Monday, July 15, 2024
Home ताज्या विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संशोधन पृथक्करण सुविधांचा संशोधकांनी लाभ घ्यावा: डॉ. राजेंद्र सोनकवडे

विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संशोधन पृथक्करण सुविधांचा संशोधकांनी लाभ घ्यावा: डॉ. राजेंद्र सोनकवडे

विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संशोधन पृथक्करण सुविधांचा संशोधकांनी लाभ घ्यावा: डॉ. राजेंद्र सोनकवडे

कोल्हापूर/प्रतिनिधी :  शिवाजी विद्यापीठाच्या सामान्य सुविधा केंद्रामध्ये अत्याधुनिक संशोधन पृथक्करण उपकरणांची वापराची सुविधा उपलब्ध करण्यात आली असून त्याचा संशोधकांसह विविध उद्योग-व्यवसायांनी लाभ घ्यावा, असे आवाहन विद्यापीठ विज्ञान उपकरण केंद्र व सामान्य सुविधा केंद्राचे प्रमुख डॉ. राजेंद्र सोनकवडे यांनी केले आहे.
डॉ. सोनकवडे यांनी म्हटले आहे की, शिवाजी विद्यापीठात विद्यापीठ अनुदान आयोग, नवी दिल्लीयांच्याद्वारे १९७९ साली ‘विद्यापीठ विज्ञान उपकरण केंद्राची (USIC) उभारणी करण्यात आली. या केंद्रांतर्गतच १९८४ साली ‘सामान्य सुविधा केंद्राची'(सी.एफ.सी.- कॉमन फॅसिलिटी सेंटर) सुरुवात करण्यात आली. संशोधन क्षेत्रातील विविध पदार्थांच्या नमुन्यांच्या पृथक्‍करणाची सुविधा अत्यंत अल्पदरात सर्वांना उपलब्ध करून देणे, विद्यापीठांतर्गत तसेच बहिर्विद्यापीठीय अधिविभाग तसेच संलग्नित महाविद्यालयांतील संशोधक विद्यार्थी, प्राध्यापक, तांत्रिक अधिकारीवृंद यांच्यासाठी कार्यशाळा व प्रशिक्षण कार्यक्रम यांची अंमलबजावणी करणे हा उद्देश ‘सामान्य सुविधा केंद्र’ सुरू करण्यामागे होता. केंद्राची सुरवात अवघ्या चार उपकरणांपासून झाली. आज या केंद्रात अत्याधुनिक, अद्ययावत अशी एकूण १३ उपकरणे आहेत.
या केंद्रात फॉरियर ट्रान्सफॉर्म इन्फ्रारेड स्पेक्र्टोफोटोमीटर (एफटीआयआर), गॅस क्रोमॅटोग्राफी- मास स्पेक्ट्रोमीटर (जीसीएमएस),थर्मल ग्रॅव्हीमॅट्रीक- डिफरन्शियल थर्मल एनालिसीस- डिफरन्शियल स्कॅनिंग कॉलॉरीमीटर (टीजी-डीटीए-डीएससी), इंडक्टीव्हली कपल्ड प्लाझ्मा ऑप्टीकल एमिशन स्पेक्र्टोस्कोप, मायक्रोवेव्ह डायजेस्टीव्ह सिस्टीम, आणि पार्टीकल साइझ एनालायझर विथ झेटा पोटॅन्शियल ही वैज्ञानिक उपकरणे उपलब्ध आहेत. अलिकडेच यांमध्ये अत्यंत अत्याधुनिक अशा एक्स-रे डिफ्रॅक्टोमीटर (एक्सआरडी एडव्हान्स्ड डी-८), व्हेक्टर नेटवर्क अनालायझर (व्हीएनए), अल्ट्रा सेंट्रिफ्युज, बायो-एटॉमिक फोर्स मायक्रोस्कोप (बायो-एएफएम) आणि मायक्रो-रामन स्पेक्र्टोमीटर या उपकरणांची भर पडली आहे. याचबरोबर वैज्ञानिक विश्लेषणासाठी अत्यावश्यक मात्र सर्वांना सहजासहजी उपलब्ध होऊ न शकणारी एक्स-रे फोटोइलेक्ट्रॉन स्पेक्ट्रोस्कोप (एक्सपीएस) आणि ट्रान्समिशन इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप (टीईएम) ही उपकरणेही या केंद्रात उपलब्ध आहेत.
विद्यापीठातील गुणवंत संशोधक विद्यार्थ्यांना सुद्धा येथील उपकरणांच्या हाताळणीचे पूर्वप्रशिक्षण देण्यात येणार असून त्यांच्यावरही देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी सोपवण्याचा उपक्रम प्रगतीपथावर आहे. येथे उपलब्ध असणारी वैशिष्ट्यपूर्ण उपकरणे संशोधक विद्यार्थ्यांसह उद्योग, कारखानदारी, तंत्रज्ञान क्षेत्रांसाठी सुद्धा उपयुक्त आहेत. कुशल व मेहनती मनुष्यबळामुळे परीक्षणासाठी पाठवलेल्या पदार्थांच्या नमुन्यांचे पृथक्करण जास्तीत जास्त अचूक व विश्वसनीयरित्या प्राप्त होऊ शकते. प्रयोगशाळा उपकरणांची स्वच्छता व गुणवत्ता याबाबतही केंद्र सजग आहे.
“परीक्षणासाठी ऑनलाईन बुकिंगचीही सुविधा करणार”
संशोधनांतर्गत विविध पदार्थांच्या नमुन्यांचे पृथक्करण अत्यंत जलद व अल्प दरात उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने सामान्य सुविधा केंद्रात पृथक्करणासाठी ऑनलाईन बुकिंगची व्यवस्था करण्यात येणार आहे. विद्यापीठाच्या संकेतस्थळावरील केंद्राच्या पृष्ठावरच ही सुविधा उपलब्ध करण्यात येईल. देय रक्कम  केंद्राला प्राप्त झाल्यानंतर ऑनलाईन बुकिंगचा संदेश संबंधितास त्यांच्या मोबाईलवर प्राप्त होईल, अशी माहितीही डॉ. सोनकवडे यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

