Tuesday, December 3, 2024
Home ताज्या ४५ वर्षावरील कोविशिल्डच्या दुस-याडोससाठी सर्व पात्रलाभार्थ्यांचे महापालिका प्राथमिक नागरी आरोग्यकेंद्रात लसीकरण

४५ वर्षावरील कोविशिल्डच्या दुस-याडोससाठी सर्व पात्रलाभार्थ्यांचे महापालिका प्राथमिक नागरी आरोग्यकेंद्रात लसीकरण

४५ वर्षावरील कोविशिल्डच्या दुस-याडोससाठी सर्व पात्रलाभार्थ्यांचे महापालिका प्राथमिक नागरी आरोग्यकेंद्रात लसीकरण

दिनांक २९ एप्रिल ते ५ मे २०२१पर्यंत ऑनलाईन अपॉईंटमेंट घेतलेल्या पात्र लाभार्थींचेच कोविशिल्डच्या  दुस-या डोसचे होणार लसीकरण

कोल्हापूर/प्रतिनिधी : ४५ वर्षावरील कोविशिल्डच्या दुस-या डोससाठी सर्व पात्र लाभार्थ्यांचे गुरुवार दि.६ मे २०२१ रोजी महापालिकेच्या प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रात लसीकरण करण्यात येणार आहे. यासाठी दिनांक २९ एप्रिल ते ५ मे २०२१ पर्यंत ज्यांनी ऑनलाईन अपॉईंटमेंट घेतलेली आहे. अशा पात्र लाभार्थींचेच कोविशिल्डच्या  दुस-या डोसचे लसीकरण दि.६ मे २०२१ रोजी करण्यात येणार आहे.
४५ वर्षावरील कोविशिल्डचा पहिला डोस घेतलेल्या नागरीकांचे पूर्ण संरक्षण करणे अतिमहत्वाचे आहे. त्यामुळे ४५ वर्षावरील कोविशिल्डच्या दुस-या डोससाठी सर्व पात्र लाभार्थींनी महापालिकेच्या प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र सावित्रीबाई फुले, फिरंगाई, राजारामपूरी, पंचगंगा, कसबा बावडा,महाडिक माळ, आयसोलेशन, फुलेवाडी,सदर बाजार, सिध्दार्थ नगर व मोरे मानेनगर या ठिकाणी कोविशिल्डच्या दुस-याडोसचे लसीकरण करण्यात येणार आहे. यासाठी दिनांक २९ एप्रिल ते ५ मे २०२१ पर्यंतची ऑनलाईन अपॉईंटमेंट घेतलेलीआहे. अशा पात्र लाभार्थींचेचकोविशिल्डच्या दुस-या डोसचे लसीकरण करण्यात येणार आहे. याकरीता पात्रलाभार्थींना संबंधीत प्राथमिक नागरीआरोग्य केंद्रावरुन कोविशिल्डच्या दुस-याडोससाठी फोन येईल त्यांनीच फक्तसंबंधीत लसीकरण केंद्रावर वेळेतउपस्थित रहावे. येताना सोबत आधारकार्ड व फोटो आयडी असलेले कोणतेहीओळखपत्र घेऊन यावे. ज्या ४५ वर्षावरील नागरीकांची ऑनलाईनअपॉईंटमेंट नाही त्यांना लसीकरणकेंद्रावर लस दिली जाणार नाही. त्यामुळेनागरीकांनी लसीकरण केंद्रावर गर्दी करुनये असे आवाहन प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

रविवारी गडहिंग्लज येथे मोफत ह्रदयरोग व वंध्यत्वनिवारण तपसणी शिबीर

रविवारी गडहिंग्लज येथे मोफत ह्रदयरोग व वंध्यत्वनिवारण तपसणी शिबीर कणेरी/प्रतिनिधी : सिद्धगिरी हॉस्पीटल अँड रिसर्च सेंटर कणेरी मठ, यांच्या मार्फत रविवार दिनांक १ डिसेंबर २०२४...

डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या रणजीतला सर्वोत्कृष्ट पोस्टर सादरीकरण

डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या रणजीतला सर्वोत्कृष्ट पोस्टर सादरीकरण पुरस्कार कोल्हापूर/प्रतिनिधी : डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा विद्यार्थी रणजीत सी. पी यांना सर्वोत्कृष्ट पोस्टर सादरीकरणासाठी असोसिएशन...

कोल्हापूर  जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात सायंकाळी 5 पर्यंत सरासरी 67.97 टक्के मतदान

कोल्हापूर  जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात सायंकाळी 5 पर्यंत सरासरी 67.97 टक्के मतदान 273 कागल मतदारसंघात सर्वाधिक सरासरी 74.33 टक्के मतदान कोल्हापूर/प्रतिनिधी  : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024...

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात दुपारी ३ पर्यंत सरासरी ५४.०६ टक्के मतदान

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात दुपारी १ पर्यंत सरासरी ३८.५६ टक्के मतदान करवीर मतदार संघात सर्वाधिक सरासरी ४५.२९ टक्के मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात दुपारी...

Recent Comments