Sunday, December 22, 2024
Home ताज्या युवा नेते ऋतुराज क्षीरसागर यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा वाढदिवसादिनी घेतली विद्यार्थिनीच्या...

युवा नेते ऋतुराज क्षीरसागर यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा वाढदिवसादिनी घेतली विद्यार्थिनीच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी

युवा नेते ऋतुराज क्षीरसागर यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा वाढदिवसादिनी घेतली विद्यार्थिनीच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी

कोल्हापूर/प्रतिनिधी : राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांचे चिरंजीव आणि प्र.क्र.३१ मधून शिवसेनेकडून इच्छुक असलेले उमेदवार, युवा नेते श्री.ऋतुराज क्षीरसागर यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने आणि सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
युवा नेते ऋतुराज क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी युवा सेना कोल्हापूर आणि नो मर्सी ग्रुपच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी कार्यक्रम राबविण्यात येतात. समाजोपयोगी उपक्रम अविरत सुरु ठेवत यावर्षीही ऋतुराज क्षीरसागर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. बजाप माजगांवकर तालीम परिसरातील पंडितराव माजगांवकर यांचे गतवर्षी आकस्मित निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट बनल्याने बजाप माजगांवकर तालीम मंडळाच्या वतीने कै.पंडितराव माजगांवकर यांच्या कुटुंबियांना मदत करण्याचे आवाहन करण्यात आले. त्यानुसार युवा नेते श्री.ऋतुराज क्षीरसागर यांच्यावतीने कु.श्रुती पंडितराव माजगांवकर यांच्या नावे रु.११ हजारांची ठेव ठेवण्यात आली. सदर ठेव पावती श्रीमती जयश्री पंडितराव माजगांवकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. त्याचबरोबर कु.श्रुती हिच्या पुढील संपूर्ण शिक्षणाची जबाबदरी आमदार श्री.राजेश क्षीरसागर फौंडेशनच्या वतीने घेण्यात येत असल्याचे युवा नेते ऋतुराज क्षीरसागर यांनी जाहीर केले. यावेळी बजापमाजगांवकर तालीमीचे ट्रस्टी अध्यक्ष श्री.आनंदराव माजगांवकर, मनोहर पाडळकर, पोपट मुरगुडे, पिंटू भोसले, पप्पू रजपूत, उमाजी कातवरे, आनंदा कुंभार, अक्षय कुंभार, किशोर पाडळकर, प्रसाद ब्रम्ह्पुरे, पप्पू कातवरे, प्रतिक वाडीकर, संग्राम कातवरे आदी उपस्थित होते.
यासह जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून“अभिमान मातेचा, सन्मान मुलींचा” या उपक्रमाअंतर्गत शिवसेना व भगिनी मंचच्या वतीने कोल्हापूर महानगरपालिका प्रभाग क्र.३१ बाजारगेट या प्रभागातील रहिवासी कुटुंबीयात दि.०८ मार्च ते दि.७ एप्रिल २०२१ दरम्यान मुलगी जन्माला आली तर त्या मुलीच्या नावे रु.५ हजारांची ठेव पावती ठेवण्याची संकल्पना राबविण्यात आली आहे. त्यानुसार शुक्रवार पेठ येथील नवजात प्रतिभा शामराव माने हिच्या नांवे रु.५ हजारांची ठेव ठेवून त्याची ठेव पावती युवा नेते ऋतुराज क्षीरसागर यांनी कुटुंबियांना वितरीत केली. यावेळी बबन गवळी, अभिजित गजगेश्वर, सचिन ढणाल, आनंद वासुदेव, आदी उपस्थित होते.
याचबरोबर शिवसेना शाखा लोणार गल्ली यांच्या वतीने बजारगेट परिसरातील महिलांसाठी रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सांयकाळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर, देवस्थान समितीच्या कोषाध्यक्षा सौ.वैशाली क्षीरसागर, युवा नेते पुष्कराज क्षीरसागर शिवसेना, युवा सेना पदाधिकारी,  महिला आघाडी, शिवसैनिक यांच्या उपस्थितीत युवा नेते ऋतुराज क्षीरसागर यांनी केक कापून वाढदिवस साजरा केला. दरम्यान, शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री नाम.मा.श्री.आदित्यजी ठाकरे साहेब, युवा सेनेचे राज्य कार्यकारणी सदस्य वरूण सरदेसाई, पवन जाधव, अमोल किर्तीकर, सुरज चव्हाण, पूर्वेश सरनाईक, साईनाथ दुर्गे यांच्यासह माजी महापौर नंदकुमार मोरे, शहरप्रमुख रविकिरण इंगवले, माजी महापौर मारुतीराव कातवरे, माजी नगरसेवक राजू हुंबे आदींनी श्री.ऋतुराज क्षीरसागर यांना दुरध्वनी व प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या.

- Advertisment -

Most Popular

डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद

डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद -डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ अंlतरमहाविद्यालय खो -खो स्पर्धा कोल्हापूर/प्रतिनिधी : डी.वाय.पाटील अभिमत विद्यापीठ अंतर्गत अंlतरमहाविद्यालय खो-खो स्पर्धेत मुलांच्या गटात डी.वाय...

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा ‘श्री गणेशा’ उद्या २० डिसेंबरला होणार प्रदर्शित

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा 'श्री गणेशा' उद्या २० डिसेंबरला होणार प्रदर्शित कोल्हापूर/प्रतिनिधी : कोणत्याही नवीन गोष्टीची सुरुवात 'श्री गणेशा' म्हणून केली जाते. सध्या रसिकांमध्येही अशाच...

विहिंप – बजरंग दलवतीने गीता जयंती निमित्त शौर्य सप्ताहनिमित्त संचलन

विहिंप - बजरंग दलवतीने गीता जयंती निमित्त शौर्य सप्ताहनिमित्त संचलन कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : विश्व हिंदू परिषद - बजरंग दल तर्फे संपुर्ण भारतात दरवर्षी...

जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकिर हुसेन यांचे निधन

जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकिर हुसेन यांचे निधन   कोल्हापूर/प्रतिनिधी : उस्ताद झाकीर हुसेन यांचा जन्म ९ मार्च, १९५१ रोजी झाला होता.तर वयाच्या ७३ व्या वर्षी त्याचे...

Recent Comments