Thursday, December 26, 2024
Home ताज्या शिवसेनेच्या दणक्याने ब्रम्हपुरी येथील बेकायदेशीर काम बंद बेकायदेशीर कामास संतप्त महिलांनी...

शिवसेनेच्या दणक्याने ब्रम्हपुरी येथील बेकायदेशीर काम बंद बेकायदेशीर कामास संतप्त महिलांनी ठोकले टाळे

शिवसेनेच्या दणक्याने ब्रम्हपुरी येथील बेकायदेशीर काम बंद  बेकायदेशीर कामास संतप्त महिलांनी ठोकले टाळे

कोल्हापूर/प्रतिनिधी : ब्रम्हपुरी येथील हॉली इव्हेंजलिस्ट चर्च च्या मालकीच्या पॅरिश हॉल येथे ट्रस्टशी काडीमात्र संबध नसणाऱ्या व्यक्तीकडून बेकायदेशीर बांधकाम सुरु होते. याबाबत संबधित ट्रस्टच्या स्थानिक व्यवस्थापनाने आणि स्थानिक ख्रिश्चन समाज बांधवांनी वेळोवेळी प्रशासनाकडे दाद मागवून सदर बेकायदेशीर काम बंद करण्याची मागणी केली होती. परंतु याबाबत कोणतीही कारवाई न करता बेकायदेशीर काम करणाऱ्या व्यक्तीला पाठीशी घालण्याचे कटकारस्थान रचले जात होते. याबाबत स्थानिक नागरिकांनी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांची भेट घेवून न्याय देण्याची विनंती केली. त्यानुसार राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना शहर प्रमुख रविकिरण इंगवले यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. शिवसेनेच्या दणक्याने सुरु असलेले बेकायदेशीर काम बंद पाडण्यात आले. तर संतप्त झालेल्या स्थानिक महिलांनी बेकायदेशीर काम करणाऱ्या कंत्राटदाराच्या कार्यालयास टाळे ठोकले.
यावेळी “जय भवानी, जय शिवाजी”, “बेकायदेशीर काम करणाऱ्या कंत्राटदाराचा धिक्कार असो”, “बेकायदेशीर काम बंद झालेच पाहिजे”, अशा घोषणांनी ब्रम्हपुरी चर्च परिसर दणाणून सोडला.
यावेळी बोलताना शिवसेना शहरप्रमुख श्री.रविकिरण इंगवले यांनी, हॉली इव्हेंजलिस्ट चर्च, ब्रम्हपुरी, कोल्हापूर समाज मंदिर दि बॉम्बे डायोसेशन ट्रस्ट असोसिएशन प्रा.लि. मुंबई या नोंदणीकृत ट्रस्टच्या अंतर्गत येत असून, सदर ट्रस्टच्या राज्यातील अनेक शहरांमध्ये स्थावर मिळकती आहेत. त्यापैकी कोल्हापूर महानगरपालिका हद्दीतील सि.स.नं.२३५३, डी वॉर्ड ब्रम्हपुरी ही मिळकत ट्रस्टच्या मालकीची आहे. सदर ठिकाणी वर्षानुवर्षे १०० ख्रिस्ती कुटुंबाची रहिवासी कॉलनी व अत्यंत जुनी अशी हॉली इव्हेंजलिस्ट चर्च व पॅरिश हॉल असून सदर चर्च व हॉलचा वापर धार्मिक व सामाजिक कार्याकरिता नित्यनियमाने केला जातो. सदर मिळकतीमधील पॅरिश हॉल येथे ट्रस्टशी काडीमात्र संबध नसणाऱ्या व्यक्तीकडून अनाधिकाराने काही दुरुस्ती करण्याचे काम सुरु आहे. याबाबत संबधित ट्रस्टच्या स्थानिक व्यवस्थापनाने जिल्हा पोलीस प्रशासनासह स्थानिक लक्ष्मीपुरी पोलीस ठाणे, कोल्हापूर येथे तक्रार दाखल केली आहे. या मिळकतीबाबत मा.धर्मादाय आयुक्त, मुंबई, मे.उच्च न्यायालय, मुंबई व मे.दिवाणी न्यायालय, मुंबई येथे काही दावे दाखल होवून निकाली लागले आहेत. तसेच मे.उच्च न्यायालय मुंबई येथे दाखल रिट पिटीशन स्टॅम्प नुसार ट्रस्ट संदर्भातील पक्षकारांनी जैसे थे परिस्थिती ठेवण्याचा निर्णय दिला असताना सदर मिळकतीमध्ये अनधिकृत रित्या बांधकाम केले जात आहे. याविरोधात दाखल तक्रारी बाबत अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे हा प्रश्न शिवसेना स्टाईलने सोडवण्यास पुढे आली असून, स्थानिक ख्रिश्चन बांधवांना न्याय मिळवून दिल्या शिवाय शिवसेना स्वस्त बसणार नसल्याचा इशारा दिला.
यावेळी बेकायदेशीर काम करणाऱ्या ठेकेदारास कागदपत्रे दाखविण्याच्या सूचना केल्या. परंतु, त्यांच्याकडे बांधकाम परवानगीची कोणतीही कागदपत्रे उपलब्ध नव्हती. यासह ट्रस्टकडे असणारे मे.न्यायालयाचे आदेश डावलून काम सुरु असल्याचे निदर्शनास आल्यानंतर आक्रमक होत कंत्राटदारास काम बंद करण्यास भाग पाडून कार्यालयाबाहेर काढले. यावेळी स्थानिक महिलांनी कार्यालयास टाळे ठोकून संताप व्यक्त केला.
याप्रसंगी शिवसेना विभागप्रमुख सुशील भांदिगरे, शाखाप्रमुख कपिल नाळे, सचिन क्षीरसागर, कल्पेश नाळे, राजू कुंडले, बबन शिंदे, स्थानिक ख्रिश्चन समाजाच्या शिला चिंचलीकर, अबिगेल भोसले, रिबेका महाजन, अर्चना खोडवे, वैशाली भोसले, प्राची वायदंडे, शकिला लोखंडे, अरुण सावंत, संदीप आवळे, प्रफुल्ल महाजन, महेश भालेराव, संजय भोसले, संजय आवळे, विनोद लोखंडे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

