Monday, July 15, 2024
Home ताज्या माणगाव परिषदेच्या ‘मूकनायक’मधील वार्तांकनाचा विविध भाषांत अनुवाद

माणगाव परिषदेच्या ‘मूकनायक’मधील वार्तांकनाचा विविध भाषांत अनुवाद

माणगाव परिषदेच्या ‘मूकनायक’मधील वार्तांकनाचा विविध भाषांत अनुवाद

कोल्हापूर/प्रतिनिधी : मार्च: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘मूकनायक’मध्ये प्रकाशित झालेल्या माणगाव परिषदेच्या वार्तांकनाचा अनुवाद विविध भारतीय तसेच परदेशी भाषांमध्ये करून त्यांचे संकलित पुस्तक शिवाजी विद्यापीठाच्या वतीने प्रकाशित करण्यात येईल, अशी ग्वाही कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी आज येथे दिली.
माणगाव परिषदेचा १०१वा वर्धापन दिन उद्या (दि. २१ मार्च) साजरा होतो आहे. त्याच्या पूर्वसंध्येला कुलगुरू डॉ. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर आणि विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्राचे संचालक डॉ. एस.एस. महाजन यांनी माणगावला भेट देऊन तेथील स्मारकाचे दर्शन घेतले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्या प्रसंगी कुलगुरू डॉ. शिर्के बोलत होते.
कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राष्ट्रीय नेतृत्वाची घोषणा साक्षात राजर्षी शाहू महाराजांनी माणगाव परिषदेत केली. पुढे डॉ. आंबेडकरांनीही महाराजांचे भाकित प्रत्यक्षात उतरविले. त्या दृष्टीने माणगाव परिषद ऐतिहासिक महत्त्वाची ठरते. या परिषदेची सविस्तर माहिती बाबासाहेबांच्या ‘मूकनायक’ या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्यामुळेच आपल्याला मिळू शकली. या परिषदेची ही माहिती विविध भाषिक वाचकांना मिळायला हवी, यासाठी विद्यापीठाच्या डॉ. आंबेडकर संशोधन व विकास केंद्राच्या वतीने या वार्तांकनाचे विविध भारतीय व परदेशी भाषांत अनुवाद करण्याचा प्रकल्प तातडीने हाती घेण्यात येईल.
यावेळी डॉ. महाजन यांनी माणगाव परिषदेचे ऐतिहासिक महत्त्व तसेच परिषदेसाठी माणगावची निवड करण्यामागील राजर्षी शाहू महाराज यांची भूमिका या विषयी सविस्तर माहिती दिली. अनिल माणगावकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. माणगाव बौद्ध समाज अध्यक्ष अरुण शिंगे यांनी आभार मानले.
या भेटी दरम्यान कुलगुरू डॉ. शिर्के व प्र-कुलगुरू डॉ. पाटील यांनी माणगाव येथे उभारण्यात आलेल्या बाबासाहेबांच्या लंडन येथील निवासस्थानाच्या प्रतिरुप निवासस्थानासह माणगाव स्मारकाची पाहणी केली. बाबासाहेबांनी परिषदेच्या वेळी ज्या शाळेत मुक्काम केला होता, त्या शाळेच्या इमारतीसही त्यांनी भेट दिली. अनिल माणगावकर यांनी त्यांना सविस्तर माहिती दिली.
यावेळी माणगाव येथील अनिल कांबळे, शिरीष मधाळे, योगेश सनदी, नंदकुमार शिंगे, पांडुरंग कांबळे, राहुल शिंगे, श्रीकांत चव्हाण, अनिकेत कांबळे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

कोल्हापूरमधील प्रसिद्ध व्यावसायिक हेमंत शहा,मदन भंडारी आणि प्रताप कोंडेकर यांनी चक्क ७० दिवसात कोल्हापूर ते लंडन केला २० देशांचा थरारक प्रवास

सेव्ह वॉटर सेव्ह नेचर.... या 'कोल्हापूर ते लंडन' या जनजागृती संदेश यात्रेच्या माध्यमातून कोल्हापूरच्या चार मित्रांनी कोल्हापूरचे नाव कोरले लंडनच्या हृदयावर कोल्हापूरमधील प्रसिद्ध व्यावसायिक हेमंत...

कोल्हापूरच्या उघोग विश्वाची होणार नवी रोजगार उपलब्धीसह विधायक ओळख – व्यवस्थापकीय संचालक तुषार शेळके

जगप्रसिद्ध ब्रीक्स्टन मोटरसायकल्स आणि व्ही एल एफ इलेक्ट्रिक टू-व्हीलर्स भारतात संयुक्त निर्मिती सह वितरीत करण्यासाठी केएस डब्ल्यू वेलोसे मोटर्स सज्ज कोल्हापूरच्या उघोग विश्वाची होणार नवी...

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊनच्या अध्यक्षपदी सौ. अरूंधती महाडिक तर उपाध्यक्षपदी मिरा कुलकर्णी यांची निवड

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊनच्या अध्यक्षपदी सौ. अरूंधती महाडिक तर उपाध्यक्षपदी मिरा कुलकर्णी यांची निवड कोल्हापूर/प्रतिनिधी : रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्या अध्यक्षपदी सौ....

नेहरूनगर येथील दत्त भक्त मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत केली मिरजकर तिकटी येथील अंधशाळेस आर्थिक मदत

नेहरूनगर येथील दत्त भक्त मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत केली मिरजकर तिकटी येथील अंधशाळेस आर्थिक मदत कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर येथील आयसोलेशन हॉस्पिटल परिसरातील श्री दत्त मंदीर...

Recent Comments