नव्या पद्धतीची दुसरी शॉप शाहूपुरी बेकर गल्ली येथे सुरू
कोल्हापूर /प्रतिनिधी : शिक्षण जरी जास्त असले तरी कोणाला कशातही आवड असू शकते अशीच आवड सानेगुरुजी वसाहत येथील दिलावर जमादार यांच्या आटोमोबाईल इंजिनियर असलेला परवेज जमादार व शिक्षक असलेला सोहेल जमादार या दोन मुलांना अँनिमल प्लॅनेट अँक्वारियम या माशांची पेटी तयार करून फिश टॅक व विविध रंगीत माशांचे प्रकार विक्री करण्याची आहे.
या दोन मुलांचे वडील दिलावर नबीसो जमादार व त्यांचे वडील नबीसो कासीम जमादार व त्यांचे वडील कासीम मोहीद्दीन जमादार यांच्या परंपरेने हा व्यवसाय चालत आलेला आहे आणि आता परवेज व सोहेल हे दोघेही सानेगुरुजी वसाहत व न्यू शाहूपुरी बेकर गल्ली येथे विविध प्रकारच्या इंपोर्टेड फिश टॅक स्वतः बनवून त्यांची शॉपच्या माध्यमातून विक्री अगदी लोकांना परवडेल अशा दरात सुरू केली आहे.
माशांची पेटी अथवा माशांची विक्री करणे हा वीस वर्षापासून चालत आलेला व्यवसाय शिकलेली मुलं ही चौथी पिढी सांभाळत आहेत. जमादार कुटुंबीय यांची चौथी पिढी माशांचा व्यवसाय ही करत आहे. एखाद्या व्यक्तीला आवड असली की तो काहीही करू शकतो वीस वर्षांपूर्वी वाशिम मोहिद्दिन जमादार यांनी केलेल्या अँनिमल प्लॅनेट अँक्वारियम हा व्यवसाय नव्या पद्धतीने चालविला जात आहे. घरातून सुरू असलेला हा व्यवसाय दिलावर जमादार यांनी तीन वर्षांपूर्वी सानेगुरुजी वसाहत येथे शॉप टाकून सुरू केला दिलावर यांना फोटोग्राफीचीही आवड आहे त्यांनी छायाचित्रकार म्हणूनही काम केले आहे आणि आता त्यांच्या शिक्षित परवेज आणि सोहेल या दोन मुलानी काल 1 सप्टेंबर पासून न्यू शाहूपुरी बेकर गल्ली येथे दुसरी शॉप आणखी नव्या पद्धतीने सुरू केली आहे.
याठिकाणी वॉटरफॉल फिशटॅक उपलब्ध करण्यात आले आहेत. जे कोल्हापूर मध्ये कोठेही नाहीत शिवाय इम्पोर्टेड फिशटॅक, रंगीत माशांचे विविध प्रकार, खाद्य उपलब्ध त्यांनी केली आहेत अशी माहिती दिलावर जमादार यांनी दिली आहे या शॉप चे उदघाटन भागाचे नगरसेवक श्री रत्नेश शिराळकर व नगरसेवक श्री.तौफिक मुल्लाणी यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन मिरासो जमादार यांनी केले होते.या कार्यक्रमास वाशिम मुजावर, रशीद चित्तेवान, झाकिर स्वार,नासर धारवाडकर, सलीम मोगल, दिलावर पठाण, फरीद जमादार, श्री चोपडे, सुरज देशमुख,अल्लनसीर जाहगीरदार, शब्बीर शेख आदी उपस्थित होते.