रोहन नलवडे यांना सिव्हिल इंजिनीरिंग विषयामध्ये पीएच.डी
कोल्हापूर/प्रतिनिधी : येथील केआयटी चे अभियांत्रिकी , (स्वायत्त) महाविद्यालयातील स्थापत्य अभियांत्रिकी विभागातील प्राध्यापक रोहन नलवडे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कडून ग्रीन बिल्डींग क्षेत्रामध्ये पीएच.डी जाहीर करण्यात आली. ‘परफॉर्मन्स अससेसमेंट ऑफ ग्रीन रेटेड बिल्ट एनवीरोन्मेन्ट युसिंग पोस्ट ऑक्युपन्सी इव्हाल्युशन’ या विषयाचे संशोधन कॉलेज ऑफ इंजिनीरिंग पुणे येथील डॉ. एस जी सोनार यांच्या मार्गदर्शनामध्ये पूर्ण केले. या संशोधनासाठी सीओईपी संस्थेकडून उपकरण खरेदीसाठी दोन लाखाचा निधी मिळाला. संशोधन विषयावर आधारित प्राध्यापक विकास कार्यक्रमासाठी एआयसीटीइ कडून ३ लाखांचे प्रायोजतव मिळाले तसेच रोहन नलवडे यांनी संशोधनाच्या परिणामांवर आधारित युजीसी मान्यताप्राप्त कौशल्य विकास व्यावसायिक पदविका अभ्यासक्रम देखील केआयटीमध्ये सुरु केला आहे. या संशोधनासाठी व इतर उपक्रमासांठी प्राचार्य डॉ विलास कार्जीन्नी, रजिस्ट्रार डॉ मुजुमदार , विभागप्रमुख एम ए चव्हाण यांचे मोलाचे सहकार्य लाभले.संस्थेचे चेअरमन श्री भरत पाटील , व्हाईस चेअरमन सुनिल कुलकर्णी आणि सचिव दीपक चौगुले यांनी त्यांचे अभिनंदन केले.