Monday, January 20, 2025
Home ताज्या मेरे कैलासा,तेरे दिवाने या संगीतमय कार्यक्रमाचे आज देवल क्लब येथे आयोजन

मेरे कैलासा,तेरे दिवाने या संगीतमय कार्यक्रमाचे आज देवल क्लब येथे आयोजन

मेरे कैलासा,तेरे दिवाने या संगीतमय कार्यक्रमाचे आज देवल क्लब येथे आयोजन

कोल्हापूर/प्रतिनिधी : आज सोमवार २० जानेवारी २०२५ रोजी, गोविंदराव टेंबे रंगमंदिर,देवल क्लब कोल्हापूर येथे सादर होणाऱ्या, मेरे कैलासा,तेरे दिवाने या संगीतमय कार्यक्रमाविषयी माहिती गायक जितेंद्र पंडीत, संगीत संयोजक विशाल प्रकाश, गुरूप्रसाद कुलकर्णी यांनी पत्रकारांशी संवाद साधला आणि दिली.प्रतिथयश गायक कैलाश खेर यांनी गायलेल्या गाण्यांचा आविष्कार गायक जितेंद्र पंडीत सादर करणार आहेत. मूळचे कोल्हापूरचे असणारे जितेंद्र पंडीत यांनी मुंबई, पुणे,गोवा, बेंगळुरू इ. ठिकाणी सुप्रसिद्ध सेलीब्रेटींसोबत कार्यक्रम सादर केले आहेत.त्यांचे प्रायव्हेट अल्बम प्रसिद्ध झाले आहेत. शिवाय बॉलिवूडमध्ये सुध्दा त्यांनी प्रवेश केला आहे. या कार्यक्रमाचे मुंबई,गोवा, या ठिकाणी शो झाले आहेत. त्याला मोठा प्रतिसाद मिळालेला आहे. कोल्हापूर मध्ये या संकल्पनेवर आधारित असा शो प्रथमच सादर होत आहे. या कार्यक्रमासाठी संगीत संयोजन विशाल प्रकाश यांनी केले आहे. कार्यक्रमाची संकल्पना गुरुप्रसाद कुलकर्णी यांची असून पब्लिसिटी संजय लोंढे, वैभव एंटरप्रायजेस यांनी केली आहे.स्पिरीच्युएल शो ही संकल्पना प्रथमच कोल्हापूरात सादर होत आहे, हा कार्यक्रम नक्कीच रसिकांना वेगळा अनुभव देईल.त्याचा सर्व रसिक प्रेक्षकांनी लाभ घ्यावा, असे संयोजकानी आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

मेरे कैलासा,तेरे दिवाने या संगीतमय कार्यक्रमाचे आज देवल क्लब येथे आयोजन

मेरे कैलासा,तेरे दिवाने या संगीतमय कार्यक्रमाचे आज देवल क्लब येथे आयोजन कोल्हापूर/प्रतिनिधी : आज सोमवार २० जानेवारी २०२५ रोजी, गोविंदराव टेंबे रंगमंदिर,देवल क्लब कोल्हापूर येथे...

साळोखेनगरच्या डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला ”नॅक”कडून मानांकन

साळोखेनगरच्या डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला ''नॅक"कडून मानांकन -डॉ ए.के. गुप्ता यांची माहिती : पहिल्याच प्रयत्नात पाच वर्षासाठी मानांकन साळोखेनगर/प्रतिनिधी : डी. वाय. पाटील प्रतिष्ठानच्या...

मेरीट स्कॉलरशिप’ मुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला चालना – डॉ. संजय डी. पाटील

‘मेरीट स्कॉलरशिप’ मुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला चालना – डॉ. संजय डी. पाटील -डी. वाय. पाटील ग्रुपमधील १८८ विद्यार्थ्यांना ‘सौ.शांतादेवी डी. पाटील मेरीट स्कॉलरशिप’ प्रदान कोल्हापूर/प्रतिनिधी : सौ...

Recent Comments