Tuesday, October 22, 2024
Home ग्लोबल अपघातविरहीत वाहतुकीसाठी ट्रॅक्टरच्या ट्रेलरला ब्रेक सिस्टिम

अपघातविरहीत वाहतुकीसाठी ट्रॅक्टरच्या ट्रेलरला ब्रेक सिस्टिम

कोल्हापूर,  – गेल्या काही वर्षांपासून शेतीमधील यांत्रिकीकरणाने गती घेतली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील शेती उद्योगाचे चित्र बदलून गेले आहे. शेतकरी बांधवांच्या दारात बैलजोडीइतकीच ट्रॅक्टर -ट्रेलरची जोडीही दिसत आहे. मात्र, यात ट्रॅक्टरच्या ट्रेलरला ब्रेक सिस्टिम नसल्याने अपघातांचे प्रमाणही कायम आहे. यात अडथळा ठरणाऱ्या तांत्रिक बाबींवर उपाययोजना करत इंडस्ट्रियल आणि डिफेन्ससाठी ट्रेलर बनवणाऱ्या कॅपुलम इंजिनिअरिंगने नवे इनोव्हेशन केले आहे. ट्रॅक्टरबरोबरच गरजेनुसार ट्रेलरला ब्रेक लावणारी प्रणाली विकसित केली आहे. या प्रणालीला ट्रॅक्टर उत्पादक कंपन्यांसह आरटीओंकडूनही परवाना मिळाल्याने ट्रॅक्टर-ट्रेलर वाहतूक अधिक सुरक्षित होण्यास मदत होणार आहे, अशी माहिती कॅपुलम इंजिनिअरिंगचे योगीराज गदो यांनी आज दिली.
ते म्हणाले, भारतातील कृषिप्रधान व्यवस्थेत ट्रॅक्टरला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यातही महाराष्ट्रासारख्या साखर उद्योगात अग्रेसर असलेल्या राज्यात, पश्चिम महाराष्ट्रात उसाच्या शेतीने जोर धरल्यापासून ट्रॅक्टर-ट्रेलरची जोडी दिसते. साखर कारखान्यांचा हंगाम सुरू झाला की रस्त्याने जातानाही अनेक ट्रॅक्टर आणि उसाने खच्चून भरलेले दोन-दोन ट्रेलर डुलत डुलत नागमोडी चालीने जाताना दिसतात. मुळात ट्रॅक्टर चालविणे आणि त्याचे नियंत्रण ठेवणे हे अवघड काम. त्यातही ट्रेलरमध्ये भरपूर मालवाहतूक करणारे ट्रॅक्टर नेहमीच दिसतात. हे दृश्य अनेकदा छातीचा ठोका चुकवणारेही असते. अशा प्रकारच्या वाहतुकीमध्ये अपघाताचा धोका नक्कीच अधिक असतो. देशामध्ये सध्या ट्रेलरला ब्रेक नाहीत. त्यामुळे ट्रॅक्टरचा ब्रेक लावल्यानंतर ट्रेलरवर सहजपणे नियंत्रण मिळवता येत नाही. त्यातून अपघातांचे प्रमाण वाढते. ग्रामीण भागात यांचा वापर अधिक होत असल्याने ट्रॅक्टर आणि ब्रेक नसलेल्या ट्रेलरमुळे होणारे अपघात तेथेच जास्त होतात. त्यामुळे सरकारने २०१२ – १३ मध्ये आरटीओंकडून हायड्रॉलिक ब्रेक नसलेल्या ट्रॉलीला पासिंग देण्याचे बंद करण्यात आले होते. उत्पादकांच्या विरोधानंतर ही बंदी उठविण्यात आली. तरीही केंद्र सरकारकडील उपलब्ध माहितीनुसार, ट्रॅक्टर-ट्रेलरच्या प्रत्येक आठ फेऱ्यांमागे एक असे साधारण ट्रेलर उलटण्याचे (पलटी) होण्याचे प्रमाण आहे.
त्यांनी सांगितले, कॅपुलम इंजिनिअरिंग या इंडस्ट्रियल आणि डिफेन्ससाठी ट्रेलर बनवणाऱ्या कंपनीने यात लक्ष घालायचे ठरवले. आपला २५ वर्षांचा अनुभव वापरून पलटी न होणारा व ट्रॅक्टरच्या ब्रेकबरोबर ट्रेलरचेही ब्रेक लागतील, अशी सिस्टिम असलेला ट्रेलर बनविण्यात आला. हा ट्रेलरची कोल्हापूर, पंढरपूर, दौंड येथील विविध साखर कारखान्यांत चाचणी करण्यात आल्या. तेथून आलेल्या समाधानकारक प्रतिसादाची खात्री केली. आता या ट्रेलरला रस्त्यावर वापरण्यासाठी लागणारा आरटीओचा परवानाही मिळाला आहे. त्यामुळे ट्रेलरचा इन्शुरन्सही करायला अडचण येत नाही.
दरम्यान, मराठा चेंबर ऑफ कॉमर्सने कॅपुलमच्या या नवीन ट्रेलरमधील सिस्टिम आणि त्याच्या उपयुक्ततेची दखल घेऊन उत्कृष्ट उत्पादनासाठी असलेले पारितोषिकही दिले आहे. किंमतही बाजारात उपलब्ध असलेल्या उत्कृष्ट ट्रेलरपेक्षा फक्त वीस हजार रुपयांनी जास्त आणि तीही खऱ्या असणाऱ्या डिस्क ब्रेकसाठी. याची आणखी खासियत म्हणजे ट्रेलर जागा सोडताना किंवा थांबताना झटका बसत नाही. त्यामुळे हौद्याला इजा पोहोचत नाही.
कॅपुलम इंजिनीअरिंगने तयार केलेल्या या ट्रेलरचे डिझाईन ट्रॅक्टर उद्योगातील अग्रगण्य महिंद्रा कंपनीला आवडल्यामुळे त्यांनी कॅपुलमला आपली डिस्ट्रिब्युटरशिप देऊन त्यांच्या डीलरमार्फत सर्व्हिसिंगची सोय केली आहे.  अशा अपघात टाळण्यास मदत करणाऱ्या बहुगुणी ट्रेलरला आपलेसे करून शेतकरी आपल्या अनेक चिंतांमधून मुक्ती मिळवू शकतील यात शंका नाही, असाही दावाही योगीराज गदो यांनी यावेळी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

