आज कोल्हापूर जिल्ह्यात आढळले २८८ कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण शहरात १२७ रुग्ण दिवसभरात चार रुग्णांचा मृत्यू
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आज २८८ कोरोना बाधित रुग्ण आढळले. यातील कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रातील १२७ नव्या कोरोना बाधित रुग्णांचा समावेश आहे रुग्णांची ही वाढती संख्या निश्चितच चिंताजनक आहे. आज चार कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर उपचार घेऊन ८९ रुग्ण घरी गेले आहेत कोल्हापूर जिल्ह्यातील ही आजची आकडेवारी चिंताजनक अशी आहे.
आज आढळलेल्या रुग्णांमध्ये आजरा तालुक्यातील ९, भुदरगड तालुक्यातील १२, गडिंग्लज तालुक्यातून ११, गगनबावडा तालुक्यातील १, हातकणंगले तालुक्यातील १३, कागल तालुक्यात २, करवीर तालुक्यातील २४, पन्हाळा तालुक्यातील १, राधानगरी तालुक्यातील २, शाहूवाडी तालुक्यातील २, शिरोळ तालुक्यातून १६, जिल्ह्यातील नगरपालिका क्षेत्रात आज ४१, कोरोना बाधित रुग्ण आढळून आले. तर बाहेरून राज्यातून आलेल्या २७, कोरोना रुग्णाचा समावेश आहे. कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये आज १२७, कोरोना बाधित रुग्ण आढळून आले.
जिल्ह्यात आजवर ५३ हजार २७३ कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, त्यातील ५० हजार ०११ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर १ हजार ७९८ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला. सध्या १४६४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या ही चिंतेची बाब आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून नागरिकांचा बेजबाबदारपणा यास कारणीभूत ठरत आहे.