Friday, November 22, 2024
Home ताज्या क्रिडाई कोल्हापूरच्या अध्यक्षपदी श्री . विद्यानंद बेडेकर यांची फेरनिवड

क्रिडाई कोल्हापूरच्या अध्यक्षपदी श्री . विद्यानंद बेडेकर यांची फेरनिवड

क्रिडाई कोल्हापूरच्या अध्यक्षपदी श्री . विद्यानंद बेडेकर यांची फेरनिवड

कोल्हापूर/प्रतिनिधी : पश्चिम महाराष्ट्रतील बांधकाम व्यावसायिकाची शिखर संघटना असलेली क्रिडाई कोल्हापूरने कॊल्हापूर शहराच्या विकासाबरोबर अनेक सामाजिक उपक्रम राबविलेले आहेत.अशा क्रिडाई कोल्हापूरच्या अध्यक्षपदी बरीच वर्ष बांधकाम क्षेत्रात अग्रेसर असलेले बेडेकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स चे श्री विद्यानंद बेडेकर यांची फेरनिवड करण्यात आली. दि. ३१ मार्च २०२१ रोजी झालेल्या जनरल बॉडी मीटिंगमध्ये सन २०२१-२०२३ सालाकरीता नवीन मॅनेजिंग कमिटीची निवड करण्यात आली. श्री. विद्यानंद बेडेकर यांनी क्रिडाई कोल्हापूर च्या संचालक,सचिव,उपाध्यक्ष,व अध्यक्ष अशा विविध पदांवर गली १२ वर्षे काम केले असून, त्यांनी बांधकाम व्यावसायिकांना येणाऱ्या विविध अडचणीबाबत सरकारी व स्थानिक पातळीवर चांगल्या प्रकारे पाठपुरावा करून, कोल्हापूर शहराचा विकासा बरोबर अनेक सामाजिक उपक्रमात हिरहिरीने भाग घेतलेला आहे.
क्रिडाई कोल्हापूरच्या कामाचा वाढता व्याप पाहून प्रथमच या मॅनेजिंग कमिटीमध्य दोन उपाध्यक्षांची पदे निर्माण करण्यात आली आहेत. अन्य पदाधिकारी पुढील प्रमाणे –
उपाध्यक्षपदी- श्री. प्रकाश देवलापूरकर ( आयोध्या बिल्डर्स ), उपाध्यक्ष – श्री.चेतन वसा (सुरज इस्टेट डेव्हलपर्स ), सचिव – श्री प्रदीप भारमल ( पी .बी. बिल्डर्स अँड डेव्हलपर्स ) , खजानीस – श्री. गौतम परमार ( परमार इन्फ्रा ) , सहसचिव – श्री. श्रीधर कुलकर्णी ( राईट अँगल कन्स्ट्रकशन) , व श्री. निखिल शहा (सिद्धी डेव्हलपर्स ) , सह खजानीस श्री. पवन जामदार ( जे. के. असोसिएट्स ) , मॅनेजिंग कमिटी सदस्य – श्री. के. पी. खोत ( त्रिमूर्ती डेव्हलपर्स ), श्री. श्रेयांस मगदूम ( एस. ए.मगदूम प्रमोटर्स अँड बिल्डर्स ), श्री. संदीप मिरजकर ( गुरुबल बिल्डर्स अँड डेव्हलपर्स ), श्री. सोमराज देशमुख ( देशमुख डेव्हलपमेंट्स ), श्री. अजय डोईजड ( शिवशक्ती डेव्हलपर्स ), श्री. महेश पोवार ( जय कन्स्ट्रकशन ) , श्री. गणेश सावंत (श्रीगणेश बिल्डर्स अँड डेव्हलपर्स ), श्री. लक्ष्मीकांत चौगले ( चौगुले होसमनी कन्स्ट्रकशन ), श्री. श्रीराम पाटील ( श्रीराम बिल्डर्स .
सदर नूतन पदाधिकारी यांचा पदग्रहण कार्यक्रम लवकरच होणार आहे. आजच्या या सभेला क्रिडाई कोल्हापूरचे पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. यानंतर अध्यक्ष श्री. विद्यानंद बेडेकर यांनी सवाचे आभार मानले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

कोल्हापूर  जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात सायंकाळी 5 पर्यंत सरासरी 67.97 टक्के मतदान

कोल्हापूर  जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात सायंकाळी 5 पर्यंत सरासरी 67.97 टक्के मतदान 273 कागल मतदारसंघात सर्वाधिक सरासरी 74.33 टक्के मतदान कोल्हापूर/प्रतिनिधी  : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024...

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात दुपारी ३ पर्यंत सरासरी ५४.०६ टक्के मतदान

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात दुपारी १ पर्यंत सरासरी ३८.५६ टक्के मतदान करवीर मतदार संघात सर्वाधिक सरासरी ४५.२९ टक्के मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात दुपारी...

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदार संघात सकाळी ११ पर्यंत सरासरी २०.५९ टक्के मतदान

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदार संघात सकाळी ११ पर्यंत सरासरी २०.५९ टक्के मतदान २७५ करवीर मतदार संघात सर्वाधिक सरासरी २६.१३ टक्के मतदान कोल्हापूर, दि.२० (जिमाका) :...

गांधीनगरवासियांचे ऋतुराज पाटील यांना भक्कम पाठबळ

गांधीनगरवासियांचे ऋतुराज पाटील यांना भक्कम पाठबळ कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रचारार्थ गांधीनगर येथे काढण्यात आलेल्या पदयात्रेला उदंड...

Recent Comments