अफाट कर्तृत्वाच्या जोरावर तरुणांना शिक्षणाची दारे शिक्षण संस्थांच्या माध्यमातून खुली करून देणारे डॉ. डी.वाय. पाटील.

अफाट कर्तृत्वाच्या जोरावर तरुणांना शिक्षणाची दारे शिक्षण संस्थांच्या माध्यमातून खुली करून देणारे डॉ. डी.वाय. पाटील. कोल्हापूर/प्रतिनिधी : आपल्या अफाट कर्तृत्वाच्या जोरावर तरुणांना शिक्षणाची दारे आपल्या...

गोकुळ’ची गोबरसे समृद्धी कार्बन क्रेडीट बायोगॅस योजना

‘गोकुळ’ची गोबरसे समृद्धी कार्बन क्रेडीट बायोगॅस योजना बायोगॅसचा दुसरा टप्पा सुरु : नवीन ४००० बायोगॅस मंजूर या योजनेचा दूध उत्पादकांनी लाभ घेण्याचे चेअरमन अरुण डोंगळे यांचे...

“कर्मयोगी आबासाहेब” चित्रपटाचा ट्रेलर लाँच

"कर्मयोगी आबासाहेब" चित्रपटाचा ट्रेलर लाँच २५ ऑक्टोबर रोजी मराठीसह हिंदी भाषेत चित्रपट होणार प्रदर्शित कोल्हापूर/प्रतिनिधी :राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्त्व देणारे दमदार आमदार, राज्याचे कॅबिनेट मंत्री राहिलेल्या स्वर्गीय...

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर इव्हॉल्वकडून हेल्पर्स ऑफ द हॅंडीकॅपच्या १० शिक्षकांचा “बिल्डर्स ऑफ नेशन” ने सन्मान

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर इव्हॉल्वकडून हेल्पर्स ऑफ द हॅंडीकॅपच्या १० शिक्षकांचा "बिल्डर्स ऑफ नेशन" ने सन्मान कोल्हापूर/प्रतिनिधी : दिव्यांग विद्यार्थ्यांच्या जीवनात स्वाभिमान पेरणाऱ्या 'हेल्पर्स ऑफ...

Recent Comments