Thursday, October 24, 2024
Home ताज्या विश्वविक्रमवीर डॉ.अथर्वचा पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते सत्कार संपन्न

विश्वविक्रमवीर डॉ.अथर्वचा पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते सत्कार संपन्न

कोल्हापूर/प्रतिनिधी :
टोप संभापुर ता हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथील विश्वविक्रमवीर डॉ.अथर्वने वयाच्या 14 व्या वर्षी 30 नोव्हेंबर 2019 रोजी बारा तासात 296 किलोमीटर अंतर सायकलिंग मध्ये पूर्ण करून  कोल्हापूरमध्ये विश्वविक्रम केला होता. याची दखल घेऊन द डायसेस ऑफ एशिया इन इंडिया चेन्नई तामिळनाडू  यांच्याकडून त्याला डॉकटरेट इन एथलेटिक ही पदवी बहाल केली होती.अथर्वला सायकलिंगमध्ये ही डॉक्टरेट मिळाल्याबद्दल आज भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 73 व्या वर्धापनदिनानिमित्त
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री श्री. सतेज पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा मुख्य सोहळा पार पडला यावेळी डॉ अथर्व गोंधळी याचा पालकमंत्री श्री.सतेज पाटील यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला.व यावेळी पालकमंत्री यांनी डॉ. अथर्वला पढील कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या.
       डॉ अथर्व हा लहानपणापासून विविध खेळांमध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय यश मिळवत आला आहे.2019 मध्ये ताय क्वांनदो,कुडो,सायकलिंग, ट्रायलिथॉन अशा विविध खेळांमध्ये त्यांने  पारितोषिके पटकावली आहेत.सध्याही तो विविध खेळांमध्ये अग्रेसर आहे.सायकलिंगमध्ये त्याने केलेल्या विश्वविक्रमाची नोंद ही
ग्लोबल रेकॉर्ड, चिर्ल्डन वर्ल्ड ऑफ रेकॉर्ड,एशिया पॅसिफिक रेकॉर्ड आणि नॅशनल रेकॉर्ड असे 6 विक्रमांमध्ये झाली होती.याचीच दखल ही
द डायसेस ऑफ एशिया इन इंडिया चेन्नई तामिळनाडू  यांनी घेऊन त्याला डॉकटरेट इन एथलेटिक ही पदवी बहाल केली होती.त्यामुळे आज त्याचा पालकमंत्री श्री.सतेज पाटील यांनी सत्कार केला.
         यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील, खासदार संजय मंडलिक, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार ऋतुराज पाटील, महापौर निलोफर आजरेकर, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

अफाट कर्तृत्वाच्या जोरावर तरुणांना शिक्षणाची दारे शिक्षण संस्थांच्या माध्यमातून खुली करून देणारे डॉ. डी.वाय. पाटील.

अफाट कर्तृत्वाच्या जोरावर तरुणांना शिक्षणाची दारे शिक्षण संस्थांच्या माध्यमातून खुली करून देणारे डॉ. डी.वाय. पाटील. कोल्हापूर/प्रतिनिधी : आपल्या अफाट कर्तृत्वाच्या जोरावर तरुणांना शिक्षणाची दारे आपल्या...

गोकुळ’ची गोबरसे समृद्धी कार्बन क्रेडीट बायोगॅस योजना

‘गोकुळ’ची गोबरसे समृद्धी कार्बन क्रेडीट बायोगॅस योजना बायोगॅसचा दुसरा टप्पा सुरु : नवीन ४००० बायोगॅस मंजूर या योजनेचा दूध उत्पादकांनी लाभ घेण्याचे चेअरमन अरुण डोंगळे यांचे...

“कर्मयोगी आबासाहेब” चित्रपटाचा ट्रेलर लाँच

"कर्मयोगी आबासाहेब" चित्रपटाचा ट्रेलर लाँच २५ ऑक्टोबर रोजी मराठीसह हिंदी भाषेत चित्रपट होणार प्रदर्शित कोल्हापूर/प्रतिनिधी :राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्त्व देणारे दमदार आमदार, राज्याचे कॅबिनेट मंत्री राहिलेल्या स्वर्गीय...

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर इव्हॉल्वकडून हेल्पर्स ऑफ द हॅंडीकॅपच्या १० शिक्षकांचा “बिल्डर्स ऑफ नेशन” ने सन्मान

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर इव्हॉल्वकडून हेल्पर्स ऑफ द हॅंडीकॅपच्या १० शिक्षकांचा "बिल्डर्स ऑफ नेशन" ने सन्मान कोल्हापूर/प्रतिनिधी : दिव्यांग विद्यार्थ्यांच्या जीवनात स्वाभिमान पेरणाऱ्या 'हेल्पर्स ऑफ...

Recent Comments