव म्हणून शिल्लक ठेवावा. याबाबत जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार निकडीच्या वेळी आवश्यकतेनुसार सदर कोटयामधून इंधनाचा वापर करण्याच्या सूचना देण्यात येतील.
वरील सूचनांचे उल्लंघन करणारी व्यक्ती आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ चे तरतुदीनुसार तसेच भारतीय दंडसंहिता १८६०(४५) च्या कलम १८८ अन्वये कारवाईस पात्र राहील याची नोंद घेण्यात यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक दिलीप पाटील यांचे निधन

मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक दिलीप पाटील यांचे निधन कोल्हापूर/प्रतिनिधी : मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आणि न्यायालयाचे याचिका कर्ते दिलीप पाटील यांचे काल शनिवारी कराड नजीक...

सततच्या पर्जन्यवृष्टीमुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी ३६ फुटावर

सततच्या पर्जन्यवृष्टीमुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी ३६ फुटावर कोल्हापूर/२० जुलै (वार्ता.) - कोल्हापूर जिल्ह्याच्या धरणक्षेत्रात सातत्याने होणार्‍या पावसाने कृष्णा, वारणा, पंचगंगा, दूधगंगा या नद्यांच्या पाणी...

घोडावत विद्यापीठतील फार्मसी विभागाच्या विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीमध्ये निवड

घोडावत विद्यापीठतील फार्मसी विभागाच्या विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीमध्ये निवड किमया शिंदे व अरिहंत परमाज यांना साडेपाच लाखाचे पॅकेज अतिग्रे/प्रतिनिधी :संजय घोडावत विद्यापीठाने शिक्षण क्ष्रेत्रात अल्पावधीतच आपले नाव...

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये डॉ. सुहास देशमुख यांचे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये डॉ. सुहास देशमुख यांचे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन कोल्हापूर/प्रतिनिधी : जागतिक युवा कौशल्य दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांतर्गत डॉ. सुहास देशमुख, संचालक, राष्ट्रीय...

Recent Comments