अशोक चराटी गट विरोधी शेतकरी आघाडीसोबत
कोल्हापूर/प्रतिनिधी : गोकुळच्या निवडणुकीत शेतकऱ्यांचे हित लक्षात घेउन विरोधी राजर्षी शाहू शेतकरी आघाडीसोबत राहणार असल्याचे जिल्हा बँक संचालक अशोक चराटी यांनी केले. चराटी गटाच्या ठराव धारक बैठकीत ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील, आ.प्रकाश आबिटकर, माजी आमदार के.पी.पाटील उपस्थित होते .
पालकमंत्री सतेज पाटील यांनी दूध उत्पादकांना दोन रुपये ज्यादा दर देण्यासाठी आम्ही कटिबध्द आहोत . गोकुळ संघ काटकसरीने चालवून शेतकऱ्यांच्या घामाला दाम मिळवून देऊ , असे सांगितले. आ.प्रकाश आबिटकर म्हणाले,अशोक अण्णा यांचा सहकार क्षेत्रातील अनुभव मोठा आहे. त्यांचे पाठबळ या लढाईत आम्हाला महत्वाचे आहे . यावेळी श्रीमती अंजनाताई रेडेकर,डॉ. देशपांडे, उपनगराध्यक्ष विलास नाईक, आजरा नगर पंचायत गटनेते किरण कांबळे, आजरा साखर कारखाना संचालक
दशरथ अमृते ,राजाराम पोतनीस उपस्थित होते .