के.एम. टी उपक्रमाचा २०२१-२०२२ चे नवीन अंदाजपत्रकीय आराखडा सादर
कोल्हापूर/प्रतिनिधी : के.एम. टी उपक्रमाचा सन २०२०- २०२१ चा सुधारित व सन २०२१-२०२२ चा जमाखर्चाचा महसुली रुपये १ लाख २८ हजार १०० रुपये शिलकीचा नवीन अंदाजपत्रकीय आराखडा पत्रकार परिषदेत प्रशासकीय समिती समोर मान्यतेसाठी सादर करण्यात आला नवीन अंदाजपत्रकीय आराखड्यामध्ये अव्वल शिल्लकेसह महसुली जमा ७१ कोटी १९ लाख ८० हजार १०० रुपये आणि महसुली खर्च रुपये ७१ कोटी १८ लाख ५२ हजार असा रुपये १ लाख २८ हजार १०० रुपये चा शिल्लकेसह भांडवली जमा रुपये १० कोटी २५ लाख ७५ हजार व भांडवली खर्च ९ कोटी ८७ लाख ७५ हजार असा आहे. नवीन अंदाजपत्रकीय आराखड्यामध्ये महापालिकेकडून महसुली खर्चासाठी अर्थसाहाय्य रुपये १४ कोटी भांडवली खर्चासाठी ५० लाख अशी एकूण १४ कोटी ५० लाखाची तरतूद करण्यात आली आहे.सन २०२१-२०२२ चे नवीन अंदाजपत्रकामध्ये केएमटी बस ताफ्यातील १२९ बसेस पैकी १०० बसेस दैनंदिन मार्गस्थ करण्याचे नियोजन असून सदर १०० बसेस प्रवासी तिकीट विक्रीतून मिळालेले उत्पन्न व पे अँन्ड पार्किंग, बसवरील जाहिरात इत्यादी मार्गाने येणार उत्पन्न महसुली जमा करण्यात आले आहे.यामध्ये जमेचा व खर्चाचा आकडा असा आहे वाहतुकीपासून जमा २९ कोटी ४४ लाख ५८ हजार (४२ टक्के) इतर बाबी जमा १० कोटी ८१ लाख ५००० हजार (१६ टक्के) मनपा अर्थसहाय १४ कोटी (२० टक्के) शासन अनुदान मनपा अँडव्हान्स व इतर रुपये १३ कोटी ३४ लाख ७५ हजार (१९ टक्के)प्रवास भाडे तील सवलतीपोटी परतावा रुपये १ कोटी ७९ लाख म्हणजे (३ टक्के) इतके आहे.
नवीन आर्थिक वर्षामध्ये बसेसमध्ये एलईडी टीव्हीद्वारे मनोरंजन व प्रबोधनात्मक कार्यक्रम प्रसारण करून प्रीमियम प्राप्त करणे ,महाऊर्जा माध्यमातून सौर ऊर्जा प्रकल्प, मनपा अर्थसहाय्यातून एमआयडीसी येथील जागा विकसित करणे, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, दिव्यांग, अंध, मतिमंद, मूकबधिर, स्वातंत्र्य सैनिकांच्या विधवा पत्नी आदी घटकांना तिकीट मध्ये देण्यात येणाऱ्या सवलती पोटी परतावा/ अनुदान प्राप्त करणे, आमदार खासदार निधीमधून किमान दोन व महानगरपालिकेच्या महिला बालकल्याण विभागाकडून दोन अशा एकूण चार नवीन मिनीबस महिला व विद्यार्थ्यांसाठी खरेदी करणे आयटीएमएस अंतर्गत ई तिकिटिंग व पास वितरण यंत्रणा अद्ययावत करणे, अलोकेशन सॉफ्टवेअर तयार करणे, आरक्षित जागा केएमटीचे ताब्यात आल्यानंतर व्यापारी दृष्टिकोनातून विकसित करणे व केएमटी/केएमसी स्ववापर व व्यावसायिक वापरासाठी सीएनजी/फ्युएल पंप बसविणे, ऊर्जा संवर्धन पथदर्शी प्रकल्प अंतर्गत जुनी इलेक्ट्रिक उपकरणे बदलून नवीन उपकरणे बसविणे, त्याचबरोबर २०१६ पासून येऊ सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांची ग्रज्युएटी व इतर थकीत देणी देण्यासाठी महत्वपूर्ण बाबींसाठी आवश्यकता तरतूद या अंदाजपत्रकामध्ये करण्यात आल्या आहेत.यावेळी महापालिका सर्व अधिकारी वर्ग उपस्थित होते.