Sunday, December 22, 2024
Home ताज्या काळ्या कृषी कायदयांच्या विरोधात आणि अन्यायकारक इंधन दरवाढीच्या विरोधात काँगेसचे काँग्रेस कमिटी...

काळ्या कृषी कायदयांच्या विरोधात आणि अन्यायकारक इंधन दरवाढीच्या विरोधात काँगेसचे काँग्रेस कमिटी येथे एकदिवसीय उपोषण

काळ्या कृषी कायदयांच्या विरोधात आणि अन्यायकारक इंधन दरवाढीच्या विरोधात काँगेसचे काँग्रेस कमिटी येथे एकदिवसीय उपोषण

कोल्हापूर/प्रतिनिधी : केंद्र सरकारने पारित केलेल्या काळ्या कृषी कायदयांच्या विरोधात आणि अन्यायकारक इंधन दरवाढीच्या विरोधात काँगेसचे जिल्हाध्यक्ष आणि पालकमंत्री सतेज पाटील आणि पक्ष निरीक्षक शिरीष चौधरी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कमिटी येथे एकदिवसीय उपोषण करण्यात आले. या आंदोलनात आमदार प्रा जयंत आसगावकर यांच्यासह काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सहभागी होऊन या शेतकरी विरोधी काळ्या कायद्यांचा आणि इंधन दरवाढीचा निषेध नोंदवला.
केंद्र सरकारने पारित केलेले कृषी कायदे आणि अन्यायकारक इंधन दरवाढीच्या विरोधात शेतकरी संघटनांनी आज भारत बंदची हाक दिलीय. या बंदला काँग्रेस पक्षाने पाठिंबा दिला असून काँग्रेसतर्फे संपूर्ण जिल्ह्यात एकदिवसीय उपोषण करण्यात आले. काँग्रेचे जिल्हाध्यक्ष आणि पालकमंत्री सतेज पाटील, पक्ष निरीक्षक शिरीष चौधरी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कमिटी इथं एकदिवसीय उपोषण करण्यात आले. या उपोषणात प्रा. जयंत आसगावकर, शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी सहभागी झाले होते. केंद्र सरकारने शेतकरी विरोधी कायदे आणल्याने या कायद्यांना देशातील शेतकऱ्यांकडून विरोध होत आहे. हे कायदे केंद्र सरकारने तात्काळ रद्द करावेत या मागणीसाठी दिल्लीच्या सीमांवर मागील ११० दिवसांपासून शेतकरी ठाण मांडून बसलेत. परंतु हे कृषी कायदे केंद्र सरकारने रद्द केले नाहीत. तसेच पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी गॅसवर भरमसाठ कर लावून केंद्र सरकार जनतेच्या खिशावर दरोडा टाकत आहे. पेट्रोल १०० रुपये लिटर तर गॅस सिलिंडर ८५० रुपये झालाय. महागाईने लोकांचे जगणे कठीण झाले आहे. कामगार कायद्यांतील बदलांमुळे कामगार देशोधडीला लागणार आहेत. तर सातत्याने दरवाढ होत असलेल्या गॅस दरवाढीच्या विरोधात प्रतिकात्मक गॅस सिलिंडरचे प्रदर्शन करून या दरवाढीचा निषेध नोंदवला. तर केंद्र सरकारच्या या मनमानी हुकुमशाहीला विरोध करण्यासाठी काँग्रेस पक्षाकडून हे उपोषण करण्यात आले.
देशातील भाजपची सत्ता ही सर्वसामान्यांच्या विरोधातील आहे. सामान्य मध्यमवर्गीय माणसाला महागाईचा फटका बसत आहे. या भाजप सरकारने सामान्यांचे प्रतिनिधीत्व करतो म्हणून देशात सत्ता घेतली मात्र खऱ्या अर्थाने उद्योगपतींचे भले करून सर्वसामान्य आणि मध्यमवर्गीयांना खड्डयात घालण्याचे काम केले आहे. त्यामुळं काँग्रेस पक्षातर्फे केंद्रातील भाजप सरकारला जाग आनण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले असल्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले.
या आंदोलनाला काँगेसचे आमदार पी एन पाटील यांना जिल्हा काँग्रेस कमिटीने उपस्थित राहण्याबाबत निरोप देऊनही ते उपस्थित न राहिल्याने या ठिकाणी त्यांच्या अनुपस्थितीची चर्चा होती. या आंदोलनात आमदार प्रा. जयंत आसगवकर, गुलाबराव घोरपडे, काँगेसचे शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, ऍड. सुरेश कुऱ्हाडे, दिलीप पाटील, माजी नगरसेवक मोहन सालपे, तौफिक मुल्लाणी, सचिन चव्हाण, संजय मोहिते, बाळासाहेब सरनाईक, संध्या घोटणे, सुलोचना नायकवडे, चंदा बेलेकर, करवीर पंचायत समिती सभापती मीनाक्षी पाटील, माजी नगरसेवक सुभाष बुचडे, अर्जुन माने यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद

डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद -डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ अंlतरमहाविद्यालय खो -खो स्पर्धा कोल्हापूर/प्रतिनिधी : डी.वाय.पाटील अभिमत विद्यापीठ अंतर्गत अंlतरमहाविद्यालय खो-खो स्पर्धेत मुलांच्या गटात डी.वाय...

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा ‘श्री गणेशा’ उद्या २० डिसेंबरला होणार प्रदर्शित

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा 'श्री गणेशा' उद्या २० डिसेंबरला होणार प्रदर्शित कोल्हापूर/प्रतिनिधी : कोणत्याही नवीन गोष्टीची सुरुवात 'श्री गणेशा' म्हणून केली जाते. सध्या रसिकांमध्येही अशाच...

विहिंप – बजरंग दलवतीने गीता जयंती निमित्त शौर्य सप्ताहनिमित्त संचलन

विहिंप - बजरंग दलवतीने गीता जयंती निमित्त शौर्य सप्ताहनिमित्त संचलन कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : विश्व हिंदू परिषद - बजरंग दल तर्फे संपुर्ण भारतात दरवर्षी...

जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकिर हुसेन यांचे निधन

जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकिर हुसेन यांचे निधन   कोल्हापूर/प्रतिनिधी : उस्ताद झाकीर हुसेन यांचा जन्म ९ मार्च, १९५१ रोजी झाला होता.तर वयाच्या ७३ व्या वर्षी त्याचे...

Recent Comments