जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी जिल्हा बंदीचा आदेश घेतला २४ तासाच्या आत मागे
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्ह्यात येण्यासाठी जिल्हाधिकारी श्री दौलत देसाई यांनी काल मंगळवारी रात्री आरटी पीसिआर टेस्ट अहवाल बंधनकारक केला होता शिवाय आज बुधवारी सकाळी याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली मात्र यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे व टेस्ट साठीही गर्दी होत आहे यामुळे नागरिकांतून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्याने आज बुधवारी ७ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी यांनी हा जिल्हाबंदीचा निर्णय २४ तासाच्या आत मागे घेतला.
कोरोना प्रतिबंधासाठी राज्य शासनाने जाहीर केलेल्या मिनी लॉकडाऊनबाबत कोल्हापूर जिल्ह्यात अजूनही संभ्रमावस्था दिसून येत आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश
बाहेरच्या जिल्ह्यातून कोल्हापूर जिल्ह्यात येणाऱ्यांची होणारी अडवणूक व त्यामुळे नागरिकांना होणारा त्रास यामुळे सर्व स्तरातून संताप व्यक्त झाल्याने अखेर जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी जिल्हा बंदीचा आदेश मागे घेतला.
शहरात व्यवसाय बंद ठेवण्याबाबत अजूनही संभ्रम आहेच. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश राज्य शासनाचे आहेत. त्याच्या अंमलबजावणीसाठी पोलीस, महापालिका, जिल्हा प्रशासन व्यापारी संघटनांवर दबाव आणत आहे. तर संपूर्ण व्यवसाय बंद ठेवण्याबाबत व्यवसायिकांचा संताप वाढत आहे. सर्वसामान्य नागरिकांचीही कुचंबणा होत आहे.हॉटेल बंद ठेवण्याचे आदेश आहेत, तर पार्सल सेवा सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. म्हणजे यावरून ही बंद की चालू असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, पालकमंत्री सतेज पाटील राज्य शासनाकडून इतर व्यवसाय चालू ठेवण्यासाठी परवानगी मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यामुळे व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी पालकमंत्री यांच्या निरोपाची वाट पहात आहेत तरीही आज कोल्हापूर मध्ये सर्व व्यवहार,दुकाने सुरू होती.