कोरोनामुळे आजची वाडी रत्नागिरी जोतिबा चैत्र यात्रा रद्द
कोल्हापूर/श्रद्धा जोगळेकर : कोरोनाचा पार्श्वभूमीवर दुसऱ्या वर्षीही वाडी रत्नागिरी येथील ज्योतिबा देवाची उद्या होणारी चैत्र यात्रा रद्द करण्यात आली आहे.मानाच्या सांसणकाठ्या घेऊन येणाऱ्या पाच भविकानाच कोरोना संसर्ग झाल्याने ज्योतिबा देवालयाच्या ठिकाणी रस्त्यारस्त्यांवर कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून कोणत्याही भाविकांना मंदिराच्या ठिकाणी प्रवेश दिला जाणार नाही.यावर्षीही ही यात्रा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द झाल्याने भाविकांमध्ये नाराजी दिसून येत आहे.पन्नास ते साठ वर्षापूर्वी ज्यावेळी प्लेगची साथ आली होती त्यावेळी वाडी रत्नागिरी येथील चैत्र पौर्णिमेची यात्रा ही जोतीबा देवाची यात्रा ही रद्द करण्यात आली होती. मागील वर्षी २०२० साली कोरोनाचा संसर्ग आजार सुरु झाला आणि हा कोरोनाचा संसर्ग अधिक वाढू नये यासाठी ही यात्रा रद्द करण्यात आली होती. आताही एप्रिल २०२१ सालीही कोरोनाचा आजाराचा उद्रेक झाला असून पुन्हा संसर्ग वाढू नये यासाठी आज होणारी ही चैत्र यात्रा रद्द करण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील स्थानिक प्रशासनाने हा निर्णय घेतला असून येथे जोतिबा देवाच्या दर्शनासाठी दर वर्षी एप्रिल महिन्यात चैत्र पौर्णिमेला संपूर्ण महाराष्ट्रातून विविध ठिकाणाहून या जोतिबा देवाच्या दर्शनासाठी भाविक या डोंगरावर दाखल होत असतात अनेक सासनकाठ्या यात्रेच्या निमित्ताने डोंगरावर दाखल होत असतात मात्र गेल्या दोन वर्षापासून कोरोनाच्या आजारामुळे यात्रेवर मोठे संकट निर्माण झाले असून यामुळे असंख्य भाविक जोतिबा देवाच्या यात्रे साठी वाडी रत्नागिरी येथील डोंगरावर दाखल होऊ शकत नसल्याचे चित्र आहे.यात्रेच्या निमीत्ताने दुकानदारांची दुकाने याठिकाणी लावलेली असतात शिवाय खेळणी विक्रेते पाळणी व्यवसायिक यांचाही मोठ्या प्रमाणात व्यवस्था याठिकाणी असते. मात्र गेल्या दोन वर्षांपासून सर्वच ठिकाणच्या यात्रा रद्द करण्यात आल्याने यांच्यावर उदरनिर्वाहाचे संकट निर्माण झाले आहे. शिवाय यांचा व्यवसाय अडचणीत आला आहे एकूणच ही स्थिती भयानक होत चालली असून असंख्य लोक यामुळे मृत्युमुखी पडत चालले आहेत अशा वेळी लोकांचा गर्दी होऊ नये विचार करून ही गर्दी होऊ नये यासाठी अनेक निर्बंध लादले असून यात्रा व अनेक धार्मिक कार्यक्रम राजकीय कार्यक्रम यांना बंदी घालण्यात आली आहे तसेच वाडी रत्नागिरी येथील ज्योतिबा देवाचे यात्रेवर ही निर्बंध घालण्यात आले आहेत.२०२१ साली ही कोरोनाचा उद्रेक झपाट्याने वाढल्याने सर्वच ठिकाणच्या यात्रांना पायबंद घालण्यात आला आहे आणि याचा परिणाम थेट यात्रेमध्ये असणाऱ्या सर्वच घटकांवर झाला असून त्यांच्या व्यवसाय अडचणीत आलेला आहे.वाडी रत्नागिरी येथील ही जोतिबा देवाची यात्रा रद्द झाल्याने भाविकांमध्ये नाराजी तर दिसून येत असून यामुळे मोठ्या प्रमाणात सर्व घटकांचे नुकसान हे झालेले आहे या यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्रातून विविध भागातून भाविक हे एसटी आणि खासगी वाहनाने या डोंगरावर दाखल होत असतात मात्र गेल्या वर्षी आणि यावर्षी यात्रा न झाल्याने कोट्यावधी रुपयांच्या नुकसान तर झाले आहेच शिवाय हजारो भाविकांना दर्शन घेता आलेले नाही.सभी यात्रेच्या निमित्ताने कडेकोट पोलिस बंदोबस्त जोतिबा देवाच्या मार्गावर लावण्यात आला असून उद्या जिल्हाधिकारी यांच्या हस्ते पालकमंत्री यांच्या हस्ते केले जाण्याची शक्यता आहे जोतिबा देवाच्या ठिकाणी दरवर्षी असणारी गर्दी उद्या दिसणार नाही मंदिर परिसरात शुकशुकाट पाहावयास मिळणार आहे.