कोल्हापूर महापालिका प्राथमिक शिक्षण समितीचे ५८,०४,२१,९५६ इतके अव्वल शिलकेसह अंदाजपत्रक सादर
कोल्हापूर/प्रतिनिधी : प्राथमिक शिक्षण समितीचे कोल्हापूरचे सन २०२०-२०२१ चे सुधारित व सन २०२१-२०२२ चे नवीन अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ चे कलम ६३ नुसार आयुक्तांच्या समोर प्राथमिक शिक्षण समिती प्रशासनाधिकारी शंकर यादव व उप- आयुक्त १ रविकांत आडसूळ यांनी सादर केले.
प्राथमिक शिक्षण समिती कोल्हापूर महानगरपालिका कोल्हापूर शहरामध्ये एकूण ५८ मनपा प्राथमिक शाळा असून १७ शाळांमधून सेमी इंग्रजी माध्यमाचे वर्ग सुरू आहेत मनपा शाळांसाठी कोल्हापूर महानगरपालिका कोल्हापूरच्या मालिकीच्या ५८ शालेय इमारती उपलब्ध करून देण्यात आल्या असून मनपा प्राथमिक शाळांमध्ये १० हजार ३१२ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत सर २०१९/२० मध्ये शिक्षण समितीकडील मनपा शाळेतील गरीब विद्यार्थ्यांना शालेय गणवेश, सेमी इंग्रजी तसेच मराठी/उर्दू माध्यमांच्या शाळांसाठी आवश्यकतेनुसार शैक्षणिक साहित्य, मॉडेल स्कुलसाठी संगणक इत्यादी सोयी सुविधा पुरविण्यात आलेल्या आहेत त्याचबरोबर व्यक्तिमत्व विकास शिबीर, शिष्यवृत्ती सराव परीक्षा, कोल्हापूर प्रज्ञाशोध परीक्षा, शालेय क्रीडा स्पर्धा,शिक्षकांकरिता आवश्यक प्रशिक्षण इत्यादी उपक्रम राबविण्यात आलेले असून मनपा शाळांचे शिक्षणाचे दर्जामध्ये सुधारणा झालेली असून विशेषतः सेमी इंग्रजी शाळांमध्ये तसेच शाळेतील विद्यार्थ्यांचे गुणवत्तेमध्ये वाढ झालेली आहे. त्यामुळे सेमी इंग्रजी मनपा प्राथमिक शाळांमध्ये आपले पाल्यास प्रवेश मिळविण्यासाठी सर्वसामान्य वर्गाबरोबरच उच्चभ्रू वर्गातील पालक दिसत आहेत त्यामुळे इयत्ता पहिली ते चौथी चे वर्ग बंद आहेत आज करण्यात सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकामधील बाबी अशा आहेत – प्राथमिक शिक्षण समिती महानगरपालिका कोल्हापूर करता सन २०२१-२०२२ साठी शासनाकडे प्रस्तावित तरतूद २१ कोटी ४ लाख २१ हजार ९५६ रुपये मनपा प्रस्तावित तरतूद ३७ कोटीचे एकत्रित नवीन अंदाजपत्रक अव्वल शिलकेसह रक्कम रुपये ५८ कोटी ४ लाख २१ हजार ९५६ चे सादर करण्यात आले. त्यामध्ये सेमी इंग्रजी शाळा, शैक्षणिक सुविधा, इ-लर्निंग सुविधा, संगणक, शिष्यवृत्ती सराव परीक्षा, कोल्हापूर प्रज्ञाशोध परीक्षा, विज्ञान प्रदर्शन,क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, सी एस आर फंड खाते सुरु करण्याचा मानस आहे.
नावीन्यपूर्ण योजना मध्ये शहर स्तरीय दिव्यांग साधन कक्ष यासाठी अंदाजित रक्कम १० कोटी १० लाख इतकी तरतूद करण्यात आलेली आहे. तर राजर्षी छत्रपती शाहू समृद्ध शाळा अभियान यासाठी अंदाजित रक्कम २ कोटी ५० लाख रुपये इतकी तरतूद करण्यात आली आहे. तर मॉडेल स्कूल व बाल वाद्यवृंद निर्मितीसाठी २० लाखांची तरतूद करण्यात आली आहे. सुंदर माझे हस्ताक्षर अभियान मराठी व इंग्रजी यासाठी २ लाखाची तरतूद करण्यात आली आहे. या अंतर्गत मनपा प्राथमिक शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे मराठी व इंग्रजी हस्ताक्षर सुंदर स्वच्छ होण्यासाठी विशेष प्रशिक्षित शिक्षकांमार्फत सर्व मनपा शाळेतील शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. याचबरोबर भाषा कौशल्य विकास अभियानासाठी १ लाख रुपये,गणित झाले सोपे अभियान यासाठी ६ कोटी ५० लाख रुपये छत्रपती ताराराणी स्वसंरक्षण अभियान मुलींच्या साठी यासाठी ३ लाख रुपये इ-लर्निंग सुविधा यासाठी २० लाख रुपये, स्कॉलरशिप परीक्षा इयत्ता पाचवी यासाठी ३ लाख रुपये आणि मनपा विद्यार्थी क्रीडा स्पर्धा व प्रशिक्षण यासाठी एकूण ३ कोटी ५० लाख रुपये अशी तरतूद करण्यात आली आहे.
प्राथमिक शिक्षण समिती महानगरपालिका कोल्हापूरचे सन २०२०-२०२१ चे सुधारित व सन २०२१-२०२२ चे नवीन अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक एकूण रुपये ५८ कोटी ४ लाख २१ हजार ९५६ तयार करण्यात आलेले आहे.
प्राथमिक शिक्षण समिती महानगरपालिका कोल्हापूर मनपा प्राथमिक शाळांमधून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देणे बरोबर त्यांना आवश्यक शैक्षणिक साधने सुविधा पूर्ण क्षमतेने पुरविण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात येत असल्याचे उपायुक्त रविकांत अडसूळ व प्राथमिक शिक्षण समिती प्रशासन अधिकारी शंकर यादव यांनी सांगितले. प्राथमिक शिक्षण समिती महानगरपालिका कोल्हापूरचे सन २०२०-२०२१ चे सुधारित व सन २०२१-२०२२ चे नवीन अर्थसंकल्पीय अंदाज सादर करण्यात आले. कोल्हापूर महानगरपालिका कोल्हापूर चे नवीन अंदाजपत्रकामध्ये मनपा शाळा इमारतीच्या देखभाल दुरुस्तीसाठी भरीव तरतूद करण्यात यावी अशी विनंतीही यावेळी प्रशासन अधिकारी यांनी उप-आयुक्त १ यांनी मनपा प्रशासनाकडे केली आहे.