कोल्हापूर/ प्रतिनिधी- भारतातील डस्टरच्या प्रवासात नवीन अध्यायाची सुरुवात होणार आहे. जागतिक दर्जाचे इंजिन आणि शक्ती यामुळ सारख्या वैश्विक एसयुव्ही तसेच क्रॉसओव्हर्स यशस्वी ठरल्या असे उदगार रेनो इंडिया मॅनेजिंग डायरेक्टर वेंकटराम मामील्लापले यांनी केलंय.
मामील्लापले म्हणाले, सर्वात आक्रमक वाहन बाजारांत डस्टरने लक्षवेधी दर्जा गाठला आहे. इतक्या वर्षांत साहसी वाहनप्रेमी आणि अनेक भारतीय कुटुंबांनी एक सच्ची एसयुव्हीसोबत बळकट नाते विणले आहे. आक्रमक आणि अधिक शक्तिशाली डस्टरने नक्कीच लक्षावधी लोकांना प्रेरणा दिली असून साहसी प्रवास इच्छुकांची संख्या वाढते आहे. नवनवीन प्रदेश आणि क्षितिजे गाठत एसयुव्ही प्रकाराचा बादशाह असलेले हे नाव ग्राहकांना ड्रायव्हिंगचा सहज अनुभव देते आहे. रेनो इंडियाच्या वतीने 1.3L टर्बो पेट्रोल इंजिन लॉन्चची घोषणा करण्यात आली असून त्यामुळे भारतातील सर्वात यशस्वी एसयुव्ही सर्वशक्तिमान ठरेल. 1.3L टर्बो पेट्रोल इंजिनयुक्त नवीकोरी डस्टर तीन वेरीयंटमध्ये उपलब्ध होणार आहे. असही ते म्हणालेत.