Friday, July 19, 2024
Home ताज्या मनोरा या नामांकित हॉटेलच्या बदनामीचा तरुणांचा प्रयत्न झाला सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद -...

मनोरा या नामांकित हॉटेलच्या बदनामीचा तरुणांचा प्रयत्न झाला सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद – निवास बाचुळकर

मनोरा या नामांकित हॉटेलच्या बदनामीचा तरुणांचा प्रयत्न झाला सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद – निवास बाचुळकर

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर येथील मनोरा या नामांकित हॉटेलमध्ये जेवणात पाल सापडल्याचा बहाणा करून कांगावा करणाऱ्या तरुणांचे कारस्थान हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाल्याचे उघडकीस आले आहे दोन दिवसापूर्वी सोशल मीडियावर जेवणामध्ये पाल सापडल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता याबद्दल हॉटेल प्रशासनाने सीसीटीवी फुटेज दाखवत बदनामीसाठीचा कांगावा केला गेला असल्याचे मनोरा हॉटेलचे मालक निवास बाचुळकर यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे.
शनिवारी रात्री दहा ते बारा जणांचा ग्रुप मनोरा हॉटेलमध्ये जेवणासाठी गेला होता त्यानंतर या तरुणांनी आपल्या मोबाईलवर जेवणामध्ये पाल सापडल्याचा व्हिडिओ करत तरुणांनी हॉटेलच्या कर्मचाऱ्यांसोबत हुज्जत घालायला सुरुवात केली यावेळी तिथे हॉटेलचे मालक आले असता संबंधित तरुणांनी कर्मचाऱ्यांचे हॉटेल मालकांवर हात उचलला या प्रकाराने गोंधळ सुरू झाल्यानंतर इतर ग्राहकांना त्रास होत असल्याने प्रशासनाने मारामारी करणाऱ्या तरुणांना हॉटेल बाहेर काढले या संधीचा फायदा घेऊन हॉटेलचे नाव टाकून बनवलेला व्हिडिओ संबंधीत तरुणांनी सोशल मीडियावर व्हायरल केला. ही हॉटेलची नाहक बदनामी टाळण्यासाठी हॉटेलने फुटेज पत्रकार परिषदेत आज पत्रकारांना दाखविले. या फुटेजमध्ये असे दिसून आले आहे की बसलेल्या तरुणांपैकी एका कडेला बसलेला तरुण जेवण सुरू असताना प्रथमतः मित्राची व्हेज डिश आपल्यासमोर घेतो. नंतर डाव्या हाताने पाठीमागील खिशातून पाल काढून ती भाजी मध्ये टाकतो नंतर सीसीटीवी मध्ये स्पष्ट दिसू नये म्हणून ती भाजी मिक्स करून घेतो यानंतर मित्रा जवळ देतो यावेळी तो मित्र त्यातील भाजी वाढून घेऊन त्यामधील पाल शोधू लागतो पण त्याला ती सापडत नाही यावेळी शेजारचा मित्र ती पाल शोधून काढतो आणि समोरच्या मोकळ्या डिशमध्ये ठेवून दुसऱ्या मित्राला व्हिडिओ बनवायला सांगतो हा सगळा घटनाक्रम सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्याने स्पष्ट करून यापुढे संबंधीत तरुणांवर कठोर कारवाई होण्यासाठी आम्ही  प्रयत्न करणार असल्याचे निवास बाचुळकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

घोडावत विद्यापीठतील फार्मसी विभागाच्या विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीमध्ये निवड

घोडावत विद्यापीठतील फार्मसी विभागाच्या विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीमध्ये निवड किमया शिंदे व अरिहंत परमाज यांना साडेपाच लाखाचे पॅकेज अतिग्रे/प्रतिनिधी :संजय घोडावत विद्यापीठाने शिक्षण क्ष्रेत्रात अल्पावधीतच आपले नाव...

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये डॉ. सुहास देशमुख यांचे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये डॉ. सुहास देशमुख यांचे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन कोल्हापूर/प्रतिनिधी : जागतिक युवा कौशल्य दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांतर्गत डॉ. सुहास देशमुख, संचालक, राष्ट्रीय...

हेल्थ इन्श्युरन्स संकल्पनांचे स्पष्टीकरण

हेल्थ इन्श्युरन्स संकल्पनांचे स्पष्टीकरण श्री. भास्कर नेरुरकर हेड - हेल्थ ॲडमिनिस्ट्रेशन टीम, बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स. तांत्रिक डोमेन आणि कायदेशीर करार असल्यामुळे बहुतांश इन्श्युरन्स संकल्पना या...

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सीपीआर भूमिपूजन व जिल्हा बँक नूतन इमारतीच्या उद्घाटनासाठी कोल्हापुरात येणार

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सीपीआर भूमिपूजन व जिल्हा बँक नूतन इमारतीच्या उद्घाटनासाठी कोल्हापुरात येणार जुलै अखेरीस किंवा ऑगस्ट पहिल्या आठवड्यात होणार कार्यक्रम,दहा हजार वृक्ष लावण्याची...

Recent Comments