Wednesday, September 11, 2024
Home ताज्या कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीचे सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंत्यास...

कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीचे सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंत्यास निवेदन सादर

कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीचे सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंत्यास निवेदन सादर

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर शहरातील शिवाजी पूलानजीकच्या पंचगंगा नदी घाट विकास कामासाठी सन २०१७ मध्ये ४ कोटी ४७ लाख रुपयाचा निधी शासनाने दिला होता. त्यास पंचगंगा घाट विकास कामासाठी पुरातत्व विभागाची परवानगी होती. तत्कालीन पालकमंत्री लोकप्रतिनिधी यांच्या हस्ते या कामाचा शुभारंभही झाला होता बांधकाम ठेकेदारांनी कामाची सुरुवातही केलेली होती. पण आज या ठिकाणी कोणतेच विकासकाम झालेले दिसत नाही किंवा चालू असल्याचे आढळत नाही.
पंचगंगा नदी ही कोल्हापुरातील एक नैसर्गिक, धार्मिक व पर्यटकांना आकर्षक
करणारे ठिकाण आहे. अशी पार्श्वभूमी असताना सदरचे विकास काम पूर्ण होणे कोल्हापूरच्या दृष्टीने अतिशय गरजेचे असताना या कामाचा शासनाने दिलेला ४ कोटी ४७ लाखाचा निधी परत गेला आहे आणि आपण काम थांबविले आहे असे आम्हांस समजते. सवब, या निवेदनाद्वारे आम्ही आपणांस असे विचारतो की सदरचे नदीघाट संवर्धन,विकासाचे काम का थांबवाले आहे. ४ कोटी ४७ लाख रुपयाचा निधी शासनाकडे परत गेला काय ? सदरचे काम नेमके कशामुळे बंद पडले आहे. वा विकास कामा विरोधात कोणी तक्रार केली आहे की कायद्याची आडकाठी आणून शहराचा विकास थांबविला आहे.
याचा जाहीर खुलासा आपण करावा व बंद पडलेले काम त्वरीत चालू कराये, अन्यथा
आमच्या शहराच्या विकासाआड शासकीय यंत्रणा खो घलते म्हणून आम्हाला या विरोधी
रस्त्यावर उतरावे लागेल याची नोंद घेऊन सहकार्य करावे अशी मागणी कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीच्या वतीने
कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे करण्यात आली. यावेळी रमेश मोरे, अशोक पवार, भाऊ घोडके, अंजुम देसाई, लहुजी शिंदे, अजित सासने, राजेश वरक, गजानन लिंगम, प्रमोद पुगावकर, सुरेश मिरजकर,किशोर घाडगे, महादेव पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

श्रीमती कल्पना घाटगे या पर्यावरणचा संदेश देत आपल्या घरी ३५ वर्षापासून करत आहेत सुपारीची गणेश पूजा

श्रीमती कल्पना घाटगे या पर्यावरणचा संदेश देत आपल्या घरी ३५ वर्षापासून करत आहेत सुपारीची गणेश पूजा कोल्हापूर/प्रतिनिधी : आज महिला विविध क्षेत्रात आपला नावलौकिक दाखवून...

श्रीमती कल्पना घाटगे या पर्यावरणचा संदेश देत आपल्या घरी ३५ वर्षापासून करत आहेत सुपारीची गणेश पूजा

श्रीमती कल्पना घाटगे या पर्यावरणचा संदेश देत आपल्या घरी ३५ वर्षापासून करत आहेत सुपारीची गणेश पूजा कोल्हापूर/प्रतिनिधी : आज महिला विविध क्षेत्रात आपला नावलौकिक दाखवून...

वकिलीसाठी आत्मविश्वास महत्त्वाचा – ॲड.उज्वल निकम

वकिलीसाठी आत्मविश्वास महत्त्वाचा - ॲड.उज्वल निकम घोडावत विद्यापीठात 'लाॅ' विभागाचे उदघाटन अतिग्रे/प्रतिनिधी : कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वकिली करताना आत्मविश्वास महत्त्वाचा असतो. वाचन आणि कष्टाने कायद्याची...

Recent Comments