Saturday, December 21, 2024
Home ताज्या ऑक्सिजनचे संशोधन करणाऱ्या प्रा. डॉ. भालचंद्र काकडे यांचे ऑक्सिजनअभावी निधन

ऑक्सिजनचे संशोधन करणाऱ्या प्रा. डॉ. भालचंद्र काकडे यांचे ऑक्सिजनअभावी निधन

ऑक्सिजनचे संशोधन करणाऱ्या प्रा. डॉ. भालचंद्र काकडे यांचे ऑक्सिजनअभावी निधन

कोल्हापूर/प्रतिनिधी : ऑक्सिजनचे संशोधन करणारे जेष्ठ संशोधक प्रा. डॉ. भालचंद्र काकडे यांचे चेन्नई येथे ऑक्सिजनअभावी निधन झाले आहे. रसायनशास्त्रातली उच्चपदवी घेऊन त्यांनी संशोधन सुरू केले होते ऑक्सिजन, हायड्रोजन (oxygen, hydrogen)अशा वायूंपासून इंधनपुरक ऊर्जा निर्माण करून त्याव्दारे रेल्वेही (Railway)धावू शकेल, असे संशोधन त्यांनी सुरू केले आणि जाताजाताच इंधननिर्मिती व प्लॅटिनमच्या विविध संशोधनात (Research of Platinum)आंतरराष्ट्रीय स्तरावर सात पेटंटही मिळवले. ऑक्सिजन क्षेत्रातील हा गुरूतुल्य माणूस कोरोनाचा लक्ष्य ठरला आणि ऑक्सिजनचा सुक्ष्म गुणधर्म शोधणाऱ्या अवलियाला अटीतटीच्या क्षणी ऑक्सिजनच मिळू शकला नाही. यातच चेन्नईत त्यांचा ऑक्सिजनअभावी मृत्यू झाला.
जीवघेण्या आजारात ऑक्सिजनची संजीवनी देऊन जीवदान देणाऱ्या हा दिग्गज संशोधक वयाच्या ४४ व्या वर्षातच ऑक्सिजनच्या कमतरतेचा बळी ठरला, ही आगळी शोकांतिका शिक्षण क्षेत्रालाच नव्हे तर तमाम कोल्हापूरकरांनाही चटका लावणारी आहे.
डॉ. काकडे चेन्नईतील एसआरएम रिसर्च इन्सिट्युटमध्ये कार्यरत होते. त्यांच्या पत्नीही तेथेच संशोधनकार्य करत आहेत. तेथे लॅबमध्ये काही पॉझिटीव्ह रुग्ण सापडल्यानंतर त्यांचीही टेस्ट केली. रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर दोन तीन दिवसांतच त्यांना श्वसनास त्रास सुरू झाला. त्यांच्या विद्यार्थ्यानी शासकीय कोविड सेंटरमध्ये दाखल केले. त्यांना ऑॅक्सिजन, व्हेंटिलेटर, औषधे उपलब्ध करून देण्यासाठी विद्यार्थी धडपड करत राहिले मात्र त्यांना यश मिळाले नाही.ऑक्सिजनच्या दिग्गज संशोधकाला वाचविण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली. पण त्या प्रयत्यांनाही अपयशच पाहावे लागले. डॉ. काकडे हे शिवाजी विद्यापीठातून रसायनशास्त्राची पदवी घेऊन फेलोशीप मिळवून पुण्यातील रासायनिक प्रयोगशाळा, जपानमधील टोकियो इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये इंधननिर्मितीबाबत संशोधन केले. त्यातून निर्माण होणाऱ्या सकारात्मक ऊर्जेने रेल्वे धावू शकेल, याचा ध्यास त्यांनी घेतला होता.वीस वर्षे त्यांनी या संशोधनात व्यतित केली. इतक्यात कोरोनाच्या काळाकुट्ट संसर्गाने त्यांनाच हिरावून नेले आणि कोल्हापूरच्या संशोधकाने जगाचे लक्ष वेधावे, अशा कर्तृत्वाचा संशोधक हिरावल्याचे दुखः पचवावे कसे, अशी भावना संशोधकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद

डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद -डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ अंlतरमहाविद्यालय खो -खो स्पर्धा कोल्हापूर/प्रतिनिधी : डी.वाय.पाटील अभिमत विद्यापीठ अंतर्गत अंlतरमहाविद्यालय खो-खो स्पर्धेत मुलांच्या गटात डी.वाय...

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा ‘श्री गणेशा’ उद्या २० डिसेंबरला होणार प्रदर्शित

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा 'श्री गणेशा' उद्या २० डिसेंबरला होणार प्रदर्शित कोल्हापूर/प्रतिनिधी : कोणत्याही नवीन गोष्टीची सुरुवात 'श्री गणेशा' म्हणून केली जाते. सध्या रसिकांमध्येही अशाच...

विहिंप – बजरंग दलवतीने गीता जयंती निमित्त शौर्य सप्ताहनिमित्त संचलन

विहिंप - बजरंग दलवतीने गीता जयंती निमित्त शौर्य सप्ताहनिमित्त संचलन कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : विश्व हिंदू परिषद - बजरंग दल तर्फे संपुर्ण भारतात दरवर्षी...

जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकिर हुसेन यांचे निधन

जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकिर हुसेन यांचे निधन   कोल्हापूर/प्रतिनिधी : उस्ताद झाकीर हुसेन यांचा जन्म ९ मार्च, १९५१ रोजी झाला होता.तर वयाच्या ७३ व्या वर्षी त्याचे...

Recent Comments