प्रिमियम ब्रिक्सटन बाइक्स आणि व्हीएलएफ इलेक्ट्रिक स्कूटर ऑफर करत मोटोहॉसने कोल्हापुरात सुरू केली आपले दुसरे डीलरशिप शोरूम

प्रिमियम ब्रिक्सटन बाइक्स आणि व्हीएलएफ इलेक्ट्रिक स्कूटर ऑफर करत मोटोहॉसने कोल्हापुरात सुरू केली आपले दुसरे डीलरशिप शोरूम   कोल्हापूर/प्रतिनिधी : मोटोहॉस, केएडब्लू व्हेलोसे मोटर्स प्रा. लि....

ओला इलेक्ट्रिकचा संपूर्ण देशभरात ४००० स्टोअर्सचा विस्तार

ओला इलेक्ट्रिकचा संपूर्ण देशभरात ४००० स्टोअर्सचा विस्तार कोल्हापूर/प्रतिनिधी : भारतातील सर्वात मोठी प्युअर प्ले ईलेक्ट्रिक वाहन (ईव्ही) कंपनी असलेल्या ओला इलेक्ट्रिकने संपूर्ण भारतात ४,००० स्टोअरच्या...

डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद

डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद -डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ अंlतरमहाविद्यालय खो -खो स्पर्धा कोल्हापूर/प्रतिनिधी : डी.वाय.पाटील अभिमत विद्यापीठ अंतर्गत अंlतरमहाविद्यालय खो-खो स्पर्धेत मुलांच्या गटात डी.वाय...

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा ‘श्री गणेशा’ उद्या २० डिसेंबरला होणार प्रदर्शित

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा 'श्री गणेशा' उद्या २० डिसेंबरला होणार प्रदर्शित कोल्हापूर/प्रतिनिधी : कोणत्याही नवीन गोष्टीची सुरुवात 'श्री गणेशा' म्हणून केली जाते. सध्या रसिकांमध्येही अशाच...

Recent Comments