Tuesday, October 15, 2024
Home ताज्या हॅशटॅग प्रेम’चा ट्रेलर प्रदर्शित...

हॅशटॅग प्रेम’चा ट्रेलर प्रदर्शित…

हॅशटॅग प्रेम’चा ट्रेलर प्रदर्शित…

कोल्हापूर/प्रतिनिधी : आजच्या फेसबुक आणि ट्विटरच्या जमान्यात तरूणाईची भाषाही काहीशी चिन्हांकीत झाली आहे. बोलीभाषेतही आता सोशल मीडियावरील शब्द आणि चिन्हांचा वापर होऊ लागला आहे, त्यामुळे कित्येकदा जणू काही प्रेमालाही सोशल मीडियाचा स्पर्श झाल्याचं पाहायला मिळत आहे. याचंच प्रतिबिंब आता रूपेरी पडद्यावरही उमटणार आहे. ‘हॅशटॅग प्रेम’ हे अनोखं टायटल असलेला मराठी सिनेमा येत्या १९ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या सिनेमाचा लक्षवेधी ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला असून ‘हॅशटॅग प्रेम’ या चित्रपटाबाबतची उत्कंठा प्रचंड वाढली आहे.
शीर्षकावरूनच ‘हॅशटॅग प्रेम’ ही प्रेमकथा असल्याचं सहज लक्षात येतं. यासोबतच यात आजच्या युगातील प्रेमाच्या गुलाबी रंगाची उधळण करण्यात आली असल्याचीही जाणीव होते. मिताली मयेकर आणि सुयश टिळक ही नवी कोरी जोडी आणि त्यांची केमिस्ट्री रसिकांना सिनेमागृहांपर्यंत खेचून आणण्यासाठी पुरेशी असून् हीच या सिनेमाची मुख्य खासियत आहे. याची झलक ‘हॅशटॅग प्रेम’च्या ट्रेलरमध्ये पहायला मिळते. दोघांमधील मैत्री आणि प्रेमाचं नातं अधोरेखित करत हा ट्रेलर कथानकातील इतरही घटनांवर प्रकाश टाकतो. निर्माते अनिल गोविंद पाटील यांनी माऊली फिल्म प्रोडक्शनच्या बॅनरखाली ‘हॅशटॅग प्रेम’ची निर्मिती केली असून, वितरक समीर दीक्षित आणि ऋषिकेश भिरंगी यांची अचूक साथ लाभल्यानं हा सिनेमा पिकल एंटरटेनमेंटच्या सहकार्यानं रसिक दरबारी प्रस्तुत केला जाणार आहे. दिग्दर्शक राजेश बाळकृष्ण जाधव यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.     या सिनेमात मुख्य भूमिकेत एका फ्रेश जोडीची आवश्यकता असल्यानं सुयश आणि मितालीची निवड करण्यात आल्याचं दिग्दर्शक राजेश बाळकृष्ण जाधव यांचं म्हणणं आहे. दोघांनीही अफलातून काम केलं आहे. ‘हॅशटॅग प्रेम’ ही सुद्धा एक प्रेमकथा असली तरी यात प्रेमाचे विविध पैलू उलगडून दाखवण्यात आले आहेत. प्रेमासोबतच इतर नातेसंबंधांचाही विचार या सिनेमात करण्यात आला आहे. आजच्या तरूणाईसोबतच संपूर्ण कुटुंबासाठी या सिनेमात एक महत्त्वपूर्ण संदेश दडलेला असल्याचं दिग्दर्शक राजेश बाळकृष्ण जाधव यांनी स्पष्ट केलं. निर्माते म्हणून मराठी सिनेमा बनवताना आपलीही काहीतरी जबाबदारी असल्याची जाणीव मनात ठेवून ‘हॅशटॅग प्रेम’ तयार करण्यात आल्याचं निर्माते अनिल गोविंद पाटील यांचं मत आहे. केवळ प्रेमकथा न देता त्या जोडीला आजच्या पिढीपर्यंत एक मेसेज पोहोचवण्याचा हा प्रयत्न आहे. निर्मितीमूल्यांमध्ये कुठेही काटकसर न करता एक दर्जेदार कलाकृती बनवण्याच्या विचारातून ‘हॅशटॅग प्रेम’ची निर्मिती केल्याचंही पाटील म्हणाले.
‘हॅशटॅग प्रेम’ हे सिनेमाचं शीर्षक लक्ष वेधून घेणारं असून, एका नव्या जोडीची केमिस्ट्री हा या सिनेमाचा प्लस पॉइंट ठरणार आहे. निखिल कटारे यांनी या सिनेमाची कथा आणि पटकथा लिहिली आहे. सिनेमातील गीतांनी प्रविण कुवर यांचे संगीत लाभले असून गायक-संगीतकार रोहित राऊतनं पार्श्वसंगीत दिलं आहे. या सिनेमाचे कार्यकारी निर्माते महेश भारंबे असून कला दिग्दर्शनाची बाजू केशव ठाकूर यांनी सांभाळली आहे. सिनेमॅटोग्राफी राजा फडतरे यांची असून येत्या आज १९ मार्च ला ‘हॅशटॅग प्रेम’ संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

जयश्री चंद्रकात (आण्णा) जाधव फाऊंडेशन आयोजित रास दांडियाला उत्स्फूर्त प्रतिसाद

जयश्री चंद्रकात (आण्णा) जाधव फाऊंडेशन आयोजित रास दांडियाला उत्स्फूर्त प्रतिसाद डेलिया ग्रुप प्रथम : जैना ओसवाल गरबा क्वीनची मानकरी : महिलांनी लुटला नृत्याचा आनंद कोल्हापूर/प्रतिनिधी :...

संजय घोडावत यांना एज्युकेशन आयकॉन पुरस्कार

संजय घोडावत यांना एज्युकेशन आयकॉन पुरस्कार अतिग्रे/प्रतिनिधी : शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल संजय घोडावत यांना एज्युकेशन टुडे संस्थेच्या वतीने यावर्षीचा एज्युकेशन आयकॉन पुरस्कार मुंबई...

धडाकेबाज रोमँटिक अ‍ॅक्शनपट ‘नाद – द हार्ड लव्ह’ २५ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार

धडाकेबाज रोमँटिक अ‍ॅक्शनपट 'नाद - द हार्ड लव्ह' २५ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार कोल्हापूर/प्रतिनिधी : २५ ऑक्टोबरला एक धडाकेबाज रोमँटिक अ‍ॅक्शनपट मराठी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.तो...

११ ऑक्टोबर रोजी कोल्हापुरात १२ जिल्ह्यातील शेतकऱ्यांची राज्यव्यापी निर्धार परिषद

शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समिती, महाराष्ट्र ११ ऑक्टोबर रोजी कोल्हापुरात १२ जिल्ह्यातील शेतकऱ्यांची राज्यव्यापी निर्धार परिषद कोल्हापूर/प्रतिनिधी : शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समिती, महाराष्ट्र वतीने जिल्ह्यातील...

Recent Comments