कोरोना रुग्णसंख्या वेळीच रोखावी लागणार
कोल्हापूर/श्रध्दा जोगळेकर : कोरोनाचा वाढता आकडा धोकादायक असून महाराष्ट्राची वाटचाल ही दुसऱ्या लाटेच्या दिशेने चालली असून महाराष्ट्रामध्ये कोरोनाची रुग्ण संख्या दिवसाला आता ३० ते ३५ हजारच्या घरात पोचली असून हा आकडा अत्यंत धोकादायक असून जर हा आकडा असाच वाढत राहिला तर मात्र महाराष्ट्र सरकारला हे रोखणे खूपच अवघड जाणार असून सरकारने आता यावर त्वरित उपाययोजना करणे गरजेचे आहे लोक कशा पद्धतीने घराबाहेर पडत असून लोकांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक झाले आहे. सध्या पर्यटन क्षेत्र खुली करण्यात आली असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोक गर्दी करत आहेत शिवाय एका गावाहून दुसऱ्या गावाला ये-जा करत आहेत त्यांच्याकडून कोणतेही टेस्ट केल्या जात नाहीत त्यामुळे कोरोना झालेले रुग्ण सैरभैर भटकत आहेत त्यामुळे कोरोना झालेल्या अथवा होत असलेल्या लोकांच्या सानिध्यात आलेल्या लोकांची संख्या कळत नसल्याने हा आकडा अधिकच वाढत चालला असून कोरोनाची टेस्ट करणे अत्यंत गरजेचे आहे.टेस्ट वाढविल्या तरच खरी संख्या कळू शकणार आहे टेस्ट केली तर सध्या असणाऱ्या आकडेवारीपेक्षा आणखी संख्या वाढण्याची शक्यता असल्याने सरकारने याकडे लक्ष देऊन त्वरित लोकांवर कडक निर्बंध लावून पर्यटन क्षेत्रे सुरुवातीला बंद करणे अत्यंत आवश्यक झाले आहे मुंबई, नाशिक, नागपूर, औरंगाबाद आदी ठिकाणी कोरोनाचे रुग्ण संख्या अत्यंत वाढत चालली असून गेल्या वर्षी २०२० साली उद्याच्या दिवशी म्हणजेच २१ मार्च रोजी एक दिवसाचा बंद पुकारण्यात आला होता त्यानंतर दोन दिवसाची लोकांना मुदत देण्यात आली होती आणि २४ तारखे पासून पुन्हा लॉक डाऊन करण्यात आले होते. आता काही महिन्यात हा उद्रेक वाढला असून एक वर्ष कालावधी झाला असतानाच पुन्हा कोरोनाच्या रुग्ण संख्येत महाराष्ट्रात तरी वाढ होत चालली आहे त्यामुळे ही वाढ नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकारने त्वरित योग्य ती पावले उचलणे आवश्यक बनले आहे. यावर आता राज्य सरकारने अभ्यास करून योग्य ते निर्बंध लावणे आवश्यक झाले आहे असे बोलले जात आहे. मागील वर्षी २०२० साली २१ मार्च या महिन्यापासून कोरोनाचा संसर्ग अधिक वाढत गेला आणि कोल्हापूरमध्ये पहिला रुग्ण २६ मार्च रोजी सापडला यानंतर एकापेक्षा एक रुग्ण संख्या वाढत गेली आणि कोल्हापूर जिल्ह्याची आकडेवारी हजारोंच्या संख्येने वाढली कालावधी जवळजवळ दिवाळी संपेपर्यंत चालू होता आता डिसेंबर अखेर थोडे थोडे व्यवहार सुरू होत गेले आणि सर्व काही सुरळीत होत गेले असतानाच मात्र पुन्हा आता मार्च महिन्यामध्ये कोरोनाचे रुग्ण संख्या दिवसाला हजारोंच्या पट्टीत आकडा वाढत चालला असून अभ्यास करण्याची वेळ आता राज्य सरकारवर आली असून लोकांनी ही तेवढ्याच जबाबदारीने मास्क लावून गर्दीमध्ये न जाणे टाळणे आवश्यक आहे.सध्या कोरोनाचा कालावधी सुरू होऊन एक वर्ष उलटले आहे उद्या २१ मार्च रोजी याला एक वर्ष होणार आहेत आणि आता पुन्हा २१ मार्च २०२१ आली पुन्हा राज्य सरकारची वाटचाल कोरोनाच्या वाढत्या संख्येच्या दिशेने निघाली असून ही संख्या जर अशीच वाढत गेली तर मात्र कोरोना घराघरात पोहोचला वेळ लागणार नाही त्यामुळे प्रत्येक माणसाने जबाबदारी पूर्वक मास्क लावणे, गर्दीत न जाणे एकमेकांच्या हातात हात न देणे,वृद्ध लोकांना ही घराबाहेर न काढणे, लहान मुलांची काळजी घेणे हे सर्व जबाबदारी पूर्वक करणे आता सध्या तरी आवश्यक बनले आहे.