महास्वच्छता अभियानाचा उद्या १०० वा रविवार
कोल्हापूर/प्रतिनिधी : शहरामध्ये महास्वच्छता अभियानात विविध सेवाभावी संस्थेचे कार्यकर्ते, महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी व नागरीकयांनी सोशल डिस्टंस ठेवून महास्वच्छता मोहिमेत आतापर्यंत सहभाग नोंदविला आहे. या महास्वच्छता मोहिमेचा येत्या रविवार दि.२८ मार्च २०२१ रोजी १०० वा रविवार असून या महास्वच्छता अभियानामध्ये कोल्हापूराती शहरावासीयांनी, सामाजिक संस्थेंनी सहभागी व्हावे असे आवाहन प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी केले आहे.
सदरची स्वच्छता मोहिम तावडे हॉटेल ते मार्केट यार्ड मेनरोड, रंकाळा टॉवर, राजाराम बंधारा, इराणी खण, यल्लमा मंदीर, महालक्ष्मी मंदीर, छ. शाहुमहाराज समाधी स्थळ संपुर्ण परिसर, पंचगंगा नदी घाट परिसर, शिवाजी विद्यापीठ मेन रोड, कोटितिर्थी तलाव, रेल्वेस्टेशन समोरील संपुर्ण परिसर व तांबट कमान या ठिकाणी रविवारी राबविण्यात येणार आहे.