Monday, July 15, 2024
Home ताज्या भाजपाच्या वतीने रिक्षा व्यावसायिकांना धान्य किटचे वितरण

भाजपाच्या वतीने रिक्षा व्यावसायिकांना धान्य किटचे वितरण

भाजपाच्या वतीने रिक्षा व्यावसायिकांना धान्य किटचे वितरण

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोरोनाच्या संकट काळामध्ये गेल्या दीड वर्षापासून रोजगाराचे संकट सर्वसामान्य जनतेवर असून सर्वांना सतावत आहे. लॉकडाऊनमुळे सर्व व्यवसाय, उद्योगधंदे ठप्प झाले आहेत. हातावरचे पोट असणाऱ्या लोकांची परिस्थिती बिकट झाली आहे. अशा अनेक घटकांना या संकट काळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या सेवा कार्याच्या माध्यमातून मदत पुरवली जात आहे. आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने कोल्हापूर शहरातील रिक्षा व्यावसायिकांना जीवनावश्यक वस्तूंचे कीट भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्यावतीने वितरित करण्यात आले. राजारामपुरी ११ वी गल्ली येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमामध्ये रिक्षा व्यवसायिकांना उदरनिर्वाहासाठी सहकार्य करून भारतीय जनता पार्टी रिक्षा व्यवसायिकांना एक आधार द्यायचा प्रयत्न करत आहे. यावेळी कॉमन मॅन व युवक मित्र मंडळ तर्फे चालणाऱ्या जनसेवा केंद्रास भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी सदिच्छा भेट दिली व केंद्राच्या उपक्रमाची माहिती घेतली.याप्रसंगी भाजपा प्र.का.सदस्य महेश जाधव, भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे, संघटन सरचिटणीस अशोक देसाई, सरचिटणीस विजय जाधव, दिलीप मेत्राणी, कॉमन मॅन संघटनेचे बाबा इंदुलकर, अॅड.वंदुरे-पाटील, भाजपा रिक्षा आघाडी संयोजक नरेंद्र पाटील, अविनाश दिंडे, सुनीलसिंह चव्हाण, अभिजीत शिंदे, दिलीप बोंद्रे, तानाजी निकम, सचिन साळोखे आदी कार्यकर्ते व रिक्षा व्यवसायिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

कोल्हापूरमधील प्रसिद्ध व्यावसायिक हेमंत शहा,मदन भंडारी आणि प्रताप कोंडेकर यांनी चक्क ७० दिवसात कोल्हापूर ते लंडन केला २० देशांचा थरारक प्रवास

सेव्ह वॉटर सेव्ह नेचर.... या 'कोल्हापूर ते लंडन' या जनजागृती संदेश यात्रेच्या माध्यमातून कोल्हापूरच्या चार मित्रांनी कोल्हापूरचे नाव कोरले लंडनच्या हृदयावर कोल्हापूरमधील प्रसिद्ध व्यावसायिक हेमंत...

कोल्हापूरच्या उघोग विश्वाची होणार नवी रोजगार उपलब्धीसह विधायक ओळख – व्यवस्थापकीय संचालक तुषार शेळके

जगप्रसिद्ध ब्रीक्स्टन मोटरसायकल्स आणि व्ही एल एफ इलेक्ट्रिक टू-व्हीलर्स भारतात संयुक्त निर्मिती सह वितरीत करण्यासाठी केएस डब्ल्यू वेलोसे मोटर्स सज्ज कोल्हापूरच्या उघोग विश्वाची होणार नवी...

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊनच्या अध्यक्षपदी सौ. अरूंधती महाडिक तर उपाध्यक्षपदी मिरा कुलकर्णी यांची निवड

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊनच्या अध्यक्षपदी सौ. अरूंधती महाडिक तर उपाध्यक्षपदी मिरा कुलकर्णी यांची निवड कोल्हापूर/प्रतिनिधी : रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्या अध्यक्षपदी सौ....

नेहरूनगर येथील दत्त भक्त मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत केली मिरजकर तिकटी येथील अंधशाळेस आर्थिक मदत

नेहरूनगर येथील दत्त भक्त मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत केली मिरजकर तिकटी येथील अंधशाळेस आर्थिक मदत कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर येथील आयसोलेशन हॉस्पिटल परिसरातील श्री दत्त मंदीर...

Recent Comments