Saturday, December 21, 2024
Home ताज्या मंगळवारी कोविड पोर्टलवर ऑनलाईन पध्दतीने पहिल्या व दुस-या डोससाठी अपॉईंटमेंट घेतलेल्या लाभार्थ्यांचेच...

मंगळवारी कोविड पोर्टलवर ऑनलाईन पध्दतीने पहिल्या व दुस-या डोससाठी अपॉईंटमेंट घेतलेल्या लाभार्थ्यांचेच लसीकरण

मंगळवारी कोविड पोर्टलवर ऑनलाईन पध्दतीने पहिल्या व दुस-या डोससाठी अपॉईंटमेंट घेतलेल्या लाभार्थ्यांचेच लसीकरण
कोल्हापूर/प्रतिनिधी : मंगळवार दि.२७ एप्रिल २०२१ रोजी महापालिकेच्या प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रावर कोविड पोर्टलवर ऑनलाईन पध्दतीने पहिल्या व दुस-या डोससाठी अपॉईंटमेंट घेतलेल्या लाभार्थ्यांचेच लसीकरण करण्यात येणार आहे. उपलब्ध साठा पाहता ऑनलाइन अपॉइंटमेंट घेतलेले नागरिक यांचेच लसीकरण करणेत येणार आहे. या व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तिंनी लसीकरण केंद्रावर गर्दी करु नये असे आवाहन प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी केले आहे.
शहरामध्ये आज झालेल्या ११ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रावर व खाजगी हॉस्पिटलमध्ये मिळून एकूण ६,३६८ इतक्या नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. शहरामध्ये आज अखेर १,०५,४०५, इतक्या पात्र लाभार्थ्याना पहिल्या डोसचे तर २२,६४८ इतक्या पात्र लाभार्थ्यांना दुस-या डोसचे लसीकरण करण्यात आले आहे. आजअखेर ४५ वर्षावरील ४७ टक्के नागरीकांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे.
शहरामध्ये आज ११ प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रावर व खाजगी हॉस्पीटलमध्ये मिळूण एकूण ६३६८ नागरीकांना लसीकरण करण्यात आले. यामध्ये प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र सावित्रीबाई फुले येथे ४२५, प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र फिरंगाई येथे ५९२, प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र राजारामपुरी येथे ३९०, प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र पंचगंगा येथे ४६८, प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र कसबा बावडा येथे ६००, प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र महाडिक माळ ४७०, प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र आयसोलेशन येथे ५६२, प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र फुलेवाडी येथे ३७१, प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र सदरबाजार येथे ७०५, प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र सिद्धार्थनगर येथे ३७१, प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र मोरेमाने नगर येथे ५००, सीपीआर येथे ३७५ व उर्वरीत खाजगी हॉस्पीटलमध्ये ५३९ इतक्या नागरीकांचे लसीकरण करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद

डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद -डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ अंlतरमहाविद्यालय खो -खो स्पर्धा कोल्हापूर/प्रतिनिधी : डी.वाय.पाटील अभिमत विद्यापीठ अंतर्गत अंlतरमहाविद्यालय खो-खो स्पर्धेत मुलांच्या गटात डी.वाय...

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा ‘श्री गणेशा’ उद्या २० डिसेंबरला होणार प्रदर्शित

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा 'श्री गणेशा' उद्या २० डिसेंबरला होणार प्रदर्शित कोल्हापूर/प्रतिनिधी : कोणत्याही नवीन गोष्टीची सुरुवात 'श्री गणेशा' म्हणून केली जाते. सध्या रसिकांमध्येही अशाच...

विहिंप – बजरंग दलवतीने गीता जयंती निमित्त शौर्य सप्ताहनिमित्त संचलन

विहिंप - बजरंग दलवतीने गीता जयंती निमित्त शौर्य सप्ताहनिमित्त संचलन कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : विश्व हिंदू परिषद - बजरंग दल तर्फे संपुर्ण भारतात दरवर्षी...

जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकिर हुसेन यांचे निधन

जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकिर हुसेन यांचे निधन   कोल्हापूर/प्रतिनिधी : उस्ताद झाकीर हुसेन यांचा जन्म ९ मार्च, १९५१ रोजी झाला होता.तर वयाच्या ७३ व्या वर्षी त्याचे...

Recent Comments