ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज रविवारी घेतल्या विविध नेत्याच्या भेटी
कोल्हापूर/प्रतिनिधी : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री सतेज पाटील यांनी माजी खासदार राजू शेट्टी यांच्या घरी भेट घेतली यावेळी मातोश्री श्रीमती रत्नाबाई शेट्टी यांचे आशीर्वाद घेतले याचबरोबर कल्लाप्पान्ना आवाडे व प्रकाश आवाडे, संध्यादेवी कुपेकर यांच्या भेटी घेतल्या. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री सतेज पाटील यांनी रविवारी दि. ४ एप्रिल २०२१ रोजी संध्याकाळी सात वाजता शिरोळ येथे माजी खासदार राजू शेट्टी यांच्या घरी भेट दिली. दरम्यान, श्री शेट्टी हे पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीतील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या उमेदवाराच्या प्रचार दौऱ्यावर असल्यामुळे उपस्थित नव्हते. त्यांच्या मातोश्री श्रीमती रत्नाबाई शेट्टी यांचे या दोन्ही मंत्र्यांनी आशीर्वाद घेतले. चिरंजीव सौरभ शेट्टी , पत्नी सौ. संगीता शेट्टी आदींसह कार्यकर्त्यांनी या मान्यवरांचे स्वागत केले.
यावेळी नगराध्यक्ष अमरसिंह माने- पाटील, अनिल उर्फ सावकार मादनाईक, सचिन शिंदे, राजगोंडा पाटील, नगरसेवक पैलवान प्रकाश गावडे, नगरसेवक तात्या पाटील, मिलिंद साखरपे, सर्जेराव शिंदे, नितीन बागे आदी प्रमुख उपस्थित होते.
आज रविवार दि. ४ एप्रिल २०२१ रोजी सायंकाळी साडेचार वाजता गोकुळ दूध संघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री सतेज पाटील यांनी माजी आमदार श्रीमती संध्यादेवी कुपेकर यांची त्यांच्या कोल्हापुरातील ताराबाई पार्क मधील निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली. मंत्री श्री. मुश्रीफ व मंत्री श्री. पाटील या दोन्ही नेत्यांनी श्रीमती कुपेकर यांनी गोकुळ दूध संघ निवडणुकीत विरोधी राजर्षी शाहू शेतकरी आघाडीला पाठिंबा द्यावा, यासाठी चर्चा केली.
शिरोळच्या दत्त सहकारी साखर कारखान्यावर चेअरमन गणपतराव पाटील यांचीही भेट घेतली.
यावेळी संचालक मंडळातील शेखर पाटील, प्रमोद पाटील, महेंद्र बागी, जयसिंगपूरचे नगरसेवक नितीन बागे, शिरोळ तालुका काँग्रेस अध्यक्ष सर्जेराव शिंदे, शिरोळ तालुका काँग्रेसच्या महिलाध्यक्षा सौ. मीनाज जमादार, शिरोळचे नगराध्यक्ष अमरसिंह माने- पाटील, कुरुंदवाड शहर काँग्रेसचे अध्यक्ष विजय पाटील, अशोकराव कोळेकर, जयसिंगपूरचे नगरसेवक शैलेश चौगुले, अमोल चौगुले, शैलेश आडके, शंकर नाळे, आदी प्रमुख उपस्थित होते.
याचबरोबर
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री सतेज पाटील यांनी घेतली आवाडे पिता -पुत्रांची भेट घेतली रविवार आज ४ एप्रिल २०२१ रोजी सायंकाळी सायंकाळी साडेपाच वाजता गोकुळ दूध संघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री सतेज पाटील यांनी माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे व आमदार प्रकाश आवाडे यांची त्यांच्या इचलकरंजीतील निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली. मंत्री श्री. मुश्रीफ व मंत्री श्री. पाटील या दोन्ही नेत्यांनी आवाडे पिता-पुत्रांनी गोकुळ दूध संघ निवडणुकीत राजर्षी शाहू शेतकरी आघाडीला पाठिंबा द्यावा, यासाठी विनंती केली.
यावेळी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विलासराव गाताडे, प्रकाश सातपुते, नगरसेवक संजय कांबळे, प्रकाश मोरे, नगरसेवक मदन कारंडे, नगरसेवक प्रकाश पाटील, अमित गाताडे, बाळासो कलागते, शशांक बावचकर, पंचायत समितीचे माजी सभापती महेश पाटील. आदी उपस्थित होते.