कोल्हापूरमधील प्रसिद्ध व्यावसायिक हेमंत शहा,मदन भंडारी आणि प्रताप कोंडेकर यांनी चक्क ७० दिवसात कोल्हापूर ते लंडन केला २० देशांचा थरारक प्रवास

सेव्ह वॉटर सेव्ह नेचर.... या 'कोल्हापूर ते लंडन' या जनजागृती संदेश यात्रेच्या माध्यमातून कोल्हापूरच्या चार मित्रांनी कोल्हापूरचे नाव कोरले लंडनच्या हृदयावर कोल्हापूरमधील प्रसिद्ध व्यावसायिक हेमंत...

कोल्हापूरच्या उघोग विश्वाची होणार नवी रोजगार उपलब्धीसह विधायक ओळख – व्यवस्थापकीय संचालक तुषार शेळके

जगप्रसिद्ध ब्रीक्स्टन मोटरसायकल्स आणि व्ही एल एफ इलेक्ट्रिक टू-व्हीलर्स भारतात संयुक्त निर्मिती सह वितरीत करण्यासाठी केएस डब्ल्यू वेलोसे मोटर्स सज्ज कोल्हापूरच्या उघोग विश्वाची होणार नवी...

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊनच्या अध्यक्षपदी सौ. अरूंधती महाडिक तर उपाध्यक्षपदी मिरा कुलकर्णी यांची निवड

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊनच्या अध्यक्षपदी सौ. अरूंधती महाडिक तर उपाध्यक्षपदी मिरा कुलकर्णी यांची निवड कोल्हापूर/प्रतिनिधी : रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्या अध्यक्षपदी सौ....

नेहरूनगर येथील दत्त भक्त मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत केली मिरजकर तिकटी येथील अंधशाळेस आर्थिक मदत

नेहरूनगर येथील दत्त भक्त मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत केली मिरजकर तिकटी येथील अंधशाळेस आर्थिक मदत कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर येथील आयसोलेशन हॉस्पिटल परिसरातील श्री दत्त मंदीर...

Recent Comments