Saturday, December 21, 2024
Home ताज्या आता स्थगिती मिळवण्यासाठी सत्ताधारी गटाने जागतिक न्यायालयात जाऊ नये - पालकमंत्री सतेज...

आता स्थगिती मिळवण्यासाठी सत्ताधारी गटाने जागतिक न्यायालयात जाऊ नये – पालकमंत्री सतेज पाटील यांचा टोला

आता स्थगिती मिळवण्यासाठी सत्ताधारी गटाने जागतिक न्यायालयात जाऊ नये – पालकमंत्री सतेज पाटील यांचा टोला

कोल्हापूर/प्रतिनिधी : सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा सत्ताधाऱ्यांनी मान राखावा हा लोकशाहीचा विजय आहे. त्यामुळे सर्व नियम पाळून गोकुळचे पंचवार्षिक निवडणूक होणार आहे. मात्र आता स्थगिती मिळवण्यासाठी सत्ताधारी गटाने जागतिक न्यायालयात जाऊ नये असा टोला राजर्षी शाहू शेतकरी आघाडीचे नेते पालकमंत्री सतेज पाटील यांनी पत्रकार बैठकीत लगावला. तर न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करावा असे आवाहनही पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले.
गोकुळच्या निवडणुकीची सुनावणी झाल्यानंतर राजर्षी शाहू शेतकरी आघाडीचे नेते पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी गोकुळचे माजी चेअरमन विश्वास पाटील, माजी संचालक बाबासाहेब चौगुले याच्या उपस्थितीत पत्रकार बैठक घेतली. या पत्रकार बैठकीत बोलतांना पालकमंत्री सतेज पाटील यांनी कोल्हापूर दूध संघाच्या निवडणुकीबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आज झाला. गोकुळ दूध संघाची निवडणूक घेण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने आज झालेल्या सुनावणीत दिला. त्यासाठी ३५ ऐवजी ७० ठिकाणी मतदान बूथ तयार करण्याच्या कोर्टाने सूचना दिल्या आहेत. त्यामुळे आता ही निवडणूक व्यवस्थित पार पडेल अस विश्वास नामदार सतेज पाटील यांनी व्यक्त केला. तर आपल्या देशाने लोकशाहीचा स्वीकार केलेला आहे. लोकशाहीमध्ये निवडणुकीला महत्त्वाचे स्थान आहे. गोकुळ मध्येही निवडणूक व्हावी हीच आमची भूमिका होती न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार मतदान केंद्राची संख्या दुप्पट करून निवडणूक होणार आहे. त्यामुळं सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा सत्ताधाऱ्यांनी मान राखावा आता स्थगिती मिळवण्यासाठी जागतिक न्यायालयात जाऊ नये असा टोला नामदार सतेज पाटील यांनी विरोधकांना या पत्रकार बैठकीत लगावला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद

डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद -डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ अंlतरमहाविद्यालय खो -खो स्पर्धा कोल्हापूर/प्रतिनिधी : डी.वाय.पाटील अभिमत विद्यापीठ अंतर्गत अंlतरमहाविद्यालय खो-खो स्पर्धेत मुलांच्या गटात डी.वाय...

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा ‘श्री गणेशा’ उद्या २० डिसेंबरला होणार प्रदर्शित

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा 'श्री गणेशा' उद्या २० डिसेंबरला होणार प्रदर्शित कोल्हापूर/प्रतिनिधी : कोणत्याही नवीन गोष्टीची सुरुवात 'श्री गणेशा' म्हणून केली जाते. सध्या रसिकांमध्येही अशाच...

विहिंप – बजरंग दलवतीने गीता जयंती निमित्त शौर्य सप्ताहनिमित्त संचलन

विहिंप - बजरंग दलवतीने गीता जयंती निमित्त शौर्य सप्ताहनिमित्त संचलन कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : विश्व हिंदू परिषद - बजरंग दल तर्फे संपुर्ण भारतात दरवर्षी...

जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकिर हुसेन यांचे निधन

जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकिर हुसेन यांचे निधन   कोल्हापूर/प्रतिनिधी : उस्ताद झाकीर हुसेन यांचा जन्म ९ मार्च, १९५१ रोजी झाला होता.तर वयाच्या ७३ व्या वर्षी त्याचे...

Recent Comments