Friday, January 10, 2025
Home ताज्या लहान मुलांमधील कोरोना संसर्गाचे प्रमाण लक्षात घेता राज्यात बालरोग तज्ञांचा टास्क फोर्स...

लहान मुलांमधील कोरोना संसर्गाचे प्रमाण लक्षात घेता राज्यात बालरोग तज्ञांचा टास्क फोर्स तातडीने करणार – आरोग्यमंत्री राजेश टोपे

लहान मुलांमधील कोरोना संसर्गाचे प्रमाण लक्षात घेता राज्यात बालरोग तज्ञांचा टास्क फोर्स तातडीने करणार – आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई/प्रतिनिधी : कोरोनाची लागण लहान मुलांमध्ये होत असल्याच्या प्रमाणात वाढ झाल्याचे निदर्शनास येत असून तिसऱ्या लाटेबाबत दिलेली पूर्वसूचना लक्षात घेता राज्यात बालरोग तज्ञांचा टास्क फोर्स करण्यात येईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली. माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना आरोग्यमंत्री बोलत होते. त्यांच्या संवादातील प्रमुख मुद्दे असे:

राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना केला जात आहे. अशातच तिसऱ्या लाटेची देखील पूर्वसूचना मिळाली आहे. हो धोका लक्षात घेऊन त्याच्या प्रतिबंधासाठी शासनाने पावले उचलली आहेत,विशेष करून लहान मुलांमधील संसर्गाचे प्रमाण लक्षात घेता त्यांच्या उपचारासाठी बालरोग तज्ञांचा टास्क फोर्स तातडीने केला जाईल, असे श्री. टोपे यांनी सांगितले. या माध्यमातून लहान मुलांची काळजी आणि उपचार घेण्यासाठी टास्क फोर्स काम करेल.
रुग्णालयातील खाटांची संख्या वाढविणे, बालकांसाठीचे व्हेंटीलेटर्स, एनआयसीयुमधील बेडस् यांची तयारी करण्यात येत असून या सुविधा वाढविण्यावर भर दिला जात आहे. मुख्यमंत्री महोदयांनी देखील गुरूवारी रात्री दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून विविध बालरोग तज्ञांशी संवाद साधला.
महाराष्ट्र लसीकरणात देशात आघाडीवर आहे. १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लसीकरणासाठी पुरेशी लस उपलब्ध नसल्याने लसीकरणाला म्हणावा तसा वेग आला नाहीये. या वयोगटातील सहव्याधी असलेल्या नागरिकांना प्राधान्याने लस देण्याबाबत मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करणार असल्याचे श्री. टोपे यांनी सांगितले.
महाराष्ट्रात रशीयातील स्पुटनिक लस उपलब्ध व्हावी यासाठी रशीयन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड (आरडीआयएफ) यांच्याशी या लसीच्या दराबाबत बोलणी सुरू आहे.
जागतिक निविदेच्या माध्यमातून ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर खरेदी करायची आहे. या यंत्राच्या तांत्रिक बाबी तपासणीसाठी तीन डॉक्टरांची समिती नेमण्यात आली आहे. त्याचबरोबर ३ लाख रेमडेसीवीर इंजेक्शन आयातीसाठी डीसीजीआयच्या मान्यतेने खरेदीसाठी कार्यादेश देण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज कोल्हापूरमध्ये

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज कोल्हापूरमध्ये कोल्हापूर/ (जिमाका) : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे आहे.आज सोमवार,दिनांक ६ जानेवारी २०२५ रोजी...

जनस्वास्थ्य दक्षता समिती व कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ यांच्या वतीने १ ते ६ जानेवारी २०२५ जनस्वास्थ्य अभियान

जनस्वास्थ्य दक्षता समिती व कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ यांच्या वतीने १ ते ६ जानेवारी २०२५ जनस्वास्थ्य अभियान कोल्हापूर/प्रतिनिधी : आरोग्य, पर्यावरण, व्यसनाधीनता आणि वैज्ञानिक दृष्टिकोन...

संजय घोडावत इन्स्टिट्यूट मध्ये खादी ग्रामोद्योग मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न

संजय घोडावत इन्स्टिट्यूट मध्ये खादी ग्रामोद्योग मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न कोल्हापूर/प्रतिनिधी : संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाअंतर्गत विद्यार्थ्यांना सूक्ष्म लघु मध्यम उद्योग मंत्रालय...

घोडावत विद्यापीठात फ्लिप्ड लर्निंग पेडागाॅगी कार्यशाळा संपन्न

घोडावत विद्यापीठात फ्लिप्ड लर्निंग पेडागाॅगी कार्यशाळा संपन्न अतिग्रे/प्रतिनिधी : संजय घोडावत विद्यापीठातील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या वतीने (आय क्यू ए सी) विद्यापीठातील प्राध्यापकांसाठी 'फ्लिप्ड लर्निंग...

Recent Comments