Saturday, December 21, 2024
Home ताज्या बीओटी तत्वावरील कोल्हापूर ते सांगली रस्ता चौपदरीकरणाच्या कामास गती द्यावी सार्वजनिक बांधकाम...

बीओटी तत्वावरील कोल्हापूर ते सांगली रस्ता चौपदरीकरणाच्या कामास गती द्यावी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

बीओटी तत्वावरील कोल्हापूर ते सांगली रस्ता चौपदरीकरणाच्या कामास गती द्यावी
सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

मुंबई/प्रतिनिधी : खाजगीकरणांतर्गत्‍ बांधा वापरा हस्तांतरित करावयाच्या तत्वावर करण्यात येणारे कोल्हापूर (शिरोली) ते सागंली रस्त्याच्या चौपदरीकरणाचे कामास गती द्यावी. शासनाची मान्यता घेऊन संबंधीत रस्त्यांचे काम तातडीने सुरू करण्यासाठी धोरण ठरविण्यात यावे असे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.
बीओटी तत्वावर कोल्हापूर (शिरोली) ते सांगली रस्त्याच्या चौपदरीकरणासंदर्भात आज मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्यमंत्री यांनी संबंधित अधिका-यांना सुचना दिल्या. या बैठकीत सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागाचे एस साळुंखे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे प्रकल्प व्यवस्थापक पंदरकर, अधिक्षक अभियंता एस. माने, भारतीय राष्‌टरीय राजमार्ग प्राधिकरणचे कार्यकारी व्यवस्थापक एम.के. वाठोरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपसचिव श्रीमती प्रज्ञा वाळके आदीसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
नुकत्याच शासनाच्या निर्णयानुसार संबंधित रस्त्याची लांबी राष्ट्रीय महामार्ग झाले असल्याने हे काम केंद्र शासनास हस्तांतरित करण्यात आले होते. हस्तांतरीत लांबीत राष्‌ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून महामार्ग काँक्रीटीकरणाचे व सुधारण्याची कामे प्रगतीत असल्याची माहिती यावेळी अधिका-यांनी दिली.
संबंधित पुढील रस्त्याच्या चौपदरीकरणासंदर्भातील कामासाठी शासनाची तातडीने मान्यता घेऊन धोरण ठरविण्यात यावे. व या कामास गती द्यावी असे राज्यमंत्री भरणे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद

डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद -डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ अंlतरमहाविद्यालय खो -खो स्पर्धा कोल्हापूर/प्रतिनिधी : डी.वाय.पाटील अभिमत विद्यापीठ अंतर्गत अंlतरमहाविद्यालय खो-खो स्पर्धेत मुलांच्या गटात डी.वाय...

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा ‘श्री गणेशा’ उद्या २० डिसेंबरला होणार प्रदर्शित

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा 'श्री गणेशा' उद्या २० डिसेंबरला होणार प्रदर्शित कोल्हापूर/प्रतिनिधी : कोणत्याही नवीन गोष्टीची सुरुवात 'श्री गणेशा' म्हणून केली जाते. सध्या रसिकांमध्येही अशाच...

विहिंप – बजरंग दलवतीने गीता जयंती निमित्त शौर्य सप्ताहनिमित्त संचलन

विहिंप - बजरंग दलवतीने गीता जयंती निमित्त शौर्य सप्ताहनिमित्त संचलन कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : विश्व हिंदू परिषद - बजरंग दल तर्फे संपुर्ण भारतात दरवर्षी...

जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकिर हुसेन यांचे निधन

जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकिर हुसेन यांचे निधन   कोल्हापूर/प्रतिनिधी : उस्ताद झाकीर हुसेन यांचा जन्म ९ मार्च, १९५१ रोजी झाला होता.तर वयाच्या ७३ व्या वर्षी त्याचे...

Recent Comments