महिला दिनाचे औचित्य साधून जोतिबा भाविकांसाठी रानतुळस व करपुरातुळस बियाणे वाटप
कोल्हापूर/प्रतिनिधी : ८ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जोतिबा भाविकांसाठी रानतुळस व करपुरातुळस बियाणे वाटप करण्यात आली हा उपक्रम करण्यासाठी सुनिता माने यांनी विशेष प्रयत्न केले. यावेळी काही महिला भाविक भक्तांनी सुनिता माने यांच्या कार्याचे कौतुक करून करपुरातुळस व रानतुळस याची लागवड आपल्या परिसरात करू असे अभिवचन दिले. रान तुळस व करपुरा तुळस बियाणे ज्योतिबा महिला भाविक भक्तांच्या मार्फत मुंबई, पुणे, नाशिक, बेळगाव, मलकापूर, कोल्हापूर, गडहिंग्लज, पंढरपूर सोलापूर या परिसरात पाठविण्यात आले.
रानतुळस व करपुरा तुळस याची लागवड श्री बाळूमामा वृक्षारोपण संकल्प केरली द्वारा वृक्षमित्र पंडित माने व सुनिता माने यांनी पंचक्रोशीत मोठ्या प्रमाणात केलेली आहे. डोंगरावरून संपूर्ण महाराष्ट्रात मोहीम राबवण्याचा मानस सुनिता माने व पंडित माने यांचा आहे. या कार्याला जोतिबा पुजारी समाजाकडून मोठे सहकार्य लाभत आहे. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी मा. सरपंच शिवाजीराव सांगळे (ज्योतिबा डोंगर), दिलीप लांढे (अध्यक्ष ज्योतिबा व्यापारी असोसिएशन), ज्योतिबा पत्रकार संघ (ज्योतिबा), पत्रकार संघ (जोतिबा),करवीर पत्रकार संघ शहाजी पाटील यांचे मोठे सहकार्य लाभले.