Wednesday, September 11, 2024
Home ताज्या कोल्हापूर जिल्हा गोकुळ दूध संघ साठी ९९.७८% विक्रमी मतदान

कोल्हापूर जिल्हा गोकुळ दूध संघ साठी ९९.७८% विक्रमी मतदान

कोल्हापूर जिल्हा गोकुळ दूध संघ साठी ९९.७८% विक्रमी मतदान

कोल्हापूर/प्रतिनिधी :  कोल्हापूर जिल्हा गोकुळ दूध संघासाठी आज पंचवार्षिक निवडणूक घेण्यात आली २०२१ ते २०२६ या पाच वर्षासाठी ही निवडणुकीची प्रक्रिया पार पडली. कोल्हापूर जिल्ह्यातील बारा तालुक्यातील एकूण ७० मतदान केंद्रांवर ही निवडणुकीची प्रक्रिया पार पडली. अत्यंत चुरशीने पार पडलेल्या या निवडणुकीसाठी आज एकूण ९९.७८ टक्के इतके मतदान झाले. सत्तारूढ आघाडी व विरोधी राजर्षी शाहू शेतकरी आघाडी या दोन आघाड्यांमध्ये ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीसाठी एकूण ३६४७ मतदार होते त्यापैकी ३६३९ मतदारांनी मतदान केले याची एकूण टक्केवारी ही ९९.७८% इतकी झाली यामध्ये स्त्रियांचे प्रमाण हे ८८७ इतके आहे तर २७५२ पुरुष मतदार प्रमाण आहे.
एकूण १२ तालुक्यासाठी
मतदान झाले ते असे – गगनबावडा तालुक्यात एकुण मतदार ७६ होते त्यामध्ये २० स्त्री व ५५ पुरुष मतदार होते त्यातील ७५ जणांनी मतदानाचा हक्क बजावला त्या ठिकाणची एकूण टक्केवारी ही ९८.६८% इतकी झाली.हातकणंगले तालुक्यात एकूण ९५ मतदार होते त्यापैकी २८ स्त्री व ६० पुरुष असे एकूण ९५ जणांनी मतदानाचा हक्क बजावला त्या ठिकाणी टक्केवारीही १०० टक्के झाली. शिरोळ तालुक्यामध्ये एकूण १३३ मतदार होते. त्यापैकी ३५ स्त्री व ९८ पुरुष ही संख्या होती या ठिकाणी १३३ पैकी १३३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला त्याठिकाणी मतदानाची टक्केवारी ही १०० टक्के इतकी झाली. राधानगरी तालुक्यामध्ये ४५८ एकूण मतदार होते. त्यापैकी १११ स्त्री ३४६ पुरुष मतदार त्यापैकी ४५७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्याठिकाणी एकूण मतदानाची टक्केवारी ही ९९.७८%इतकी झाली. तर गडहिंग्लज तालुक्यात २७२ एकूण मतदार होते त्यापैकी ७८ स्त्रिया व १९४ पुरुष मतदार होते त्यातील २७२ पैकी २७२ जणांनी मतदानाचा हक्क बजावला याठिकाणी मतदानाची टक्केवारी १०० टक्के झाली. शाहुवाडी तालुक्यामध्ये २८६ मतदार होते. त्यापैकी एकूण ६४ स्त्री व २२१ पुरुष मतदार होते.त्यापैकी २८५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला या ठिकाणची एकूण टक्केवारी ही ९९.६५% इतकी झाली. पन्हाळा तालुक्यामध्ये एकूण ३५३ मतदार होते त्यापैकी ७६ स्त्री २७७ पुरुष मतदार होते. त्यापैकी ३५३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला या ठिकाणी एकूण १०० टक्के मतदान झाले. आजरा तालुक्यामध्ये २३३ एकुण मतदार संख्या होती त्यापैकी ६० स्त्री १७२ पुरुष मतदार होते. यातील २३२ जणांनी मतदानाचा हक्क बजावला याठिकाणी एकूण मतांची टक्केवारी ९९.५७ टक्के इतकी झाली.करवीर तालुक्यामध्ये ६३९ मतदार होते त्यापैकी १६० स्त्री व ४७९ पुरुष मतदार होते त्या ठिकाणी ६३९ पैकी ६३९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला याठिकाणी मतदानाची एकूण टक्केवारी १०० टक्के इतकी झाली.भुदरगड तालुक्यामध्ये ३७३ मतदार होते त्यापैकी ८९ स्त्री व २८० पुरुष मतदार होते. त्यापैकी ३६९ जणांनी मतदानाचा हक्क बजावला. याठिकाणी एकूण मतदानाची टक्केवारी ९८.९३ टक्के इतकी झाली. चंदगड तालुक्यामध्ये एकूण ३४६ मतदार होते. त्यापैकी ७७ स्त्री २६९ पुरुष मतदार होते या ठिकाणी ३४६ पैकी ३४६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानाचा एकूण टक्केवारी १०० टक्के इतकी झाली. तर कागल तालुक्यामध्ये ३८३ एकुण मतदार संख्या होती त्यातील ८९ स्त्री व २९४ पुरुष संख्या होती यातील ३८३ पैकी ३८३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला या ठिकाणी मतदानाची टक्केवारीही १०० टक्के झाली. यामुळे एकूण बारा तालुक्याची मतदानाची आकडेवारी पाहता ९९. ७८ टक्के इतके विक्रमी मतदान झाले असे म्हणावे लागेल दोन्ही आघाडीच्यावतीने जोरदार शक्तीप्रदर्शन करत या निवडणुकीमध्ये चुरशींने मतदान केले आहे. त्यामुळे कोणाच्या पारड्यात किती मते मिळाली हे ४ मे रोजी रमणमळा शासकीय गोदाम याठिकाणी होणाऱ्या मतमोजणी मध्ये दिसून येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

श्रीमती कल्पना घाटगे या पर्यावरणचा संदेश देत आपल्या घरी ३५ वर्षापासून करत आहेत सुपारीची गणेश पूजा

श्रीमती कल्पना घाटगे या पर्यावरणचा संदेश देत आपल्या घरी ३५ वर्षापासून करत आहेत सुपारीची गणेश पूजा कोल्हापूर/प्रतिनिधी : आज महिला विविध क्षेत्रात आपला नावलौकिक दाखवून...

श्रीमती कल्पना घाटगे या पर्यावरणचा संदेश देत आपल्या घरी ३५ वर्षापासून करत आहेत सुपारीची गणेश पूजा

श्रीमती कल्पना घाटगे या पर्यावरणचा संदेश देत आपल्या घरी ३५ वर्षापासून करत आहेत सुपारीची गणेश पूजा कोल्हापूर/प्रतिनिधी : आज महिला विविध क्षेत्रात आपला नावलौकिक दाखवून...

वकिलीसाठी आत्मविश्वास महत्त्वाचा – ॲड.उज्वल निकम

वकिलीसाठी आत्मविश्वास महत्त्वाचा - ॲड.उज्वल निकम घोडावत विद्यापीठात 'लाॅ' विभागाचे उदघाटन अतिग्रे/प्रतिनिधी : कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वकिली करताना आत्मविश्वास महत्त्वाचा असतो. वाचन आणि कष्टाने कायद्याची...

Recent Comments