४५ वर्षावरील कोव्हॅक्सिनच्या दुस-या डोसचे ११ प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र येथे आज लसीकरण कोव्हॅक्सिनच्या दुस-या डोससाठी फोन येईल त्यांनीच फक्त संबंधीत लसीकरण केंद्रावर यावे
कोल्हापूर/प्रतिनिधी : ४५ वर्षावरील कोव्हॅक्सिनच्या दुस-या डोससाठी सर्व पात्र लाभार्थ्यांचे रविवार दि.१६ मे २०२१ रोजी महापालिकेच्या सर्व प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रात लसीकरण करण्यात येणार आहे. वय वर्षे ४५ वरील कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेतलेल्या नागरीकांनी कोव्हॅक्सिनच्या दुस-या डोसकरीता महापालिकेच्या ११ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रावर यावे. याकरीता पात्र लाभार्थींना संबंधीत प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रावरुन कोव्हॅक्सिनच्या दुस-या डोससाठी फोन येईल त्यांनीच फक्त संबंधीत लसीकरण केंद्रावर वेळेत उपस्थित राहून लसीकरण करुन घ्यावे असे आवाहन महापालिकेच्यातवीने करण्यात येत आहे.