Friday, July 19, 2024
Home ताज्या बादशाहभाईंनी आयुष्यभर आपली तत्वे जपली - आ. पृथ्वीराज चव्हाण

बादशाहभाईंनी आयुष्यभर आपली तत्वे जपली – आ. पृथ्वीराज चव्हाण

बादशाहभाईंनी आयुष्यभर आपली तत्वे जपली – आ. पृथ्वीराज चव्हाण

कराड/प्रतिनिधी : जेष्ठ स्वातंत्र्यसैनिक कराड नगरीचे माजी नगरसेवक तथा बांधकाम सभापती बादशाहभाई अल्ली मुल्ला यांचे वृद्धापकाळाने वयाच्या ९० व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्याकरिता माजी मुख्यमंत्री तथा कराड दक्षिणचे विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी बादशाहभाई यांच्या भाजी मंडई परिसरातील घरी भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस उपाध्यक्ष शिवराज मोरे, कराड शहर काँग्रेस अध्यक्ष नगरसेवक राजेंद्र माने, इंद्रजीत गुजर, माजी नगरसेवक अशोकराव पाटील, युवानेते इंद्रजीत चव्हाण, माजी नगरसेवक श्रीकांत मुळे, नुरुल बादशाह मुल्ला, साबीर मुल्ला, वसिम सय्यद, उस्मान गणी मुल्ला, नितीन ओसवाल आदी यावेळी उपस्थित होते.
याप्रसंगी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले कि, समाजवादी विचारांचा पगडा असलेल्या बाद्शाहभाई यांनी गोवा मुक्ती संग्रामात सहभाग घेतला होता. त्यांनी आयुष्यभर आपली तत्वे जपत जीवन व्यतीत केले हे त्यांच्या राजकीय जीवनात सुद्धा अनुभवाला मिळाले. मुस्लिम समाजाचे नेतृत्व करीत ते समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी कायम अग्रेसर असायचे.
राजकीय जीवनात कार्यरत असताना कोणत्याही पदाची-सत्तेची अपेक्षा न ठेवता फक्त जनतेसाठी त्यांनी आपले आयुष्य खर्ची घातले. सलग तीन वेळा त्यांनी भाजी मंडई परिसरातून कराड नगरपरिषदेसाठी प्रतिनिधित्व केले होते आणि २ वेळा त्यांनी बांधकाम सभापती पद यशस्वीपणे सांभाळले असले तरी त्यांचे राहणीमान शेवटपर्यंत अत्यंत साधे होते. बादशाहभाईंनी आयुष्यभर जी तत्वे व विचार जपले त्याचे आयुष्यभर सर्वांनी पालन केले तरच ती त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल असेही प्रतिपादन यावेळी आ पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

घोडावत विद्यापीठतील फार्मसी विभागाच्या विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीमध्ये निवड

घोडावत विद्यापीठतील फार्मसी विभागाच्या विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीमध्ये निवड किमया शिंदे व अरिहंत परमाज यांना साडेपाच लाखाचे पॅकेज अतिग्रे/प्रतिनिधी :संजय घोडावत विद्यापीठाने शिक्षण क्ष्रेत्रात अल्पावधीतच आपले नाव...

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये डॉ. सुहास देशमुख यांचे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये डॉ. सुहास देशमुख यांचे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन कोल्हापूर/प्रतिनिधी : जागतिक युवा कौशल्य दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांतर्गत डॉ. सुहास देशमुख, संचालक, राष्ट्रीय...

हेल्थ इन्श्युरन्स संकल्पनांचे स्पष्टीकरण

हेल्थ इन्श्युरन्स संकल्पनांचे स्पष्टीकरण श्री. भास्कर नेरुरकर हेड - हेल्थ ॲडमिनिस्ट्रेशन टीम, बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स. तांत्रिक डोमेन आणि कायदेशीर करार असल्यामुळे बहुतांश इन्श्युरन्स संकल्पना या...

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सीपीआर भूमिपूजन व जिल्हा बँक नूतन इमारतीच्या उद्घाटनासाठी कोल्हापुरात येणार

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सीपीआर भूमिपूजन व जिल्हा बँक नूतन इमारतीच्या उद्घाटनासाठी कोल्हापुरात येणार जुलै अखेरीस किंवा ऑगस्ट पहिल्या आठवड्यात होणार कार्यक्रम,दहा हजार वृक्ष लावण्याची...

Recent Comments