Tuesday, January 21, 2025
Home ताज्या पोलंड, हंगेरी, झेक प्रजासत्ताक व स्लोव्हाकीया या चार मध्यपूर्व युरोपियन राष्ट्रांची विशेष...

पोलंड, हंगेरी, झेक प्रजासत्ताक व स्लोव्हाकीया या चार मध्यपूर्व युरोपियन राष्ट्रांची विशेष कार्यक्रमास खा.संभाजीराजे छत्रपती यांची उपस्थिती

पोलंड, हंगेरी, झेक प्रजासत्ताक व स्लोव्हाकीया या चार मध्यपूर्व युरोपियन राष्ट्रांची विशेष कार्यक्रमास खा.संभाजीराजे छत्रपती यांची उपस्थिती

कोल्हापूर/प्रतिनिधी : पोलंड, हंगेरी, झेक प्रजासत्ताक व स्लोव्हाकीया या चार मध्यपूर्व युरोपियन राष्ट्रांची युती आहे. याला ‘दि विसेग्राड ग्रुप’ किंवा ‘व्ही ४ ‘या नावानेही ओळखले जाते. परस्परांमधील सांस्कृतिक व राजकीय संबंध वृद्धिंगत व्हावेत, या उद्देशाने या चार राष्ट्रांनी एकत्र येत १९९१ साली या ग्रुपची स्थापना केली. नुकतीच या ग्रुपच्या स्थापनेस ३० वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने दिल्ली येथे या चारही राष्ट्रांच्या दूतावासांनी संयुक्तपणे विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमास खासदार संभाजीराजे छत्रपती यांना विशेष निमंत्रित करण्यात आले होते. यानिमित्त खासदार संभाजीराजे यांनी दिल्ली येथे झालेल्या या कार्यक्रमास उपस्थित राहून चारही राष्ट्रांना शुभेच्छा दिल्या.यावेळी या कार्यक्रमास युरोपीयन युनियनचे भारतातील राजदूत उगो अस्टुटो, पोलंडचे राजदूत अडम बुराकोवस्की,हंगेरीचे राजदूत अँड्रस् किरली,स्लोव्हाकियाचे राजदूत इव्हान लँकारिक,झेक प्रजासत्ताक चे राजदूत मिलान होवोर्का यांचेसह परराष्ट्र मंत्रालयाचे पश्चिम सचिव श्री विकास स्वरूप, परराष्ट्र मंत्रालयाचे आर्थिक संबंध विभागाचे सचिव श्री राहूल छाब्रा, भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे महासंचालक श्री दिनेश पटनाईक हे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

कंदमूळ आणि औषधी वनस्पतींचा ठेवा जपणं आवश्यक; खासदार धनंजय महाडिक

कंदमूळ आणि औषधी वनस्पतींचा ठेवा जपणं आवश्यक; खासदार धनंजय महाडिक कोल्हापूर / प्रतिनिधी : आपल्या भारतामध्ये जे रामायण आणि महाभारतापासून औषधी वनस्पती आणि कंदमुळे आहेत...

मेरे कैलासा,तेरे दिवाने या संगीतमय कार्यक्रमाचे आज देवल क्लब येथे आयोजन

मेरे कैलासा,तेरे दिवाने या संगीतमय कार्यक्रमाचे आज देवल क्लब येथे आयोजन कोल्हापूर/प्रतिनिधी : आज सोमवार २० जानेवारी २०२५ रोजी, गोविंदराव टेंबे रंगमंदिर,देवल क्लब कोल्हापूर येथे...

साळोखेनगरच्या डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला ”नॅक”कडून मानांकन

साळोखेनगरच्या डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला ''नॅक"कडून मानांकन -डॉ ए.के. गुप्ता यांची माहिती : पहिल्याच प्रयत्नात पाच वर्षासाठी मानांकन साळोखेनगर/प्रतिनिधी : डी. वाय. पाटील प्रतिष्ठानच्या...

मेरीट स्कॉलरशिप’ मुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला चालना – डॉ. संजय डी. पाटील

‘मेरीट स्कॉलरशिप’ मुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला चालना – डॉ. संजय डी. पाटील -डी. वाय. पाटील ग्रुपमधील १८८ विद्यार्थ्यांना ‘सौ.शांतादेवी डी. पाटील मेरीट स्कॉलरशिप’ प्रदान कोल्हापूर/प्रतिनिधी : सौ...

Recent Comments