विशाळगडाच्या विषयाच्या संदर्भात लक्ष घालून मुख्यमंत्र्यांशी पत्रव्यवहार करू ! – आमदार विनय कोरे यांचे विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समितीला आश्वासन
वारणानगर/प्रतिनिधी : विशाळगड येथील अतिक्रमण, मंदिरे-समाधी यांची दुरावस्था, तसेच या संदर्भातील विविध समस्यांविषयी लक्ष घालून मुख्यमंत्री यांच्याशी पत्रव्यवहार करू. यानंतर दोन मासांच्या कालावधीत त्यावर काहीच हालचाल न झाल्यास पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी उपस्थित करू, असे आश्वासन पन्हाळा-शाहूवाडी मतदार संघातील आमदार आणि जनसुराज्य शक्ती पक्षाचे अध्यक्ष श्री. विनय कोरे यांनी दिले. विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समितीचे प्रवक्ता सुनील घनवट यांनी श्री. कोरे यांना या संदर्भात अवगत करून निवेदन सादर केले. त्या वेळी हे आश्वासन त्यांनी दिले.
या वेळी विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समितीचे समन्वयक श्री. किरण दुसे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. आदित्य शास्त्री, श्री. बाबासाहेब भोपळे, श्री. शिवानंद स्वामी, तसेच अन्य उपस्थित होते. ‘विशाळगड येथील मंदिरांचा जिर्णोद्धार करण्यासाठी आमदार फंड उपयोगात आणू’, असेही श्री. कोरे यांनी या वेळी सांगितले.