Friday, September 20, 2024
Home ताज्या पुण्यात महिला राष्ट्रवादी काँग्रेसने घातले गॅस सिलेंडरचे व टू व्हिलर गाडीचे श्राद्ध,...

पुण्यात महिला राष्ट्रवादी काँग्रेसने घातले गॅस सिलेंडरचे व टू व्हिलर गाडीचे श्राद्ध, कोरोनाने वाचलो अन् महागाईने मेलो…राज्यभर राष्ट्रवादीच्या महिलांचे आंदोलन

पुण्यात महिला राष्ट्रवादी काँग्रेसने घातले गॅस सिलेंडरचे व टू व्हिलर गाडीचे श्राद्ध, कोरोनाने वाचलो अन् महागाईने मेलो…राज्यभर राष्ट्रवादीच्या महिलांचे आंदोलन

महागाईपासून मुक्ती आणि अच्छे दिनाचे स्वप्न दाखवणार्‍या केंद्र सरकारचा नोंदवला निषेध

मुंबई/प्रतिनिधी : मोदी सरकारने जनतेला महागाईपासून मुक्तीचे… अच्छे दिन येणार हे स्वप्न दाखवले. देशातल्या जनतेने त्यांच्या आश्वासनांवर विश्वास ठेवून त्यांच्या हातात देश सोपवला परंतु जीवनावश्यक वस्तूंचे दर इतके वाढवले की जनतेला जगण्यापेक्षा मरण स्वस्त वाटू लागले आहे. त्यामुळेच राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात गॅस सिलेंडरचे व टू व्हिलर गाडीचे श्राद्ध घालत निषेध नोंदवण्यात आला.
देशभरात कोरोनाचे अस्मानी संकट असतानाच केंद्रसरकारच्यावतीने महागाईचे सुल्तानी संकट जनतेवर लादण्यात आले आहे.पेट्रोल-डिझेल, स्वयंपाकाचा गॅस, खाद्यतेल अशा सगळ्याच वस्तूंचे दर वाढवून केंद्रसरकारने जनतेचा विश्वासघात केला आहे. यामुळेच अकार्यक्षम केंद्रसरकारचा, व वाढत्या महागाईचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने आज राज्यभर आंदोलन करण्यात आले.
यावेळी पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, विरोधी पक्षनेत्या दिपालीताई धुमाळ, माजी उपमहापौर दिलीप बराटे, महिला शहराध्यक्ष मृणालिणीताई वाणी, नगरसेवक सचिन दोडके, युवक अध्यक्ष महेश हांडे, भावना पाटील, पुनम पाटील, अनिता पवार ,श्वेता होनराव व महिला पदाधिकारी उपस्थिती होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

रोटरी क्लब ऑफ गार्गीजचे अकरावे “यामिनी” प्रदर्शन आजपासून सुरू २०.२१.२२ सप्टेंबर रोजी आयोजित

रोटरी क्लब ऑफ गार्गीजचे अकरावे "यामिनी" प्रदर्शन आजपासून सुरू २०.२१.२२ सप्टेंबर रोजी आयोजित कोल्हापूर/प्रतिनिधी : दसरा दिवाळी जवळ येताच कोल्हापुरच्या जनतेला वेध लागतात ते यामिनी...

पर्यावरण पुरक गणेशोत्सवास सार्वजनिक मंडळांचा उस्फुर्त प्रतिसाद,पोलिस यंत्रणा राबली

पर्यावरण पुरक गणेशोत्सवास सार्वजनिक मंडळांचा उस्फुर्त प्रतिसाद,पोलिस यंत्रणा राबली इराणी खणीमध्ये सार्वजनिक मंडळाच्या १०३५ व घरगुती व मंडळांच्या लहान ११०१ गणेश मूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन कोल्हापूर/प्रतिनिधी :...

श्री सिद्धिविनायक संस्थेची रौप्य महोत्सवी सभा संपन्न

श्री सिद्धिविनायक संस्थेची रौप्य महोत्सवी सभा संपन्न जयसिंगपूर/प्रतिनिधी : श्री.सिद्धिविनायक सहकारी गृहनिर्माण संस्थेची रौप्य महोत्सवी सभा सोसायटीच्या प्रांगणात १५ सप्टेंबर रोजी खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.सभेचे...

स्वामी भक्तांचा शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा

स्वामी भक्तांचा शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा कोल्हापूर/प्रतिनिधी : श्री स्वामी समर्थ भक्त कोल्हापूर शहर व जिल्हा या़ंचेवतीने ज्ञानेश महाराव या इसमाने श्री स्वामी समर्थ महाराजांच्यावर...

Recent Comments