स्मशानभूमीतील बेड आणि दफनभूमीतील जागेबाबत संपर्क क्रमांक जाहिर
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर महानगरपालिकेच्या कोणत्या स्मशानभूमीमध्ये किती बेड शिल्लक आहेत तसेच दफनभूमीमध्ये जागा शिल्लकबाबत नागरीकांना माहिती होणेसाठी महापालिकेने संपर्क क्रमांक जाहिर केलेले आहेत. स्मशानभूमीमध्ये अत्यंसंस्कारासाठी येणारे तसेच दफनभूमीत मृतदेह दफन करणेसाठी येणाऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून हि माहिती दिली जाणार आहे. यामध्ये पंचगंगा स्मशानभुमीतील बेडच्या माहितीसाठी आरोग्य निरीक्षक महेश भोसले (०२३१-२५४०४४३/९७६६५३२०४३), कसबा बावडा स्मशानभुमीसाठी आरोग्य निरिक्षक नंदकुमार पाटील (९७६६५३२०४८), कदमवाडी व बापट कॅम्प स्मशानभुमीसाठी आरोग्य निरीक्षक मुनिर फरास (९७६६५३२०५२), बागल चौक दफनभुमीसाठी आरोग्य निरीक्षक राहुल राजगोळकर (९७६६५३२०४०), यांचेशी संपर्क साधले असता माहिती मिळणार आहे. याचबरोबर संपुर्ण शहरासाठी सहायक आरोग्य निरीक्षक अरविंद कांबळे (९७६६५१४६९४) व मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार (९७६६५३२०४४) यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे