६ ते ८ मे पर्यंत ऑनलाईन अपॉईंटमेंट घेतलेल्या पात्र लाभार्थींचेच कोविशिल्डच्या दुस-या डोसचे आज लसीकरण
कोल्हापूर/प्रतिनिधी : दि. ६ ते ८ मे पर्यंत ऑनलाईन अपॉईंटमेंट घेतलेल्या पात्र लाभार्थींचेच कोविशिल्डच्या दुस-या डोसचे लसीकरण शनिवार दि. ८ मे २०२१ रोजी करण्यात येणार आहे. महापालिकेकडील उपलब्ध लस साठा पाहता वय वर्षे ४५ वरील कोविशिल्डचा पहिला डोस घेतलेल्या नागरीकांचे पूर्ण संरक्षण करणे महात्वाचे आहे. वय वर्षे ४५ च्या पुढील कोविशिल्डच्या दुस-याडोससाठी सर्व पात्र लाभार्थींनी ११ प्राथमिक नागरी आरोग्य केंद्राच्याठिकाणी कोविशिल्डच्या दुस-या डोस देण्यात येणार आहे. यासाठी दिनांक ६ ते ८ मे २०२१ रोजी पर्यंतची ऑनलाईनअपॉईंटमेंट घेतलेल्या पात्र लाभार्थींचेच लसीकरण करण्यात येणार आहे. यासाठी पात्र लाभार्थ्यांना संबंधीत प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रावरुन कोविशिल्डच्या दुस-या डोससाठी फोनयेईल त्या नागरीकांनीच फक्त संबंधीतलसीकरण केंद्रावर वेळेत उपस्थित रहायचे आहे. तसेच १८ ते ४४ वयोगटातील ज्या नागरीकांनी कोविड।पोर्टलवर दिनांक ८/५/२०२१ रोजीची भगवान महावीर दवाखाना विक्रम नगरयेथील ऑनलाईन अपॉईंटमेंट घेतलीआहे अशा नागरीकांनीच वेळेत उपस्थित राहणेचे आहे.