मुंबईच्या महापौर माननीय सौ. किशोरीताई पेडणेकर यांनी इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण घोषणा
मुंबई/प्रतिनिधी : मुंबईच्या महापौर माननीय सौ. किशोरीताई पेडणेकर यांनी आज इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक कूपन कोड(“MumbaiMayor”) घोषित केला आहे. या कूपन कोडच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व
Quill – The Padhai App या ॲपवर उपलब्ध असणारे इयत्ता दहावी व बारावीचे शैक्षणिक साहित्य मोफत उपलब्ध होणार आहे. तसेच राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने(SCERT) अपलोड केलेल्या प्रश्नपेढीची उत्तरे देखील येथे मोफत उपलब्ध आहेत.
हे ॲप टार्गेट प्रकाशनाने विकसित केलेले असून सध्या या ॲपचे एक लाखाहून अधिक सबस्क्रायबर आहेत. डॉ. कल्पना गंगारामाणी यांनी २००६ मध्ये शिक्षणाद्वारे विद्यार्थ्याचे आयुष्य बदलून टाकण्याच्या उद्देशाने टार्गेट प्रकाशनाची स्थापना केली. आजमितीला दोनशेहून अधिक कर्मचारी संख्या असलेले टार्गेट प्रकाशन आपल्या शैक्षणिक उत्पादनांच्या माध्यमातून दर वर्षी लाखो विद्यार्थ्यांशी जोडले जात आहे.
हे मुंबईतील एक अग्रगण्य प्रकाशन असून पूर्व प्राथमिक ते पदव्युत्तर पातळीपर्यंतच्या अनेक विषयांवर मिळून त्यांची ६०० हून अधिक पुस्तके आहेत.यामध्ये बोर्डाच्या शालेय व महाविद्यालयीन अभ्यासक्रमासोबतच स्पर्धा परीक्षांची पुस्तके देखील समाविष्ट आहेत.
आजच Quill – The Padhai App डाउनलोड करा आणि त्याचा अधिकाधिक फायदा मिळवा.